Type Here to Get Search Results !

गणपती विसर्जन 2022 कसे करावे | Ganpati visarjan muhurat 2022 marathi

गणपती विसर्जन कसे करावे | Ganpati visarjan muhurat 2022 marathi | गणपती विसर्जन संपूर्ण माहिती मराठी | गणपती विसर्जन शुभ मुहूर्त तीथी मराठी माहिती 

गणपती विसर्जन कसे करावे

गणपती विसर्जन २०२२ :- अनंत चतुदर्शी हा तो दिवस आहे ज्या दिवशी सगळीकडे गणपती बाप्पाची ढोलताशा लावून वाजत गाजत विसर्जनासाठी मिरवणुक काढली जाते.सर्व जण ह्या दिवशी पायी नाचत-कुदत,वाजत गाजत गणपत्ती बाप्पा मोरया मोरया पुढच्या वर्षी लवकर या,अर्धा लाडु फुटला गणपती बाप्पा उठला अशी घोषणा देत बाप्पाच्ची स्थापणा केलेल्या ठिकाणापासुन बाप्पाचे विसर्जन करण्याचे ठिकाणापर्यत बाप्पाला एखाद्या नदी तसेच समुद्रात विसजर्नासाठी घेऊन जात असतात.

आपण जेवढया उत्साह आणि आनंदात आपण गणपती बाप्पाचे स्वागत केले होते आता वेळ आली आहे की तेवढयाच उत्साह तसेच आनंदाने आपण बाप्पाला निरोप देखील द्यायला हवा.ही गोष्ट वेगळी आहे की आपल्या सर्वाच्या लाडक्या बाप्पाला निरोप देणे हे आपणा सगळयांसाठी खुपच कठिण असते.तसेच ह्या क्षणी आपण सर्व गणेशभक्त खुपच भावुक झालेलो असतो.पण पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येणार हा दिलासा मिळत असल्यामुळे आपण सर्वजण बाप्पाला आनंदाने निरोप देत असतो.

09 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या सर्वाच्या लाडक्या गणपती बाप्पाला आपणास निरोप द्यायचा आहे.जितक्या नियमबदध पदधतीने आपण गणपती बाप्पाची स्थापणा केली तितक्याच नियमबदधपणे तसेच पारंपारीक रीती रिवाजानुसार आनंद आणि उत्साहात गणपती बाप्पाला आपल्याला निरोप देखील देता यावा.

म्हणुन आजच्या लेखातुन आपण गणपती विसर्जनाविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण विसर्जनाच्या विधीपासुन ते विसर्जनाच्या शुभ मुहुर्तापर्यतच्या इत्यादी सर्व महत्वाच्या बाबींचा आढावा घेणार आहोत.


♦️गणपती विसर्जन म्हणजे काय? 

गणपती विसर्जन म्हणजेच गणपती बाप्पाच्या स्थापण केलेल्या मुर्तीला पाण्यात बुडवून अंतिम निरोप देण्याचा दिवस.09 सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शीच्या दिवशी आपण वाजत गाजत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,अर्धा लाडु फुटला गणपती बाप्पा उठला!अशी घोषणा करत गणरायाला मिरवणुक काढुन निरोप देत असतो.


अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन कसे करावे?

आपण दरवर्षी गणपती बाप्पाच्या मुर्तीची स्थापणा करत असतो.तसेच आपापल्या सोयीनुसार कोणी दोन दिवस कोणी चार दिवस तर कोणी पुर्ण दहा दिवस त्यांची मनोभावे सेवा,पुजा,अर्चना करत असतो.त्यांच्या आवडते पक्वान मोदकाचा नैवेद्य आपण त्यांना रोज दाखवत असतो.मग अकराव्या दिवशी अनंत चतुदर्शीला आपण सर्व मिळुन बाप्पाला वाजत गाजत ढोल ताशांच्या आवाजात पाण्यात विसर्जित करून निरोप देत असतो. 


अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन कसे करायचे ?

 • गणपतीची पुजा करायला बसण्याअगोदर पहिले अंघोळ करावी आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावी.
 • गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्याच्या अगोदर त्यांच्यासमोर आपण नैवैद्य ठेवायला हवा.
 • गणपती विसर्जनाच्या दिवशी रोजप्रमाणे देखील गणपती बाप्पाची सर्व मिळुन आरती करावी.मग प्रसादाचे वाटप करावे.
 • एक लाकडाचे एक पाट घ्यावे त्यावर गंगाजल तसेच गोमुत्र शिंपडुन घ्यावे याने ते पवित्र तसेच शुदध होत असते. 
 • मग आणि जे लाकडाचे पाट घेतले आहे त्यावरून स्वस्तिक काढावे.
 • त्यानंतर त्या पाटावर एखादे लाल वस्त्र पसरवून ठेवावे.
 • मग वस्त्र ठेवलेल्या पाटाच्या चहुबाजुला सुपारीचे तुकडे ठेवावे.
 • स्थापण केलेली गणपतीची मुर्ती हळुच अलगदपणे उचलून ह्या वस्त्र पसरवुन ठेवलेल्या पाटावर ठेवावी.
 • मग गणपती बाप्पाच्या मुर्ती समोर फळ, फुल तसेच मोदक ठेवावेत. 
 •  गणपती बाप्पाच्या मुर्तीला उचलुन विसर्जनासाठी घेऊन जावे.
 • मुर्तीच्या विसर्जनाच्या अगोदर पुन्हा एकदा गणपतीची आरती करावी.
 • शेवटची आरती करून झाल्यावर दहा दिवसात गणपतीची सेवा करण्यात त्यांचे आदरतिथ्य करण्यात आपल्याकडुन काही चुक झाली असेल तर त्याबाबद गणपती बाप्पाकडे आपण माफी मागावी.
 • मग गणपतीच्या मुर्तीचे तसेच त्यासोबत असलेल्या इतर वस्तुंचे देखील मोठया आदराने सन्मानपुर्वक विसर्जन आपण करायला हवे.

🎯गणपती विसर्जना बरोबर खालील वस्तुंचे विसर्जन करावे 

 • गणपतीची मुर्ती 
 • कलश
 • पाण्याने भरलेला कलश
 • इतर सामग्री 

अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन का केले जाते?

गणपती विसर्जनाच्या बाबतीत तसे पाहायला गेले तर अनेक सामाजिक तसेच धार्मिक मान्यतांचे कथन केल जाते.सामाजिक मान्यतेनुसार असे म्हणतात की ब्रिटीश राजवटीच्या काळात भारतातील लोकांमध्ये ऐक्य तसेच बांधिलकी वाढावी.म्हणुन गणपतीच्या मुर्तीची स्थापणा तसेच विसर्जनाची प्रथा सुरू करण्यात आली होती.

त्याचप्रमाणे आपण गणपती विसर्जनाविषयी समाजात रूढ असलेल्या धार्मिक कल्पणा,मान्यतांविषयी पाहावयास गेले तर आपणास असे ऐकायला मिळते की 

महर्षी व्यास यांनी महाभारताच्या कथेचे कथन करून झाल्यानंतर गणपत्ती बाप्पाला पाण्यात बुडवले होते.

कारण तब्बल दहा दिवस महर्षी व्यास यांनी गणपतीला कथा ऐकवली होती. 

त्या ऐकलेल्या कथेचे गणपतीने लेखन केले होते.मग दहा दिवस कथेचे लेखन करून झाल्यानंतर महर्षी व्यास आपले डोळे उघडतात त्यांना दिसते की खूप दिवसांपासुन लागोपाठ लेखन करत असल्यामुळे गणपतीचे शरीराचे तापमान हे खुपच वाढले आहे.मग गणपतीच्या शरीराचे तापमान कमी होण्यासाठी महर्षी व्यास त्यांना पाण्यात घेऊन जातात आणि पाण्यात गणपतीला अंघोळ घालतात.त्या दिवशी अनंत चतुर्दशीचा दिवस होता.तेव्हापासुन अनंत चतुर्दशीला गणपतीच्या मुर्तीचे पाण्यात विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली.तेव्हापासुन दरवर्षी गणपतीच्या मुर्तीचे अनंत चतुदर्शीच्या दिवशी पाण्यात विसर्जन करण्यात येऊ लागले.मग ही वर्षोनुवर्षाची रूढी परंपराच बनुन गेली.

गणपती विसर्जनाचा तिथी तसेच शुभ मुहुर्त काय आहे?

ह्या वर्षी गणपती विसर्जन हे 09 सप्टेंबर 2022 रोजी शुक्रवारच्या दिवशी केले जाणार आहे.गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन करण्याचा शुभ मुहुर्त पुढीलप्रमाणे 

गणपती विसर्जनाचा शुभ मुहुर्त :

 1. सकाळी 6.03 मी. पासुन ते दुपारी 10 वाजुन 44 मिनिटांपर्यत.
 2. दुपारी 12.18 मिनिट ते 1 वाजुन 52 मिनिटांपर्यत. 
 3. संध्याकाळी 05.00 मिनिटांपासुन रात्री 06 वाजुन 34 मिनिटांपर्यत.
 4. रात्री 9 वाजुन 26 मिनिटापासुन ते 10 वाजून 52 मिनिटापर्यंत.
 5. रात्री उशिरापर्यत 12.18 मिनिटांपासुन ते 10 सप्टेंबर सकाळी 4 वाजुन 37 मिनिटांपर्यत.

अशा पदधतीने वरील दिलेल्या कोणत्याही एका शुभ मुहुर्तावर आपण गणपतीचे विसर्जन आपल्या सोयी सुविधेनुसार विधीवतपणे करू शकतो असे पंचांगात सांगितले गेले आहे.


🎯गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन करताना कोणती  काळजी आपण घ्यावयाची असते ?

दर वर्षी प्रमाणे आपण अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणरायाचे ह्या वर्षी देखील पाण्यात विसर्जन करणार आहे.मुर्तीचे विसर्जन करताना आपण पुढीलप्रमाणे काळजी घेऊन मुर्तीचे विसर्जन करायला हवे.कारण कोणतीही काळजी न घेता विसर्जनास पाण्यात उतरल्यामुळे खुप जणांना आपले प्राण गमवावे लागलेले असल्याचे चित्र आपल्याला दिसुन येते.

गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन करताना आपण घ्यावयाची काळजी :

 • गणपतीच्या मुर्तीचे तसेच इतर सर्व वस्तुंचे देखील सन्मानपुर्वक विसर्जन करावे.
 • अत्यंत खोल पाण्यात गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन करण्यास जाऊ नये.
 • गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन करायला जर आपण एखाद्या समुद्रात जाणार असेल तर आधी त्या समुद्राच्या भरती आणि ओहोटीचा वेळ काय आहे हे आधी जाणुन घ्यायला हवे.
 • गणपतीची मुर्ती विसर्जित करण्यासाठी स्वता खोल पाण्यात न उतरता ज्या लोकांना महानगरपालिके द्वारे मुर्ती विसर्जनाच्या कामासाठी नेमण्यात आले आहे त्यांची मदत घ्यावी.
 • मोठी मुर्ती असेल तर विसर्जनासाठी पाण्यात उतरण्याअगोदर आपण एकुण किती जण आहेत याची नोंद घ्यावी.जेणेकरून आपल्याला कोणी पाण्यात बुडल्यास लगेच चटकन लक्षाय येईल आणि आपण त्याचे प्राण वाचवू शकतो.
 • लहान मुलांना पाण्यापासुन दूर अंतरावर  ठेवावे.
 • रात्री दहा वाजेनंतर जास्त मोठया कर्कश आवाजात ढोल ताशे वाजवू नये.
 • अशा पदधतीने मुर्तीचे विसर्जन करताना आपल्याला वरील सर्व महत्वाच्या बाबींचे पालन करायला हवे.


अशा पदधतीने आज आपण गणपती विसजर्नाविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेतली आहे.आपल्याला ही सर्व माहीती कशी वाटली याबाबद आपली प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा आणि सदर माहीती जास्तीत जास्त ठिकाणी,जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर देखील करा जेणेकरून त्यांना देखील ह्या माहीतीचा लाभ उठवता येईल.


हे सुध्दा वाचा ⤵️टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad