google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 जागतिक ओझोन दिवस मराठी माहिती निबंध 2022| Jagtik ozone divas in marathi speech Nibandh
Type Here to Get Search Results !

जागतिक ओझोन दिवस मराठी माहिती निबंध 2022| Jagtik ozone divas in marathi speech Nibandh

जागतिक ओझोन दिवस मराठी माहिती निबंध 2022| Jagtik ozone divas in marathi | Ozone day speech in marathi |ozone divas nibandh 

जागतिक ओझोन दिवस मराठी माहिती निबंध 2021


Jagtik ozone divas in marathi 2022 :-

आपण सर्व जमिनीवर राहत असलेल्या सजीव प्राण्यांना आज जिवंत राहण्यासाठी आँक्सिजनची गरज असते.पण आँक्सिजन पेक्षा देखील अशी एक गोष्ट आहे जी आपल्या सर्वासाठी खुप महत्वाची आहे.ती म्हणजे ओझोन वायु म्हणुन आपण पृथ्वीवरील सर्व लोक ओझोन वायुचे रक्षण करण्यासाठी तसेच त्याविषयी जनजागृती करण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी ओझोन दिवस देखील साजरा करत असतो.ज्यात आपल्याला पर्यावरण विभागाकडुन ओझोन वायुचे महत्व पटवुन दिले जाते.त्याच्या संरक्षणासाठी प्रेरित केले जाते.

आजच्या लेखातुन आपण ह्याच ओझोन दिन तसेच ओझोन वायु विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.


ओझोन म्हणजे काय | what is ozone 

ओझोन हा पृथ्वीवरील वेगवेगळया वायुमंडळांमधील एक थर आहे. ओझोन हा एक असा वायु आहे जो वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आपल्याला आढळुन येत असतो. ह्या ओझोन वायचे रासायनिक सुत्र पाहावयास गेले तर ते o3 असे असलेले आपणास दिसुन येते.

ओझोन थर हा सुर्याच्या सुर्यकिरणांना पृथ्वीवर येण्यापासुन रोखायचे काम करत असतो.कारण सुर्यापासुन निघत असलेले सुर्यकिरण हे इतके घातक असतात की ते जर आपल्या शरीरावर पडले तर आपल्याला कर्करोग देखील होऊ शकत असतो.त्यामुळे ओझोन वायु हा सुर्यापासुन निघत असलेल्या किरणांना एकमेकांपासुन वेगळ करतो जेणेकरून त्यांचा प्रभाव होईल जेणेकरून आपल्याला त्याच्यापासुन काही हानी पोहचत नसते.

आज जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीच्या तापमानामध्ये आपल्याला खुपच वाढ होताना दिसुन येते आहे.ह्याचमुळे हवामानामध्ये देखील आपल्याला बदल घडताना आज दिसुन येतो आहे.याचा पर्यावरणावर तसेच पृथ्वीवरील ओझोन थरावर खुपच विपरीत परिणाम आज घडताना आपल्याला दिसुन येते आहे.सुर्यापासुन निघालेली किरणे जमीनीवर पडल्याने अचानक पृथ्वीच्या वातावरणामधील तापमानात वाढ होते आहे.अवेळी पुर वादळे येता आहे.अशा अनेक संकटांना आज आपणास तोंड द्यावे लागते आहे.


ओझोन दिवस कधी आणि केव्हा साजरा केला जातो ?

दर वर्षी संयुक्त राष्ट संघाच्या पर्यावरण विभागाकडुन 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो.


आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस थीम 2022 मराठी |Iinternational ozone day 2022 theme

 जागतिक ओझोन दिवस २०२२ ची थीम
 (Revitalization: Collective Action for the Ocean.) पुनरुज्जीवन: महासागरासाठी सामूहिक कृती ही आहे.


16 सप्टेंबरला जगभर ओझोन दिन का साजरा केला जातो ?

सुर्यापासुन निघत असलेली अतिनिल सुक्ष्म किरणे आज पृथ्वीवर पडल्याने अचानक तापमानात वाढ होणे,अवेळी पुर तसेच वादळ येणे,सुर्यापासुन निघत असलेले किरण आपल्या शरीरावर पडल्याने कर्करोग होणे तसेच इतर सजीव प्राण्यांना हानी पोहचणे असे विपरीत परिणाम आज घडताना आपणास दिसुन येते.

 हे सर्व विपरीत परिणाम रोखण्याचे काम ओझोन वायु करत असतो.कारण ओझोन वायु हा पृथ्वीपासुनच काही अंतरावर असल्यामुळे तो वाटेतच सुर्यापासुन निघत असलेल्या अतिनील सुक्ष्म किरणांना शोषुन घेत असतो.तसेच त्यांना एकमेकांपासुन वेगळ करून त्यांचा प्रभाव कमी करत असतो.ज्यामुळे सजीवसृष्टीचे प्राण वाचत असतात त्यांचे संरक्षण होत असते.

म्हणजेच सर्व पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे प्राण हा एक वायु वाचवण्याचे काम करतो.पण काही कारणास्तव हा ओझोन वायु पृथ्वीवरून दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.याचसाठी ओझोन वायुच्या संरक्षणासाठी त्याच्या संवर्धनासाठी,ओझोन वायुविषयी जनजागृती करण्यासाठी आपण 16 सप्टेंबर रोजी ओझोन दिन साजरा करत असतो.


🎯ओझोन वायुचे महत्व काय आहे ?

आज पृथ्वीवर जी काही सजीव सृष्टी जिवंत आहे त्याचे कारण ओझोन वाय आहे.जो पृथ्वीवर येत असलेल्या किरणांचा नायनाट करत असतो.

ओझोन वायुचे महत्व : 

ओझोन हा एक नैसर्गिक पदधतीने निर्माण होत असलेला प्राणवायु आहे.जो पृथ्वीपासुन चाळीस किलोमीटर एवढया लांब अंतरावर असतो.आणि हा प्राणवायु सुर्यापासुन निर्माण होत असलेल्या सुर्यकिरणांना पृथ्वीवर येण्यापासुन रोखत असतो.

त्याचसोबत सुर्यापासुन निर्माण होत असलेल्या  सुर्यकिरणांना ओझोन वायु एकमेकांपासुन वेगळे करत असतो.ज्यामुळे त्यांचा प्रभाव देखील कमी कमी होत जातो.ज्यामुळे पृथ्वीवरील सजीवांना कोणतीही हानी पोहचत नसते.म्हणजेच पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे रक्षण करण्याचे काम ओझोन वायु करत असतो.


पृथ्वीवरील ओझोन वायु कमी होण्याचे कारण काय आहे? 

आज पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांचे रक्षण हे ओझोन थर करत असतो.पण आज त्याच मानवाच्या जीवणाचे रक्षण करत असलेल्या ओझोन वायुची कमतरता भासु लागली आहे.आणि ही कमतरता भासण्याचे प्रमुख कारण पुढीलप्रमाणे 

रासायनिक संयुगे : 

पृथ्वीवरील ओझोन वायु हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आपणास दिसुन येतो.हे ओझोन वायुचे प्रमाण कमी होण्यास काही अशी घातक रासायनिक संयुगे कारणीभुत आहे.ज्यांमध्ये नायट्रस आँक्साईड,नायट्रीक आँक्साईड,क्लोरोप्लोरो कार्बन ह्या सारख्या रासायनिक वायुंचा समावेश असतो.


पृथ्वीवरील ओझोन वायु कमी होण्याचे परिणाम :

आज आपण पाहावयास गेले तर ज्या ओझोन वायुच्या संरक्षण कवचामुळे सर्व सजीव सृष्टी संरक्षितपणे जीवन जगत आहे.आज तोच ओझोन वायु हा दिवसेंदिवस  कमी होत चाललेला आहे.ह्याचे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत :

  1. जागतिक तापमानवाढ होणे
  2. अवेळी पुर वादळ येणे
  3. सर्व सजीव प्राण्यांची जीवहानी 

1) जागतिक तापमानवाढ होणे :

पृथ्वीवर येत असलेल्या सुर्याच्या किरणांना ओझोन वायु शोषुन घेण्याचे कार्य करतो.पण पृथ्वीवरील ओझोन वायुच्या प्रमाण कमी झाल्यामुळे सुर्यापासुन निर्माण होत असलेली अतिनील सुक्ष्म किरणे ही जमिनीवर पडतात ज्यामुळे जमिनीला छिद्रे देखील पडतात.ज्यामुळे पृथ्वीच्या खालील तप्त भाग हा वर येत असतो.मग पृथ्वीवरील सर्व तापमान हे अवाजवी वाढत असते.ज्याचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीला भोगावा लागतो.

2) अवेळी पुर वादळ येणे :

 पृथ्वीवरील ओझोन वायु कमी होत गेल्यामुळे सुर्याची अतिनील सुक्ष्म किरणे जमिनीवर पडतात ज्याचे परिणाम स्वरुप पृथ्वीवरील तापमानात वाढ होते.ज्यामुळे अकाल पाऊस पडणे,भुकंप येणे,वादळ येणे,नदीला पुर येणे असे प्रकार घडतात.

3) सर्व सजीव प्राण्यांची जीवहानी :

सुर्यापासुन जी अतिनील सुक्ष्म किरणे जमीनीवर पडत असतात ती किरणे जर सजीव प्राण्यांवर म्हणजेच कोणत्याही व्यक्तीवर पडली तर त्याला कर्करोग देखील होऊ शकतो.ही किरणे एखाद्या व्यक्तीच्या डोळयांवर पडली तर त्याला मोतीबिंदुचा आजार देखील होण्याची दाट शक्यता असते.एवढेच नाहीतर ही किरणे जर प्राण्यांवर तसेच पिकांवर पडली तर पिकांची रोगराईमुळे नासाडी होते त्यांच्या वाढीमध्ये खुंट निर्माण होत असते.त्यांची हवी तेवढी चांगल्या पदधतीने वाढ होत नसते.अनेक प्राणी रोगराईमुळे मृत्यृमुखी पडतात.


🎯पृथ्वीवरील कमी होत चाललेल्या ओझोन वायुच्या संरक्षणासाठी उपाय कोणकोणते आहेत ?

सर्व मानव जातीच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी ओझोन वायुचे वातावरणात असणे फार गरजेचे आहे.पण काही रासायनिक वायुंमुळे आणि त्यांच्या आपल्या दैनंदिन जीवणात केलेल्या रोजच्या वापरामुळे ओझोन वायुचे प्रमाण कुठेतरी कमी होत चालले आहे.म्हणुन ह्यासाठी आपण काहीतरी ठोस उपाययोजना करणे देखील अत्यंत गरजेचे आहे.

ओझोन वायू वाचवण्यासाठी उपाययोजना पुढीलप्रमाणे असायला हवी:

वातानुकुलित यंत्रे तसेच शीतकपाटामध्ये हवा थंड करण्यासाठी जे क्लोरोप्लोरोकार्बन तसेच कार्बन टेटाँक्साईड वायु वापरले जात असतात.हे वायु हवेमध्ये जेव्हा मिसळत असतात तेव्हा हे ओझोन थराला नष्ट करण्याचे काम करत असतात.म्हणुन घरगुती वापरात क्लोरोप्लोरा कार्बन तसेच कार्बन टेटाँक्साईडचा वापर करणे टाळावे.

ओझोन वायुचे घटते प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी 1985 मध्ये व्हिएन्ना येथे एक परिषद भरविण्यात आली त्यानंतर 1987 मध्ये कोपनहेगेन येथे संगनमताने असा ठराव करण्यात आला की सीएफसी वर बंदी घालण्यात यावी.आणि ह्या माँण्ट्रीअल करारात अनेक देशांनी आपल्या स्वाक्षरी देखील केल्या ज्यात भारताचा देखील समावेश होता.म्हणजेच ओझोन वायुच्या संरक्षणासाठी सीएफसी वायुवर पुर्णपणे सर्वत्र बंदी घालण्यात आली होती.म्हणुन ओझोन वायुच्या संरक्षणासाठी आपण सीएफसी वायुचा वापर करणे टाळावे.आपण ओझोन वायुच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत.
 अशा पदधतीने आज आपण ओझोन वायुविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेतली आहे.आपल्याला हा लेख कसा वाटला याबद आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त जणांपर्यत ही माहीती शेअर करा.

हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो ?
Ans. जागतिक ओझोन दिवस 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

Q.2) जगात ओझोन वायू कमी होण्याची कारणे कोणती आहेत ?
Ans.ज्यांमध्ये नायट्रस आँक्साईड,नायट्रीक आँक्साईड,क्लोरोप्लोरो कार्बन ह्या सारख्या रासायनिक वायुंचा समावेश असतो.

Q.3) ओझोन म्हणजे काय ?
Ans. ओझोन (O3)हा पृथ्वीवरील वेगवेगळया वायुमंडळांमधील एक थर आहे. ओझोन हा एक असा वायु आहे जो वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आपल्याला आढळुन येत असतो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad