google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 ऋषीपंचमी मराठी माहीती 2021 | Rishi panchami vrat katha puja vidhi marathi 2021
Type Here to Get Search Results !

ऋषीपंचमी मराठी माहीती 2021 | Rishi panchami vrat katha puja vidhi marathi 2021

ऋषीपंचमी मराठी माहीती 2021 | Rishi panchami vrat katha marathi |Rishi panchami 2021 puja vidhi marathi

ऋषीपंचमी मराठी माहिती पूजा विधी मुहूर्त


ऋषीपंचमी हा एक हिंदु धर्मातील अनेक महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणून ओळखला जातो.आणि हा सण एक उत्सव म्हणुन साजरा न करता व्रत म्हणुन साजरा केला जात असतो.

ऋषीपंचमी हा साधु संताच्या सेवेचा दिवस असतो.ज्या दिवशी आपण सप्तत्रषींची पुजा करून झाल्यानंतर सप्त  ऋषींंची कथा ऐकत असतो.आणि मग शेवटी साधु तसेच ब्राम्हणनांना जेऊ घालुन त्यांना दक्षिणा देत असतो. 

चला तर मग अजुन सविस्तरपणे आजच्या लेखातुन ऋषीपंचमी विषयी मराठी माहिती व शुभेच्छा जाणुन घेऊयात.

ऋषीपंचमी काय आहे?Rishi panchami kay aahe ?

ऋषीपंचमी हा एक हिंदु धर्मातील सण आहे.जो भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो.आणि हा सण श्रावन महिन्यात येत असतो.जो महादेव आणि पार्वती यांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो.आणि ऋषीपंचमी ही महादेव आणि पार्वती यांचे पुत्र श्रीगणेश यांच्या जन्माच्या नंतर ११ सप्टेंबर रोजी असते.आणि ह्या दिवशी कोणत्याही एका विशिष्ट देवाची पुजा अर्चना न करता सप्त ऋषींंची पुजा केली जात असते.

ऋषीपंचमी कधी आणि केव्हा आहे 2021 ?

ऋषीपंचमी ही भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या दिवशी असते.

२०२१ मध्ये ऋषीपंचमी कधी आहे?

ऋषीपंचमी २०२१ मध्ये ११ सप्टेंबर रोजी शनिवारी गणेश चतुर्थीच्या दितीय दिनी आहे.

ऋषीपंचमी का साजरी केली जाते?

आजच्या ह्या कलियुगात पाप खुपच वाढत चालले आहे.आणि आपल्या हातुन देखील जाणता तसेच अजाणता खुप पाप घडत असतात.आणि ह्या सर्व पापांपासुन आपल्याला मुक्ती प्राप्त करायची असते.याचे प्रायश्चित आपल्याला करावयाचे असते.

ह्याचसाठी आपण ऋषीपंचमी च्या दिवशी सप्त ऋषींंची पुजा करत असतो.त्यांची मनापासुन सेवा देखील करत असतो.जेणेकरून आपल्याला आपल्या केलेल्या पापांपासुन मुक्ती मिळत असते.

त्याचबरोबर ऋषीपंचमी हा दिवस आपल्या मनातील ऋषींं च्या प्रती असलेला कृतज्ञतेचा भाव तसेच भावना व्यक्त करण्यासाठी साजरा केला जात असतो.

ऋषीपंचमी कशा पदधतीने साजरी केली जाते?

अंघोळ झाल्यानंतर स्त्रिया ऋषीपंचमी च्या दिवशी सर्व सप्त ऋषींंची म्हणजेच महर्षी कश्यप,भारदवाज,अत्री ऋषींं,विश्वामित्र,गौतम ऋषीं,वसिष्ठ,जमदगनी ऋषींं ह्या सगळयांची पुजा करत असतात.आणि पुजेनंतर ह्या सप्त ऋषींंचे नदीमध्ये विसर्जन करत असतात.आणि ह्या दिवशी स्त्रिया नांगरापासुन उत्पन्न केलेल्या धान्याचे देखील अजिबात सेवन करत नसतात.

ऋषीपंचमीच्या व्रताचे महत्व काय आहे?Rishi panchami vratache mahatva 

कोणताही पुरूष तसेच स्त्रीकडुन जाणता अजाणतापणे आपल्या हातुन घडलेल्या चुका,पापांपासुन मुक्ती मिळवण्यासाठी ऋषीपंचमी च्या दिवशी व्रत केले जात असते.

आणि ह्या दिवशी जर आपण त्रषींची पुजा केली त्यांची सेवा केली तर आपल्याला आपल्या सर्व पापांपासुन मुक्ती मिळत असते.

आणि ह्या दिवशी जर आपण पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली अडकलेली कामे देखील पुर्ण होत असतात.

ऋषीपंचमी च्या दिवशी स्त्रिया तसेच पुरुषही व्रत तसेच उपवास का करतात?

सप्त ऋषींं विषयीची आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या दिवशी स्त्रिया तसेच पुरूषांकडुनही व्रत तसेच उपवास केला जात असतो. 

त्याचबरोबर आपल्या हातुन एखादी मोठी भयंकर चुक घडली असेल किंवा जाणुनबुजुन तसेच अजाणता एखादे पाप झाले असेल तर त्याचे प्रायश्चित भोगण्यासाठी आणि 

त्या केलेल्या पापांच्या आत्मग्लानीतुन मुक्त होण्यासाठी ह्या दिवशी आपण सप्त ऋषींंची पुजा करत असतो.आणि व्रत तसेच उपवास देखील ठेवत असतो.

ऋषीपंचमी च्या दिवशी व्रत करताना पाळावयाचे नियम कोणकोणते आहेत? Rishi panchami vrat Niyam marathi

  1. ऋषींं पंचमीच्या दिवशी आपण प्रामुख्याने सप्त ऋषींं चे तसेच देवी अरूंधतीचे पुजन करावयाचे असते.
  2. ह्या दिवशी गायीच्या शेणाने सर्व घर सारवले जाते.
  3. ह्यादिवशी आपण कोणाची निंदा करायची नाही तसेच कोणाला वाईट वाटेल असे अपशब्द देखील वापरायचे नसतात.
  4. ह्या दिवशी आपण भिक्षुकांना दान करावे त्यांना रिकाम्या हाती पाठवून निराश करू नये. 
  5. ऋषीपंचमी च्या दिवशी घरात लसुण तसेच कांदयाचा वापर अजिबात करू नये.
  6. ह्या दिवशी साधुसंतांची सेवा करावी.
  7. ह्या दिवशी कोणत्याही पक्षी तसेच प्राण्याला त्रास देऊ नये,त्याला मारू नये.
  8. ह्या दिवशी आपण फक्त जमिनीतुन पेरून उगवलेल्या धान्याचेच सेवन करायला हवे.
  9. ब्राम्हणांना ह्या दिवशी जेऊ घालावे आणि त्यांना दक्षिणा देखील द्यावी.

ऋषीपंचमी च्या दिवशी पुजेचा शुभ मुहुर्त काय आहे 2021?

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पंचमीच्या दिवशी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०३ ते १ वाजुन ३२ मिनिटांपर्यत पूजेसाठी शुभ मुहुर्त आहे.

पंचमीचा तिथी प्रारंभ :

 १० सप्टेंबर २०२१ रोजी ९.५७ वाजेचा आहे.

पंचमीचा तिथी समाप्त हा ११ सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ७.३७ ला होणार आहे.

ऋषीपंचमी साठी पुजा साहित्य | Rishi panchami sahitya

?

  • मातीचा दिवा 
  • केळयाची पाने
  • नारळ 
  • मातीचा कलश
  • पंचामृत 
  • तांदुळ
  • दुध
  • दही
  • तुप 
  • हळद 
  • लवंग
  • विलायची 
  • आंब्याची पाने
  • पीठ
  • कापुर
  • किशमिश
  • काजु 
  • आणि सात प्रकारचे नैवैद्य
  • दहा बदाम 
  • केळी आठ
  • गायीचे शेण
  • गोमुत्र 
  • गाईचे दूध

ऋषीपंचमीची पुजा विधी काय आहे? | Rishi panchami 2021 puja vidhi marathi

ऋषींं पंचमीच्या दिवशी लवकर उठुन एखाद्या नदी तसेच समुद्रात अंघोळ करावी.

ह्या नंतर आपले घर गायीच्या शेणाने सारवून घ्यावे.

यांतर सप्त ऋषींं आणि देवी अरूंधती यांची प्रतिमा तयार करून घ्यावी.

सप्त ऋषींं आणि देवी अरूंधती यांची प्रतिमा तयार करुन झाल्यानंतर कलश स्थापित करायला हवा. 

मग सप्त ऋषींंना अंघोळ घालावी आणि त्यानंतर हळद,चंदन आणि फुले,अक्षदांनी त्यांची पुजा करावी.

शेवटी मंत्रजाप करून झाल्यावर आणि सप्त ऋषींंची च्या कथेचे श्रवण करावे.मग जमिनीत पेरलेल्या तसेच उगवलेल्या धान्याचे सेवन करावे.

अशा पदधतीने आज आपण ऋषी पंचमी विषयी सविस्तरपणे सर्व माहीती जाणुन घेतली आहे.आपल्याला ही माहीती कशी वाटली याबाबद आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.आणि जास्तीत जास्त ठिकाणी ही माहीती शेअर करा.



🔰 हे सुद्धा वाचा - 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad