Type Here to Get Search Results !

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठी निबंध भाषण चारोळी | marathwada mukti sangram din marathi mahiti nibandh

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठी निबंध भाषण चारोळी | marathwada mukti sangram din marathi mahiti nibandh 

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन २०२२ :-  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस हा संपुर्ण महाराष्टात १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.हाच तो दिवस आहे ज्या दिवशी मराठवाडयावर निजामने जी सत्ता स्थापण केली होती.त्याची ती सत्ता संपुष्टात आली. आणि मराठवाडा हा आपल्या भारत देशाचा वाटा बनला.
आजच्या लेखातुन आपण ह्याच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

मराठवाडा काय आहे ?

  मराठवाडा हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा प्रशासकीय भाग म्हणुन ओळखला जातो. ज्यात औरंगाबाद, बीड,उस्मानाबाद,लातुर,परभणी तसेच नांदेड इत्यादी जिल्हयांचा समावेश होतो. याचबरोबर आपण दक्षिणगंगा म्हणुन ज्या गोदावरी नदीला ओळखतो ती गोदावरी मराठवाडयाच्या जिल्हयांमधुनच वाहताना आपणास दिसुन येते.येथील लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात. आपण जर मराठवाडयाच्या ऐतिहासिक पार्श्व्भुमीचा अभ्यास करावयास गेलो तर आपणास हे देखील दिसुन येते की मराठवाडयात अजिंठा,वेरूळ, देवगिरी कंधार असे अनेक ऐतिहासिक किल्ले वसलेले आहेत.एवढेच नव्हे तर येथे अनेक संत होऊन गेलेली पैठण तसेच तुळजापुर ह्यासारख्या संतभुमींचा देखील समावेश होतो.जायकवाडी सारखा मोठा प्रकल्प देखील मराठवाडयातच राबवला गेलेला आहे.


मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कशाला म्हणतात ?

१७ सप्टेंबर ह्या दिवशी निजामाच्या ताब्यात असलेला मराठवाडा भारताच्या ताब्यात पुर्णपणे आला. याचदिवशी निजामने मराठवाडयावर असलेली त्याची सत्ता सोडली आणि मराठवाडयाची निजामाच्या तावडीतुन कायमची सुटका झाली म्हणुन ह्या दिवसाला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असे म्हटले जाते.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी आणि केव्हा साजरा केला जातो?

संपुर्ण महाराष्टात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस हा दर वर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

➡️ शिक्षक दिन भाषण मराठी माहिती


🎯 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे महत्व :

१५ आँगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या सत्तेतुन मुक्त झाला होता.तेव्हा भारताचे विविध संस्थानांमध्ये विभाजन करण्यात आले.पण ५६५ संस्थानांमधुन फक्त ५६२ संस्थानांनीच भारतामध्ये विलीन होण्यास स्वीकृती दिली होती.हैदराबाद,जुनागढ तसेच काश्मीर या संस्थानांनी विलिन होण्यास नकार देत स्वताला वेगळे घोषित केले होते.अशा परिस्थितीत भारत स्वातंत्र झाल्यानंतर देखील त्याचे दोन राष्ट निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती.

मग अशा परिस्थितीत सरदार वल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली १३ सप्टेंबर १९४८ मध्ये काही महत्वाच्या कारवाया करण्यात आल्या आणि फक्त तीन दिवसांमध्येच हैदराबाद संस्थानात असलेल्या सर्व महत्वाच्या केंद्रावर भारतीय सेनेने ताबा मिळवला होता.

मग भारत सरकारकडुन आपल्याला अटक केली जाऊ नये यासाठी निजामाने शरणागती पत्कारण्याचा निर्णय घेतला.मग त्याने मराठवाडयावरील आपली सर्व सत्ता सोडली.ह्या हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढाईत बाबासाहेब परांजपे,साहेबराव वारडकर,अनंत भालेराव ह्यांचा खूप महत्वाचा वाटा असलेला आपल्याला दिसुन येते.एवढेच नाही तर सामान्य लोकांचा देखील ह्या मुक्तीसंग्रामामध्ये समावेश असलेला आपणास दिसुन येतो.


मराठवाडा मुक्ती संग्रामात कोणी आणि काय भुमिका पार पाडली?

१) सरदार वल्लभाई पटेल यांचे योगदान :

 आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक देशांनी आपली संस्थाने भारतामध्ये विलिन करण्यास स्वीकृती दिली पण दक्षिण भागातील हैदराबाद हे संस्थान भारतात विलिन होण्यास अजिबात तयार देखील नव्हते.

देश स्वतंत्र झाला होता तरी देखील जनतेला गुलामीखाली जगावे लागत होते.अशा परिस्थितीत सरदार वल्लभाई पटेल यांनी हैदराबाद मुक्तीची सुत्रे आपल्या हातात घेतली.मग सरदार वल्लभाई पटेल यांनी ह्या क्षेत्रात सैनिकी कारवाया करण्यास सुरूवात केली.असे केल्याने मोजुन काहीच दिवसात भारतीय सेनेने हैदराबाद संस्थानामधील सर्व महत्वाच्या केंद्रावर आपले अधिराज्य स्थापण करण्यास यश प्राप्त केले.

मग भारत सरकार आता आपल्याला देखील अटक करणार ही चिन्हे दिसु लागताच निजामाने भारत सरकारला शरण जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या अधिराज्याखाली असलेल्या मराठवाडयातील हैदरातील संस्थान भारताला पुन्हा वापस केले.


२) हैदराबाद मुक्ती संग्रामात महिलांचे योगदान :

हैदराबाद संस्थानात स्त्रियांना अतिशय हिन पदधतीने वागवले जात होते.तसेच त्यांना अतिशय खालच्या दर्जाचे स्थान दिले जात होते.लहान वयात मुलींचे विवाह लावुन देणे म्हणजेच बालविवाह,बालविधवा, अक्षर ज्ञान नसणे,दारिद्रयमय जीवन,कुपोषण अशा पदधतीच्या अनेक अनिष्ठ रुढी परंपरांमध्ये स्त्रिया जखडल्या गेलेल्या होत्या.म्हणुन स्त्रियांनी देखील ह्या अनिष्ठ रूढी परंपरांविरुदध तसेच गुलामगिरीविरूदध लढण्यास सुरूवात केली.हैदराबाद मुक्ती संग्रामात योगदान दिलेल्या महिलांचे दोन कालखंड पडतात. यात पहिल्या कालखंडातील स्त्रियांनी ग्रंथालये चालविण्यास, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यास, तसेच चळवळीतील कार्यकत्यांना अन्न पुरविण्यास सुरूवात केली.
दितीय कालखंडातील स्त्रियांमध्ये दगडाबाई शेळके,तारा परांजपे,शकुंतला साले इत्यादी महिलांचा ह्या हैदराबाद मुक्ती संग्रामात समावेश होता.

🆕 जागतिक ओझोन दिन मराठी माहिती


3) हैदराबाद मुक्ती संग्रामात आर्य समाजाचे योगदान : 

हैदराबाद संस्थानात निजामाच्या अन्यायी राजवटीविरूदध लढा देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आपणास दिसुन येते.पण निजामाच्या गुलामगिरी राजवटीविरूदध सर्वप्रथम आवाज उठविण्याचे काम हे आर्य समाजाने केले होते.२४ आँक्टोंबर १९३८ ते ७ आँगस्ट १९३९ ह्या कालखंडामध्ये आर्य समाजाचे अनेक सत्याग्रहींना ह्या जुलमी राजवटीविरूदध लढा देण्यासाठी तुरूंगात देखील बसावे लागले होते.निजामाला समस्त हैदराबाद हे मुस्लिम धर्मिय असलेले ठिकाण करून टाकायचे होते.
पण हैदराबाद संस्थानात जास्तीत जास्त हिंदुची संख्या होती.मग हैदराबाद संस्थानात समस्त मुस्लिम धर्माची स्थापणा करण्यासाठी निजामाने हिंदु धर्मियांना मुस्लिम धर्मात आणण्यासाठी कटकारस्थान रचणे सुरू केले.यासाठी हिंदु धर्मियांना मारझोड करून बळजबरी धर्मातर करावयास भाग पाडण्याचे काम देखील निजामाने केले.
यासाठी त्याने हैदराबाद संस्थानातील अनेक गावांची नावे बदलुन टाकलीत आणि त्यांना मुस्लिम नाम देण्यास सुरूवात केली.ज्यात त्याने बीदर ह्या गावाचे नाव मोहमदाबाद,धाराशिवचे नाव उस्मानाबाद असे करून टाकले.निजामाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले त्याचे सर्व ईस्लाम धर्मातील मौलवी हे सुदधा त्याच्या कार्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी हिंदु धर्मातील दलितांना भडकविण्यास सुरूवात केली.हिंदु धर्मात त्यांच्यावर खुप मोठा अन्याय केला जातो आहे त्यांची पिळवणुक केली जाते आहे असे चित्र त्यांच्या डोळयासमोर उभे केले.
सोबतच हिंदुंची हत्या करण्यास देखील निजामाने सुरूवात केली.हिंदु धर्मातील स्त्रियांवर अत्याचार करणे सुरू केले.तसेच लहान मुलांच्या हत्या देखील केल्या.
असे केल्याने आपली जास्तीत जास्त लोकसंख्या असुनही हिंदु धर्मीय लोक मुस्लिमांच्या अधिपत्यात जगणे सुरू झाले होते.त्यातच कोणी ह्या विरूदध आवाज उठविण्याचा प्रयत्न केला त्याला तुरूंगात टाकण्यात येत होते.
अशा बिकट परिस्थितीत हिंदु जनतेपुढे दोनच पर्याय उरले होते एक म्हणजे मुस्लिम धर्मात प्रवेश करून त्याचा स्वीकार करणे दुसरे ह्या अन्यायाविरूदध लढुन आवाज उठवून संघर्ष करणे.अशा तटीच्या वेळी हैदराबाद संस्थानात आर्य समाजाचा उदय झाला.मग नवनवीन स्थापित झालेल्या ह्या आर्य समाजाने हैदराबाद संस्थानात हिंदु धर्मिय लोकांसाठी मंदीरे उभारण्यास सुरूवात केली.आणि हिंदु धर्माच्या प्रचार प्रसाराचा प्रारंभ केला.ह्यामुळे जे हिंदु धर्मातील लोक निजामाला घाबरून मुस्लिम धर्मात गेले होते त्यांना देखील आशेचा एक किरण दिसु लागला मग ते ही हळुहळु आर्य समाजाचा आधार पाठिंबा आपल्याला मिळत आहे हे बघून पुन्हा हिंदु धर्मात वापस येऊ लागले.
निजामाच्या लक्षात ही बाब येताच त्याने आर्य समाजाला आपल्या रस्त्यातुन हटविण्यासाठी आर्य समाजावर वेगवेगळया प्रकारच्या बंदी लावण्यास सुरुवात केली.आर्य समाजाची मंदिरे पाडली,आर्य समाजाच्या धर्म प्रचारावर बंदी घातली.आर्य समाजातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरबंद करून टाकले.हे सर्व खोटे आळ मागे घेऊन मैत्रीचा करार करण्याचा प्रस्ताव आर्य समाजाने निजामासमोर ठेवला पण धर्मप्रसाराच्या वेडात असलेल्या निजामाने आपले कारस्थान बंद केले नाही.

मग आर्य समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने ह्या अन्यायाविरूदध सत्याग्रह करून आवाज उठविण्याचा निर्णय घेतला.पण तिथेही निजामाने सर्व सत्याग्रहींना सत्याग्रहाला बसण्या अगोदरच जेरबंद करून टाकले.याचेच भयंकर पडसाद पुढे उमटले यावर संतप्त आर्य समाजाच्या संघटनांनी जेलभरो आंदोलन सुरू केले.मग आर्य समाजाच्या रोषाला संतप्त प्रतिक्रियांना कंटाळलेल्या निजामाने शेवटी हैदराबाद संस्थानात आर्य समाजावर लादलेले प्रतिबंध मागे घेतले तसेच कालांतराने हैदराबाद संस्थानावरील आपले अधिपत्य देखील सोडले.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

Q.2) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन का साजरा केला जातो ?
Ans. हाच तो दिवस आहे ज्या दिवशी मराठवाडयावर निजामने जी सत्ता स्थापण केली होती.त्याची ती सत्ता संपुष्टात आली. आणि मराठवाडा हा आपल्या भारत देशाचा वाटा बनला.

Q.3) मराठवाडा या भागात कोणकोणते जिल्ह येतात ?
Ans. मराठवाडा हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा प्रशासकीय भाग म्हणुन ओळखला जातो. ज्यात औरंगाबाद, बीड,उस्मानाबाद,लातुर,परभणी तसेच नांदेड इत्यादी जिल्हयांचा समावेश होतो. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.