google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 रक्षा बंधन मराठी निबंध माहिती | raksha bandhan marathi nibandh mahiti 2021
Type Here to Get Search Results !

रक्षा बंधन मराठी निबंध माहिती | raksha bandhan marathi nibandh mahiti 2021

रक्षा बंधन मराठी निबंध माहिती  | raksha bandhan marathi nibandh mahiti 2021


रक्षा बंधन मराठी निबंध माहिती  | raksha bandhan marathi nibandh mahiti 2021


रक्षाबंधन प्रस्ताविक - 

श्रावण महिना म्हणजे सणवार धर्म कर्माचा महिना श्रावणातील सर्वात मोठे पर्व रक्षाबंधनाचे श्रावण पौर्णिमेला ते साजरे केले जाते. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देतो रक्षाबंधन हा प्रतिज्ञेचा सण असून आपण ही प्रतिज्ञा अवघ्या राष्ट्राच्या संरक्षणाच्या हेतूने राखीच्या धाग्यासारखे एकजुटीने करावयाची आहे .राखी हाताला बांधली जाते कारण हे हात आपल्या सत्कर्माचे शौर्याचे आणि त्यागाचे बलिदानाचे प्रतीक , आहेत राखी आपल्याला या कर्तव्यापासून निभावून जाण्याची प्रेरणा सतत देत असते.

राखी पौर्णिमा ( रक्षाबंधन मुहूर्त व तारीख ) -

२२ ऑगस्ट २०२१ रोजी राखी पौर्णिमा सुरू होत असून सकाळपासून आपण आपल्या भावाला राखी बांधू शकता १

राखी पौर्णिमा महत्व -

रक्षाबंधन हा सण प्राचीन भारतीय संस्कृती व परंपराचे जोतक आहे तसेच भारतीय स्त्रीचे विशिष्ट स्थान सूचित करणारा सण आहे राखीचा मंगलमय धागा श्री चे शक्ती आणि उपासनेचे प्रत्यक्ष प्रमाण आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बांधली जाणारी राखी श्रीच्या सहज सुंदर प्रेमाचे प्रतीक आहे तसेच पुरुषांच्या अंगी उपजत असलेल्या श्री चे रक्षण करण्याच्या सामर्थ्याचे ते कलात्मक प्रतीक आहे , रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास साठी शुभकामना प्रकट करते त्याच प्रमाणे भाऊ सुद्धा मोठ्या प्रेमाने आपल्या बहिणीला आपल्या शक्तीनुसार भेट देत असतो . राखी बांधल्यावर बरोबर भावाच्या ह्रदयात बहिणी बद्दल आपले कर्तव्य व जबाबदारी चा भाव व्यक्त होतो. या सणाच्या दिवशी गोड पकवान बनविले जाते जिकडेतिकडे आनंद आला बहर आलेला दिसतो हिंदू या व्याख्येत मोडल्या जाणाऱ्या सर्व जमातीत रक्षाबंधनाचा सण अति उत्साहाने साजरा करतात. हा सण बहीण भाऊ यांच्या स्नेहाचे प्रतीक आहे हा पवित्र सण आहे .प्रत्येक वर्षी श्रावण तिकडे आनंद आला बहर आलेला दिसतो हिंदू या व्याख्येत मोडल्या जाणाऱ्या सर्व जमातीत रक्षाबंधनाचा सण अति उत्साहाने साजरा करतात .हा सण बहीण भाऊ यांच्या स्नेहाचे प्रतीक आहे हा पवित्र सण आहे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा महोत्सव साजरा केला जातो.

राखी पौर्णिमा ( रक्षा बंधन इतिहास ) - 

 या सणाच्या बाबतीत बऱ्याच पुरातन गोष्टी प्रसिद्ध आहेत इंद्र देवाची पत्नी येणे सर्व देवांना राखी बांधली होती यापासून शक्ती प्राप्त करून देवांनी आणि राक्षसांनी वर विजय मिळवला. प्राचीन काळात श्रावणी पौर्णिमेला ऋषी मुनी आपल्या तपश्चर्येची पूर्ण अहोत करत मग राजाच्या हातात राखी बांधून त्यांना आशीर्वाद देत .

या दिवशी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भगवान विष्णूला मुक्ती दिली यात कारणास्तव गुजरात राज्यात राखीला बलेव असे म्हणतात.

 फार वर्षांपूर्वीची गोष्ट सिकंदर राजा जग जिंकण्याच्या प्रतिज्ञा ने भारतावर चाल करून आला त्याने झेलम नदीपर्यंत सर्व राजे राज्य पादाक्रांत केली एके दिवशी झेलम नदी कशी पार करावी याचा उतार पाहण्यासाठी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी राजा सिकंदर स्वतःला त्या वेळी त्याला अपूर्व दर्शनाचा लाभ घडला सावित्री नावाची एक स्त्री झेलमच्या किनारी नदीची पूजा करून राखी अर्पण करत होती तेव्हा  सिकंदर पुढे आला त्यावेळी राखी बाबत विचारले तेव्हा तिने त्याला राखी बांधली त्यांचे बहिण-भावाचे नाते झाले पुढे राजा सिकंदर पोरस राज्यावर स्वारी करून त्याचा पराभव केला आणि त्याला कैद केले ही वार्ता सावित्रीस कळताच ती वायुवेगाने सिकंदरा जवळ आली त्यावेळी सिकंदर पोरस राजा ची चौकशी करत होता सावित्री व पोरस हे सख्खी बहिण भाऊ असल्यामुळे तिने पोहोचला सोडण्यास सिकंदराला सांगितले कारण सावित्री सिकंदराची राखी बद्द बहीण पडली होती तेव्हा सिकंदर आणि पोरस ला सोडले व जिंकलेले सर्व राज्य ही त्याला परत दिले .

राजपूत लोकात राखी बांधण्याची प्रथा पूर्वी सर्वत्र रूढ होती राजपूत स्त्रिया आपल्या पतीच्या शत्रूच्या गोटात जाऊन आपल्या पती विरुद्ध लढणार्‍या योद्ध्याच्या हातात राखी बांधून संकल्पित युद्धप्रसंग टाळून सौभाग्याचे रक्षण करीत असत राखी बंधनाच्या या अपूर्व कथान वरून मित्रत्व स्नेह व परस्पर विश्‍वास वृद्धिंगत करण्यासाठी ही प्रथा अस्तित्वात आली .

रक्षाबंधन समारोप -

आज सर्वत्र काळ बोकाळला असताना स्त्रियांकडे भगिनी या नात्याने पाहण्याची शिकवण देणारा रक्षाबंधन हा पवित्र सोहळा आपल्या पूर्वजांनी सुरू केलेला आहे भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली ही मौल्यवान देणगी आहे रक्षाबंधन म्हणजे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे म्हणून या दिवशी सर्व लोकांनी समाजामध्ये तीन दलित पीडित अनाथ रंजल्या-गांजल्या लोकांच्या जीवनात प्रेम निर्माण करून पावित्र्य व मांगल्य रुजविल्या कटिबंध असावे , समाजसेवा तंतुमय प्रेमाच्या धागा काढून लोककल्याणासाठी अविश्रांत परिश्रम घेऊन सर्वांना आनंद दिला तर या सणाचा उद्देश साध्य होईल असे मला वाटते .


🔰 हे सुद्धा वाचा - 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad