Type Here to Get Search Results !

महात्मा गांधी जयंती मराठी भाषण निबंध 2021 | Mahatma Gandhi Jayanti Bhashan nibandh marathi

महात्मा गांधी जयंती मराठी भाषण निबंध 2021|Mahatma Gandhi Jayanti Bhashan nibandh marathi

महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते होते.महात्मा गांधी यांना आपण राष्टपिता असे देखील संबोधित असतो.अहिंसावादी धोरणाचा अवलंब करून देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यात त्यांचा खुप मोलाचा वाटा असलेला आपणास दिसुन येतो.


गांधी जयंती मराठी भाषण निबंध


महात्मा गांधी जयंती (toc)


आजच्या लेखातुन आपण महात्मा गांधी यांच्या विषयी मराठीत माहिती , महात्मा गांधी कोण होते? आपण महात्मा गांधी यांची जयंती केव्हा,कधी साजरी करतो? तसेच का साजरी करत असतो?तसेच कशापदधतीने साजरी करत असतो?ह्या सर्व बाबींविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.महात्मा गांधी कोण होते?

महात्मा गांधी यांचे संपुर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी होते.महात्मा गांधी हे एक अहिंसावादी,धर्मप्रेमी व्यक्ती होते.भारताला इंग्रजाच्या गुलामीतुन मुक्त करण्यात महात्मा गांधी यांचे खुप मोलाचे योगदान होते.

महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते.त्यांना कोणतेही कार्य प्रेमाने तसेच अहिंसावादी तत्वाने करायला अधिक आवडायचे.कोणी एका गालात मारली तर दुसरा गाल देखील पुढे करावा अशी त्यांची शिकवण होती.महात्मा गांधी चे नाव महात्मा कसे पडले ?

महात्मा गांधी यांच्या अहिंसा ह्याच गुण तसेच कार्य कतृत्वामुळे डाँ रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली होती.तसेच कित्येक लोक त्यांना प्रेमाने,आदराने बापु अशी हाक मारायचे.इसवी सन १९४४ मध्ये प्रथमत डाँ सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्टपिता असे देखील संबोधिले होते.

आपण गांधी जयंती कधी आणि केव्हा साजरी करतो?

प्रत्येक वर्षी २ आँक्टोंबरला संपुर्ण जगभरात आपण महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्टीय अहिंसा दिन म्हणुन साजरी करत असतो.ह्या दिवशी सर्व कामे बंद ठेवली जातात.कारण ह्या दिवशी सार्वजनिक सुटटी जाहीर केलेली असते.२ आँक्टोंबरला महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात येथील पोरबंदर येथे झाला होता.


आपण दरवर्षी गांधी जयंती का साजरी करतो?

आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतुन मुक्त होण्यासाठी महात्मा गांधी यांनी खुप अथक प्रयत्न केले होते.त्यांनी सत्य आणि अहिंसेचे काटेकोरपणे पालन करत कोणतीही हिंसा न करता अहिंसावादी तत्वाने भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्त केले होते.२ आंँक्टोंबरला त्यांची जयंती साजरी करून आपण त्यांच्या ह्याच कार्याची आठवण करून त्यांना श्रदधांजली अर्पण करून त्यांच्या ह्या महान कार्याचा आपण ह्यादिवशी गौरव करत असतो.

तसेच आजच्या तरुण पिढीने देखील महात्मा गांधी यांचा आदर्श डोळयासमोर बाळगत आपल्या देशासाठी महात्मा गांधी प्रमाणेच योगदान द्यायला हवे.हे सांगण्याचा प्रयत्न ही जयंती साजरी करून केला जात असतो.

आपण गांधी जयंती कशी साजरी करतो?

गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधी यांच्या फोटोला आपण पुष्पहार अर्पण करत असतो.आणि त्यांना विनम्रपणे अभिवादन करत असतो.

२ आँक्टोंबरला गांधी जयंतीच्या दिवशी सर्व शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये सुदधा गांधी जयंतीच्या दिवशी वेगवेगळया प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते.ज्यात वादविवाद स्पर्धा,निबंध स्पर्धा,नाटक,रँली,सभा इत्यादींचा समावेश होत असतो.जयंतीचे नाव गांधी जयंती 2021
गांधी जयंती कधी असते?  दर वर्षी गांधी जयंती 2 ऑक्टोबर ला असते
महात्मा गांधी याचा जन्म दिनांक काय आहे? २ ऑक्टोबर, १८६९
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय आहे? मोहनदास करमचन्द गांधी


🔰 महात्मा गांधी यांचे विचार :

कोणत्याही देशाची संस्कृती तिथे राहत असलेल्या रहिवासींच्या हदयात आणि आत्म्यात प्रथम वसत असते.

मुल्यांमधुन विचारांचा जन्म होत असतो.विचारांमधुन शब्दांची निर्मिती होत असते.मग त्यावर आधारीत आपण कृती करत असतो.शेवटी आपल्या कृतीनुसार आपले व्यक्तीमत्व घडत जाते.

जेव्हा आपण एखादे यश हिंसेचा मार्ग अवलंबुन प्राप्त करत असतो तेव्हा आपण प्राप्त केलेले ते यश जास्तकाळ आपल्याजवळ टिकत नसते पण त्याच्यापासुन होणारे नुकसान मात्र दिर्घकाळासाठी असते.महात्मा गांधींनी कोणत्या अकरा तत्वांचा स्वीकार केला होता?

महात्मा गांधी यांनी खालील दिलेल्या अकरा तत्वांचे काटेकोरपणे पालन केले होते.

 1. अहिंसा 
 2. सत्य 
 3. अस्तेय 
 4. ब्रम्हचर्य 
 5. अपरिग्रह 
 6. शरीर श्रम 
 7. आस्वाद 
 8. निर्भयता 
 9. सर्वधर्म समभाव 
 10. स्वदेशी 
 11. अस्पृश्यतेचा त्याग 


१) अहिंसा :

महात्मा गांधींनी कधीही कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी हिंसेचा अवलंब केला नाही.

२) सत्य :

महात्मा गांधी यांनी नेहमी खरे बोलावे ह्या तत्वाचे पालन केले.त्यांनी असत्य बोलू नये ह्याच तत्वाचे नेहमी आचरण केले.

३) अस्तेय :

महात्मा गांधींनी अस्तेय ह्या तत्वाचे पालन करत कधीही चोरी करू नये असे नेहमी सांगितले.

४) ब्रम्हचर्य : 

आपल्या शरीराची आणि मेंदुची त्यांनी नेहमी काळजी घेतली.

५) अपरिग्रह : 

आपल्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत.त्यांचा आपण त्याग करायला हवा ह्या तत्वांचे त्यांनी नेहमी पालन केले.

६) शरीर श्रम : 

महात्मा गांधी यांनी नेहमी श्रमाला म्हणजेच शारीरीक मेहनतीला अधिक महत्व दिले.

७) आस्वाद : 

कोणत्याही वस्तुचा आस्वाद घेणे म्हणजेच रसग्रहण करणे.

८) निर्भयता : 

कधीही घाबरू नये नेहमी निर्भयी निडर राहावे.

९) सर्वधर्म समभाव : 

सर्व धर्माची रचना स्थापणा ही आपल्या चांगल्यासाठीच केली गेली आहे.कोणताही धर्म मोठा नही आणि छोटा सुदधा नाही सर्व धर्म समान आहेत.

१०) स्वदेशी : 

महात्मा गांधींनी स्वदेशीचा स्वीकार केला.त्यांनी नेहमी स्वताच्या देशात तयार केलेल्या वस्तुंचाच आपण वापर करायला हवा अशी शिकवण दिली.

११) अस्पृश्यतेचा त्याग : 

महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेचा म्हणजेच स्पृश्य अस्पृश्य ह्या भेदभावाचा त्याग केला होता.स्वातंत्र्य लढयातील महात्मा गांधी यांचे योगदान :

स्वातंत्र्य लढयामधील गांधीजींची भुमिका फार महत्वाची होती.आफ्रिकेत वास्तव्यास असतानाच त्यांनी आपल्या ह्या कार्यास सुरूवात करून दिली होती.तिथे त्यांनी वर्णभेदाविरुदध आवाज उठवलेल्याचे आपणास दिसुन येते.

बिहारमध्ये नीळ पिकवत असलेल्या शेतकरींवर इंग्रजांनी नीळ लावायचीच अशी सक्ती केली होती.

तेथील सर्व मळे सुदधा ब्रिटीशांच्याच ताब्यात होते.नीळ विकुन जो पैसा यायचा त्यात मळेवाले खुप कमवित होते पण बिचारे शेतकरी मात्र ह्या लाभापासुन वंचित होते.

अशा बिकट परिस्थितीत गांधीजींनी शेतकरींसाठी लढा दिला.ब्रिटीशांनी ह्या मध्ये त्यांना हस्तक्षेप करू नये अशी ताकीद देऊन सुदधा त्यांनी तेथे गेले आणि सत्याग्रहास बसले.मग ब्रिटीश पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.तेव्हा न घाबरता गांधीजींनी मला शिक्षा करा असे ब्रिटीश पोलिसांना ठामपणे सांगितले.सदर घटनेची वार्ता देशभर पसरली.लोकांना याला विरोध करण्यास सुरूवात केली मग शेवटी जनतेच्या दबावात येऊन ब्रिटीशांना गांधीजींविरूदध दाखल केलेला गुन्हा मागे घेऊन गांधीजींना सोडावे लागले होते.

अहमदाबादमधील गिरणीत कामास असलेल्या कामगारांवर तेथील गिरणी मालक अन्याय करत होते.ह्या अन्यायाविरूदध आवाज उठवायची कोणाचीच हिंमत होत नव्हती.अशा परिस्थितीत ह्या अन्यायाविरूदध आवाज उठवणे पण फार गरजेचे होते त्यामुळे गांधीजींनी त्यांच्या हितासाठी संप पुकारला मग शेवटी गिरणी कामगारांचा प्रश्न मार्गी लागला.

महात्मा गांधी यांनी १९१९ मध्ये सरकारने जो रौलेट कायदा लादला होता त्यामुळे समस्त हिंदु धर्मियांवर अन्याय होणार होता.म्हणुन अशा अन्यायकारक कायद्याविरूदध लढा देण्यासाठी गांधीजींनी जनतेला हरताळ पाळण्याचे आवाहन केले.मग जागोजागी मोर्चे काढण्यात आले.ह्या मोर्चांना आळा घालण्यासाठी इंग्रज पोलिसांना लाठीमार करण्यास देखील मागेपुढे बघितले नाही.तरीसुदधा गांधीजींनी घाबरले नाही पण नंतरून ह्या चळवळीला हिंसक वळण लागते आहे हे बघून गांधीजींनी स्वता ही चळवळ थांबवली होती.

एवढेच नाही तर महात्मा गांधींनी इंग्रजांविरूदध असहकार चळवळ सुरू केली होती.ज्यात हिंदी लोकांनी इंग्रजांवर बहिष्कार टाकायचा असा ठराव करण्यात आला होता.ज्यात ब्रिटिश शाळा हिंदी लोकांनी सोडुन आपल्या स्वताच्या शाळा तयार कराव्या ब्रिटीश नोकरींचा त्याग करून स्वदेशी व्यवसाय सुरू करावे असे आवाहन केले होते.

अशा पदधतीने आज आपण महात्मा गांधींविषयी माहीती सविस्तरपणे जाणुन घेतली आहे.सदर लेख कसा वाटला याबाबद आपली प्रतिक्रिया नक्की आम्हास कळवा.तसेच आम्ही दिलेली ही माहीती जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा.जेणेकरून इतरांनाही याचा लाभ घेता येईल.🔘 हे पण वाचा - 


➡️ पितृपक्षात पूजा कशी करावी ?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad