Type Here to Get Search Results !

हरितालिका माहीती पूजा कशी करावी 2021 | Hartalika vrat katha in marathi

हरितालिका माहीती पूजा कशी करावी मराठी माहिती 2021 |Hartalika vrat katha in marathi

हरितालिका हे एक असे व्रत आहे जे सर्व स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी ठेवत असतात.हे व्रत ठेवुन सर्व स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत असतात.आणि मग दुसरे दिवशी सकाळी उठुन अंघोळ करून देवी पार्वतीची पुजा करून हे निर्जल व्रत स्त्रिया तोडत असतात.

आणि आज आपण ह्याच हरितालिकेच्या सणाविषयी तसेच व्रताविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

हरितालिका व्रत काय असते?

हरितालिका हा सण हिंदु धर्मातील सर्व प्रमुख मानल्या जात असलेल्या उत्सवांपैकी तसेच व्रतांपैकी एक महत्वपुर्ण व्रत म्हणुन ओळखले जाते.हे व्रत सर्व स्त्रियांद्वारे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केले जात असते.ह्या दिवशी सर्व विवाहीत तसेच अविवाहीत स्त्रिया देखील शिवशंकराची म्हणजेच महादेवाची मोठया भक्तीभावाने पुजा,अर्चना,आराधना करीत असतात.ह्या व्रतामध्ये पुर्ण दिवस स्त्रिया पाणी देखील पित नसतात.संपुर्ण निर्जल व्रत ह्या दिवशी स्त्रिया करत असतात.आणि जेव्हा त्यांची पुजा संपन्न होत असते त्याच दिवशी सर्व स्त्रिया आपले हे व्रत तोडत असतात.

हरितालिका हा सण कधी आणि केव्हा साजरा केला जात असतो?

हरितालिकेचे व्रत तसेच हा सण सर्व स्त्रिया दर वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी साजरा करत असतात.

२०२१ मध्ये हरितालिका कधी आहे?

2021 मध्ये हरितालिका हा सण 9 सप्टेंबर रोजी गुरूवारी आहे.आणि सर्व स्त्रिया ह्या दिवशी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी व्रत देखील ठेवत असतात.

हरितालिकेच्या व्रताचे महत्व काय आहे?

हरितालिकेचे व्रत हे सगळयात आधी देवी पार्वतीने शिव शंकर महादेवासाठी ठेवले होते.म्हणुन हे व्रत अत्यंत खास व्रत मानले जाते.

जी स्त्री हे व्रत करत असते तिच्यावर शंकर पार्वतीची विशेष कृपा दृष्टी असते.असे देखील ह्या व्रताबाबद सांगितले जाते.

हे व्रत करत असताना स्वता देवी पार्वतीने अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता म्हणुन सर्व स्त्रिया देखील हे व्रत निर्जल ठेवत असतात.

सदर व्रत माता पार्वतीने महादेवाला आपला पती बनवण्यासाठी ठेवले होते.याचे फलस्वरूप महादेवाने पार्वतीला पत्नीच्या स्वरुपात स्वीकार देखील केले होते.म्हणुन

हे व्रत ठेवत असलेल्या स्त्रियांच्या पतीला माता पार्वती प्रसन्न होऊन दिर्घायुष्यी होण्याचा आशिर्वाद देत असतात.

हरितालिकेचे व्रत सर्वत्र का साजरे केले जात असते?

देवी पार्वतीला शिव शंकर यांना पतीच्या स्वरूपात प्राप्त करण्यासाठी तब्बल 107 वेळा जन्म घ्यावा लागला होता.त्यानंतर 108 वा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्या तसेच भक्तीमुळे भगवान शिव यांनी त्यांना आपली पत्नी म्हणुन स्वीकार केले होते.

तेव्हा माता पार्वतीने प्रसन्न होऊन हे व्रत जी स्त्री करेल तिच्या पतीला दिर्घायुष्य लाभेल असे वरदान दिले होते.

तेव्हापासून सर्व स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी ठेवत असतात.

हरितालिका हे व्रत कशा पदधतीने साजरा केले जाते?

ह्या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी व्रत ठेवत असतात आणि त्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील करीत असतात.ह्या दिवशी सर्व स्त्रिया अन्न आणि पाण्याचा त्याग करत असतात.आणि दुसरे दिवशी सकाळी लवकर उठुन अंघोळ वगैरे करून झाल्यावर भक्तिभावाने मनोभावे पुजा करीत असतात.आणि मग त्यानंतर आपले निर्जल व्रत अन्नाचे सेवन करुन सर्व स्त्रिया तोडत असतात.

हरतालिकेच्या दिवशी व्रत तसेच उपवास का केला जातो? | Hartalika upvas kasa karava ka karayacha 

हरितालिकेचे व्रत हे देवी पार्वतीने मनोमन महादेवाला आपला पती मानले होते.आणि त्यांनी महादेवाला आपला पती बनवण्यासाठी अखंड तपश्चर्या देखील केली होती.मग पार्वतीच्या अखंड भक्ती आणि श्रदधेवर प्रसन्न होऊन महादेवाने देवी पार्वतीचा आपल्या पत्नीच्या रुपात स्वीकार केला होता.तेव्हा प्रसन्न होऊन देवी पार्वतीने सर्व स्त्रियांना वरदान दिले की जी स्त्री हे व्रत आपल्या पतीसाठी करेल त्या स्त्रीच्या पतीला

अकाल मृत्यु प्राप्त होणार नाही त्याला दिर्घायुष्य लाभेल.म्हणुन ह्या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी व्रत तसेच उपवास करत असतात.कारण हा दिवस शिव पार्वतीची विशेष कृपा दृष्टी लाभण्याचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो.

हरितालिकेच्या व्रताचे नियम कोणकोणते आहेत?

  • हरतालिका व्रत पाळत असलेल्या प्रत्येक स्त्रीने ह्या दिवशी अन्न तसेच पाण्याचे सेवन करू नये.कारण हे व्रत निर्जल व्रत असते म्हणजे ह्या दिवशी स्त्रिया अन्नच नव्हे तर पाणी देखील पिऊ शकत नसतात.इतके कठोर हे व्रत असते.
  •  व्रताच्या दुसरे दिवशी लवकर उठुन अंघोळ वगैरे करून पुजा करावी त्यानंतरच आपले व्रत पाणी पिऊन सोडावे.
  • हरतालिका च्या दिवशी आपण म्हणजेच प्रत्येक स्त्रीने रात्रभर जागरण करून भजन किर्तन करावे आणि रात्रभर देवाचे श्रदधेने नामस्मरण करावे.
  • मग दुसरे दिवशी सकाळी लवकर उठुन अंघोळ वगैरे करून भक्तीभावाने पुजा करावी आणि मग पुजा संपन्न झाल्यानंतर एखाद्या सवाशिन स्त्रिला साज श्रृंगाराचे साहित्य जसे की दागिने,वस्त्र याचसोबत फळांचे देखील दान करावे.
  • एकदा हे व्रत जर आपण धरले तर ते आपण अर्धवट सोडु शकत नाही.
  • ह्या दिवशी कोणाची चेष्टा मस्करी करू नये आणि कोणाचा आपल्याकडुन अपमान होईल असे देखील वागु नये.
  • व्रत करत असताना कधीही झोपु नये.


हरितालिकेच्या पुजेचा मुहुर्त काय आहे?| Hartalika muhurat 2021 in marathi

सकाळचा मुहुर्त वेळ :

सकाळी 6 वाजुन 3 मिनिट ते सकाळी 8 वाजुन 3 मिनिटे.

प्रदोषकाळातील मुहुर्त वेळ :

 संध्याकाळच्या वेळेला सहा वाजुन तेतीस मिनिटे ते रात्री आठ वाजुन तेहतीस मिनिटांपर्यत

तृतीया तिथीचा आरंभ वेळ : 

9 सप्टेंबर 2021 रात्री दोन वाजुन 33 मिनिटांनी.

तृतीया तिथीच्या समाप्तीचा वेळ :

10 सप्टेंबर 2021 रात्री 12 बाजुन 18 मिनिटांपर्यत.


हरितालिकेचा पुजा विधी योग्य पध्दत काय आहे?| Hartalika puja kashi karavi kashi mandavi in marathi


हरितालिकेच्या दिवशी प्रत्येक सवाशीण स्त्रीने सकाळी लवकर उठुन अंघोळ वगैरे आटोपुन पुजा करायला हवी पण समजा काही स्त्रीया ह्या व्रताची पुजा सकाळी काही कारणाने नही करू शकल्या तर त्या स्त्रिया प्रदोषकाळात देखील पुजा करू शकतात.

ह्या दिवशी सर्व स्त्रियांनी महादेव आणि देवी पार्वती ह्यांची मातीची मुर्ती तयार करावी.आणि त्यांचे पुजन करावे.पुजा केलेल्याच ठिकाणी आपण थोडेफार फुले देखील सजवून ठेवायला हवीत.मग एक पाट ठेवावे आणि त्यावर महादेव आणि देवी पार्वती ह्यांची प्रतिमा,मुर्ती,तसेच चित्र ठेवावे.यानंतर आपण महादेव आणि पार्वती यांची पुजा करावी.आणि पुजा संपन्न झाल्यानंतर महादेवाला धोतर आणि देवी पार्वतीला स्त्री सौभाग्याच्या सर्व वस्तु अर्पण कराव्यात.त्यानंतर आपण ह्या वस्तु एखाद्या ब्राम्हणाला देखील दान करू शकतो.आणि मग महादेव आणि पार्वती ह्या दोघांची पुजा झाल्यानंतर हरितालिकेच्या व्रताच्या कथेचे श्रवण करावे.यासाठी रात्रभर जागरण देखील केले तरी काही हरकत नाही.आणि मग दुसरे दिवशी सकाळी लवकर उठावे आणि स्नान वगैरे करून पुजा करावी आणि देवी पार्वतीपुढे कुंकु वाहुन आणि प्रसाद ठेवून आपल्या व्रताची सांगता करावी.


Hartalika aarti marathi pdf lyrics mp3 download


➡️. https://youtu.be/QrR8L8BBN9U




हरितालिकेच्या दिवशी पुजेसाठी लागणारे साहित्य कोणकोणते आहेत? |Hartalika puja samagri in marathi 2021 | hartalika puja sahitya marathi

  1. कुंकु 
  2. बांगडया 
  3. टिकली 
  4. मेहंदी 
  5. काजळ 
  6. तुळस 
  7. केळयाची पाने 
  8. वस्त्र 
  9. नारळ 
  10. तुप 
  11. तेल 
  12. दीवा 
  13. बेलाचे पान
  14. लाकडी पाट 
  15. पिवळे वस्त्र 

हरितालिका ह्या व्रताचे वैशिष्टय कोणकोणते?

हरितालिकेचे व्रत हे सवाशिन स्त्रियांबरोबरच अविवाहीत मुली तसेच विधवा स्त्रिया देखील करू शकतात.

अविवाहीत मुली आपल्याला मनासारखा पती प्राप्त होण्यासाठी हे व्रत करतात.

आणि विवाहीत स्त्रिया जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळावा आणि आपला पती निरोगी राहावा आणि त्याला अकाल मृत्यु येऊ नये दिर्घायुष्य लाभावे यासाठी विवाहीत स्त्रिया हे व्रत करत असतात. 

आणि त्या स्त्रिया ज्यांचा पती ह्यात नाहीये त्या स्त्रिया हे व्रत शिव पार्वतीची पुजा,अर्चना,आराधना करण्यासाठी करत असतात.


अश्या प्रकारे आपण हरतालिका पूजा विधी मुहूर्त वेळ व आरती कथा बघितली आहे , माहिती आवडल्यास नक्की शेअर करा .

🔰 हे सुद्धा वाचा - 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad