google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 राजमाता जिजाऊ भाषण निबंध कविता सुत्रसंचलन मराठी pdf | Rajmata Jijamata speech in marathi
Type Here to Get Search Results !

राजमाता जिजाऊ भाषण निबंध कविता सुत्रसंचलन मराठी pdf | Rajmata Jijamata speech in marathi

राजमाता जिजाऊ भाषण कविता सुत्रसंचालन मराठी निबंध चारोळ्या माहिती | Jijamata speech in marathi pdf | Rajmata Jijau Marathi Bhashan nibandh kavita mahiti in marathi


नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील शूर पराक्रमी छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याबद्दल थोडक्यात माहिती निबंध मराठी मध्ये बघणार आहोत.


राजमाता जिजाऊ मराठी भाषण



राजमाता जिजाऊ भाषण निबंध कविता माहिती मराठी | rajmata jijau speech essay in marathi

राजमाता जिजाऊ जयंती : आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज १२ जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. ( आज १७ जुन राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी ) या थोर मातेस प्रथम माझा मानाचा मुजरा.

त्रिवार असावा .....

मानाचा मुजरा त्या जिजाऊ मातेला.... 

जीने घडवला रयतेचा राजा .... 

रचली स्वराज्याची गाथा....

राजमाता जिजाऊ : महाराष्ट्राच्या मातीमधे रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगीरीच्या छाताडावर प्रहार केला त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि हिंदू धर्माचे रक्षण करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी राज दोन छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जाधव घराण्यात झाला. राजमाता जिजाऊंच्या वडीलांचे नाव लखुजी आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवागिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. सन १६०५ साली जिजामातांचा विवाह शहाजीराजांसोबन दौलताबाद येथे झाला.


मित्रांनो, राजमाता जिजाऊ ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या. राजमाता जिजाऊ लहानपणापासून चाणाक्ष, बुद्धीने तेज होत्या. राजमाता जिजाऊंची आई म्हाळसा राणी जेव्हा त्यांना जिजा या शब्दाचा अर्थ त्यांना सांगत तेव्हा म्हाळसाराणी भावूक व्हायच्या. जिजा म्हणजे तुळजा भवानी, जिजा म्हणजे विजय गाथा रचणारी. ती आदिमाया, देवी तुझ्या रूपात माझ्या पोटी आली असे सांगून राजमाता जिजाऊंचा आत्मविश्वास आणि महत्वकांक्षा त्या फुलवायच्या . राजमाता जिजाऊंचे थोरले बंधू राजे दत्तोजी यांनी जिजाऊंना तलवारबाजी करणे घोडे स्वारी चे प्रशिक्षण दिले. तसेच राजमाता जिजाऊंचे थोरले बंधू राजे लखुजी यांनी युद्धशास्त्रातील शिक्षणाबरोबरच राजकारण, न्यायनीती यांचे सुद्धा धडे दिले.


🆕 राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश मराठी


राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य ची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांनी प्रत्येक मावळ्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवला, त्यांनी प्रत्येक मावळ्यात शिवबा घडविला. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना राम, कृष्ण आणि भीम यांच्या गोष्टी सांगायच्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या गरीब लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. दुष्ट कंसाचा नाश करणारा श्रीकृष्ण किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे. अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिली. राजमाता जिजाऊंच्या अशा शिकवणीच्या आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊंचे स्वप्न साकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
अशा या महान राजमाता जिजाऊंचे १७ जून १६७४ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी निधन झाले.


मित्रांनो, जाता-जाता एक सांगू इच्छितो कि आज समाजातील प्रत्येकाला गरज आहे ती छत्रपती शिवराय आणि  राजमाता जिजाऊ यांचे गुण आपल्या अंगी बाणवण्याचा निश्चय करण्याची, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करण्याची.
शेवटी एवढेच बोलेल...


वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच पाहिजे

वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच पाहिजे 

म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणी

मान माझी सदैव झुकते ,मान माझी सदैव झुकते.


धन्यवाद मित्रांनो राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या बद्दलची माहिती भाषण तुम्हाला नक्कीच आवडले असेल आवडल्यास खाली दिलेल्या व्हाट्सअप बटन वर क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद.

अशाच प्रकारच्या माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇
                        What's up group link


राजमाता जिजाऊ चारोळ्या मराठी | rajmata jijau charolya marathi pdf


मुजरा माझा माता जिजाऊला,
घडविले तिने शूर शिवबाला,
साक्षात् होती ती आई भवानी, 
जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी.


इतिहासा, तू वळूनी पहा, पाठीमागे जरा,
झुकवूनी मस्तक करशील,जिजाऊंना मानाचा मुजरा.


मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा
तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, 
सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने, 
स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने.


जिजाऊ तुम्ही नसता तर, 
नसते झाले शिवराय नि शंभू छावा, 
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा.


जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे,
जिजाऊ तुम्ही नसता तर, 
नसते दिसले विजयाचे सोहळे.


जिजाऊ एक स्त्री होती,
शहाजी राजांची वीर पत्नी होती, 
जाधव घराण्याची लाडकी लेक होती,
स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती.


आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी, 
जिजाऊ महान माता होती, 
जगातील प्रत्येक स्त्री ने आदर्श घ्यावा, 
अशी आदर्श माता होती.


जिजाऊ आई, पूर्वजन्माची पुण्याई असावी,
जन्म जो तुझ्या गर्भात शिवबांनी घेतला, 
जग पाहिल जरी नव्हतं तरी, 
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.



हे सुध्दा वाचा⤵️












FAQ
Q.1) राजमाता जिजाऊंचा जन्म कधी झाला ?
Ans.राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जाधव घराण्यात झाला.

Q.2) राजमाता जिजाऊचे निधन कधी झाले ?
Ans. राजमाता जिजाऊंचे १७ जून १६७४ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी निधन झाले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad