Type Here to Get Search Results !

फ्रेंडशिप डे शुभेच्छा मराठी | Friendship Day marathi mahiti 2021 wishes

फ्रेंडशिप डे शुभेच्छा मराठी मैञी शायरी मराठी  sms 2021 Best friend quotes in marathi 


नमस्कार माझ्या मित्रांनो फ्रेंडशिप डे म्हणजे आपल्या लाडक्या जिवलग अश्या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस , मैत्री हे एकच असे नाते आहे त्या मध्ये कधीच स्वार्थ नसतो . या वर्षी दिनांक  ३ ऑगस्ट २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस (फ्रेंडशिप डे) म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तुम्हांला माहीतच असेल की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण दरवर्षी आंतराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा करत असतो. 

Friendship Day marathi mahiti 2021


माणसाच्या शब्दांत सौजन्य आणि आपुलकी असेल तर त्याची सा-या जगाशी मैत्री होऊ शकते. प्राचीन काळापासून मित्रत्वाच्या भावनेला महत्व देण्यात आले आहे.

साधारणत: सारख्या व्यसनाचे व चारित्र्याचे मैत्रीत रुपांतर होत असते. व्यसन या संस्कृत शब्दाचा अर्थ संकट सुध्दा होतो. त्यामुळे समदुःखी लोकातही सख्याची भावना वाढू शकते. मित्राचा आपल्यावर प्रभाव पडतो. जसा मित्र तसे आपणही होतो. त्याचे दोष आपणही घेतो. म्हणून मैत्री करताना आपला मित्र चांगला आहे ना याची काळजी घ्यावी. लबाड मित्र सहानुभूती दाखवेल पण ती वरवरची असते. खरा मित्र संकटकाळी आपल्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार असतो.

जीवनातील संगतीला महत्वाचे स्थान आहे. असे म्हटले जाते की आळशी माणसाला विद्या प्राप्त होऊ शकत नाही. अनाडी व्यक्तीला धन मिळू शकत नाही. पैसे जवळ नसल्यामुळे मित्र मिळत नाही व मित्ररहित मनुष्य सुखापासून वंचित होतो. मित्र आणि ग्रंथ हे मोजके असावेत पण ते चांगले असावेत...

Friend in need -  is a friend in deed

ज्यावेळी गरज भासते, त्यावेळी मित्र मदत करतो. पण खरा मित्र सुख दुःखाच्या काळात नेहमीच साथ देतो. जो मित्र आपल्या सुखात मागे पण दुःखाच्या वेळी पुढे असतो तोच खरा मित्र! 

जी गोष्ट वैयक्तिक बाबतीत असते, तीच बाब राष्ट्रा राष्ट्रांत किंवा समाज किंवा संघटनांच्या मैत्रीविषयी म्हणता येते. भारताची रशिया बरोबर अशी मैत्री होती, पण आपण केवळ रशियावरच मित्रत्व ठेवल्यामुळे इतर बलवान राष्ट्रांपासून दूर राहिलो. परंतु आता जगातील बरचसे विकसित राष्ट्रांबरोबर भारताचे संबध वृद्धिंगत होत आहेत.

मित्रता ती दोन मित्रांची असो की दोन राष्ट्रांची असो ती करताना सोपी असते, पण मैत्री टिकवणे कठीण असते. प्रदीर्घकाळ मित्रत्वाचे संबंध टिकविण्यासाठी समजूतदारपणा, सहनशीलता व त्यागाची वृत्ती हवी. प्रेमळ माणसालाच प्रेम मिळते व त्याग ही त्याची कसोटी असते. मित्राच्या स्नेहामुळे आपणास खूप आनंद होतो. आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त व्यक्ती व्यक्तीत व राष्ट्रा राष्ट्रांतील मैत्री वाढो अशी सदिच्छा!


🔰 हे सुद्धा वाचा - 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad