google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 पितृपक्षात पूजा कशी करावी मराठी माहिती | Pitru paksha 2021 puja kashi karavi
Type Here to Get Search Results !

पितृपक्षात पूजा कशी करावी मराठी माहिती | Pitru paksha 2021 puja kashi karavi

पितृपक्षात पूजा कशी करावी ? | पितृपक्ष माहीती मराठी 2021 | Pitru paksha 2021 puja kashi karavi marathi mahiti.


आपण सर्व हिंदु धर्मातील व्यक्ती आपल्या पितरांची आठवण काढतो ते दिवस म्हणजे पितृपक्षाचे दिवस.असे म्हणतात की ह्या पंधरा दिवसांच्या कालावधीत जर आपण एखाद्या गायीला,कावळयाला,कुत्र्याला जर विविध पदार्थ खाऊ घातले.तर आपले ते प्राणी तसेच पक्षीला खाऊ घातलेले पदार्थ थेट आपल्या पितरांपर्यत जाऊन पोहचतात.ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होत असते.कारण ते पदार्थ खाऊन त्यांचा अतृप्त आत्मा हा तृप्त होत असतो.म्हणुन आपण पितृपक्षात गायी,कुत्रा,कावळा ह्या सारख्या पक्षी तसेच प्राण्यांना अन्नदान करायला हवे असे म्हटले जाते.

पितृपक्षाविषयीच्या अशा ह्या सर्व महत्वाच्या बाबींची माहीती आपणा सर्वापर्यत पोहचावी म्हणुन पितृपक्ष ह्याविषयी आजच्या लेखातुन आपण सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

पितृपक्ष म्हणजे काय? (pitru paksha mhanje kay ?)

पितृपक्षा विषयी पाहावयास गेले तर आपणास असे दिसुन येते की पितृ पक्ष हा सोळा दिवसांचा असा एक कालखंड असतो.ज्या कालखंडामध्ये सर्व हिंदु धर्मातील व्यक्ती आपल्या पितरांची आठवण काढत असतात आणि ह्या कालखंडात हिंदु धर्मातील व्यक्ती फक्त आपल्या पितरांना स्मरण करत नसतात तर त्यांच्या नावाने पिंडदान करण्याचे कार्य देखील करत असतात.

 गीतेच्या नवव्या अध्यायातील 25 व्या क्रमांकाच्या श्लोकानुसार असे म्हटले जाते की आपण ज्याचे पुजन करतो आपण त्याच्याजवळ मृत्युनंतर जात असतो.म्हणजेच आपल्याला त्याची प्राप्ती होत असते.म्हणुन असे मानले जाते की आपण फक्त परमात्म्याचीच पुजा करायला हवी.कारण हाच आपल्यासाठी परमात्मा प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे.म्हणुन अनेक जण परमात्मयाचेच पुजन करायला अधिक पसंती दर्शवतात.


पितृपक्ष 2021 कधी आणि केव्हा आहे? ( pitru paksha 2021 kadhi aahe ?)


2021 मध्ये पितृपक्षाची सुरूवात ही भाद्रपद महिन्याच्या सुरूवातीला 20 सप्टेंबरला होते आहे.आणि हे पितृपक्ष 6 आँक्टोंबर अमावस्येपर्यत सलग 15 दिवस चालणार आहे.


पितृपक्षात काय करत असतात? (Pitru pakshat kay kartat?)

पितृपक्षाच्या कालावधीत आपण आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी ह्या उददिष्टाने त्यांच्यासाठी श्रादध पुजा करत असतो.ज्याला आपण आपल्या भाषेत श्रादध कर्म असे देखील म्हणत असतो.श्रादध कर्म हे आपण पितरांच्या मरणाच्या तिथीनंतर प्रतिपदा ते अमावस्या ह्या कालावधीच्या दरम्यान करावयाचे असते.

अनाहुतपणे जर समजा आपणास आपल्या पितरांच्या मृत्युचा तिथी ज्ञात नसेल तर आपण पितृपक्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला देखील त्यांचे श्रादध घालु शकतो.असे म्हटले जाते की आपण जर आपल्या पितरांचे श्रादध केले नही तर त्यांच्या आत्म्याला शांतता लाभत नसते.म्हणुन आपण प्रत्येकाने आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मृत्युनंतर आपल्या पितरांचे नियम आणि विधीनुसार श्रादध करणे खुप गरजेचे असते.


आपण पितृपक्षाचे श्रादध करणे का आवश्यक असते? ( Pitru pakshat shraddha ka ghaltat?)

 आपण पितृपक्षाचे श्रादध करणे का आणि किती आवश्यक आहे? हे आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सुदधा सांगितले गेले आहे.ज्योतिषशास्त्रात असे स्पष्टपणे नमुद केले आहे की जर आपल्याला पितृदोषाची समस्या असेल तर आपल्याला ह्यामुळे खुप अडीअडचणींना सामोरे जावे लागत असते.चला तर मग ह्या समस्या काय असतात? कोणत्या असतात? त्या आपण जाणुन घेऊयात.


पितृपक्षाचे श्रादध करण्याची काही प्रमुख कारणे:

1)यश प्राप्ती न होणे: असे म्हणतात की जर आपल्या भाग्यात पितृदोष असेल तर हातात आलेले मोठे यश सुदधा आपल्या हातातुन निसटुन दुसरीकडे निघुन जाते.

म्हणुन आपण पितृदोषाचे निवारण करण्यासाठी आपण पितरांचे वेळेवर श्रादध करणे खुप आवश्यक असते.

2) संतती प्राप्तीची समस्या :असे देखील म्हटले जाते की ज्या व्यक्तींनी आपल्या पितरांचे श्रादध केलेले नसते.त्यांना संततीसुख प्राप्त होत नसते.

3) ऐश्वर्य धन संपत्तीचा नाश :जर आपण आपल्या पितरांचे श्रादध केले नाही तर आत्तापर्यत आपण जी काही संपत्ती अर्जित केलेली आहे.ती सर्व पितृदोषामुळे आपल्यापासुन हिरावली जाऊ शकते.


सणाचे नाव पितृपक्ष 2021
पितृपक्ष कधी पासून सुरू होत आहे? 20 सप्टेंबर 2021
पितृपक्ष कधी संपणार आहे? 06 ऑक्टोबर 2021
पितृपक्ष तिथी कोणत्या आहेत 20 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर 2021

🆕 पितृपक्षातील श्रादधाच्या तिथी कोणकोणत्या आहेत? (Pitru paksha shraddha muhurt tithi marathi)


पितृपक्षातील असलेल्या श्रादधाच्या तिथी ह्या पुढीलप्रमाणे आहेत


  • २० सप्टेंबर  - पौर्णिमा श्राद्ध
  • २१ सप्टेंबर  - प्रतिपदा श्राद्ध
  • २२ सप्टेंबर  - दितीया श्राद्ध
  • २३ सप्टेंबर  - तृतीया श्राद्ध
  • २४ सप्टेंबर - चतुर्थी श्राद्ध
  • २५ सप्टेंबर - पंचमी श्राद्ध 
  • २७ सप्टेंबर  -षष्ठी श्राद्ध
  • २८ सप्टेंबर - सप्तमी श्राद्ध 
  • २९ सप्टेंबर - अष्टमी श्राद्ध
  • ३० सप्टेंबर  -नवमी श्राद्ध
  • १ आँक्टोंबर - दशमी श्राद्ध
  • २ आँक्टोंबर - एकादशी श्राद्ध
  • ३ आँक्टोंबर - दादशी श्राद्ध
  • ४ आँक्टोंबर - त्रयोदशी श्राद्ध
  • ५ आँक्टोंबर - चतुर्दशी श्राद्ध
  • ६ आँक्टोंबर - अमावस्या श्राद्ध

पितृपक्षाचे महत्व काय आहे?

पितृपक्षामध्ये जर आपण पित्तरांना जेऊ घातले तसेच त्यांचा पुजा केली तर आपल्याला आयुष्यात कधीच यशप्राप्तीच्या मार्गात कुठल्याही प्रकारचे कोणतेही आडफाटे येत नसतात.आणि आपण नेहमी आनंदी आणि सुखी राहत नसतो.

असे म्हटले जाते की जर आपण पितृपक्षात आपल्या पितरांना जलदान केले तर ते आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला चांगला आशिर्वाद देखील देत असतात.

पितृदोषामूळे ज्या अडचणी अडथळे आपल्या आयुष्यात येत असतात ते येणे बंद होते. 

पितृपक्षाच्या पुजेसाठी लागणारे साहित्य कोणकोणते आहे? ( Pitru paksha puja sahitya samagri marathi) 

पितृपक्षाच्या पुजेसाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे 

  • काळ तीळ
  • जव
  • तांदुळ
  • गंगाजल


पितृपक्षातील पुजा विधी काय असतो? ( Pitru paksha puja vidhi marathi)

पितृपक्षातील पुजा विधी


पितृपक्ष हा एक असा कालखंड असतो ज्या कालखंडात आपल्याला आपल्या मृत पुर्वजांची सेवा सुश्रुषा करावयास मिळत असते.त्यांना जलदान करावयाचे असते.

चला तर मग जाणुन घेऊयात पितृपक्षातील पुजा विधी विषयी सविस्तरपणे.


पितृपक्षातील पुजा विधी |पूजा कशी करावी मराठी ?:


  1. सगळयात आधी लवकर उठुन स्नान वगैरे आटोपुन घ्यावे आणि कोणीही स्पर्श न केलेले धोतर म्हणजेच शुदध वस्त्र परिधान करावे.
  2. मग पुजेला बसण्यासाठी आपले आसन ग्रहण करावे पण बसताना आपले मुख पुर्व दिशेला ठेवावे.
  3. आपले मुख पुर्व दिशेला ठेवुन आसन ग्रहण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडुन आपल्या पित्रांचे स्मरण करावे.
  4. मग पितरांना आपल्या पुजेचा स्वीकार करण्यासाठी आमंत्रित करावयाचे असते.
  5. मग पितरांसमोर फुल,तीळ,पाणी अर्पण करावे.
  6. ज्या दिवशी पितर वारले असतात त्या दिवशी त्यांचे नाव घेऊन प्राणी तसेच पक्षींना(कावळा,कुत्रा,गाय) अन्न दान करावे.


पितृपक्षात आपण काय करावे आणि काय करू नये?

पितृपक्षात आपण काय करावे :


  • पितृपक्षात जेवण वाढत असताना आपण कधीही एकाच प्रकारचे अन्न पदार्थ वाढावेत.
  • भुकेलेल्यांना तसेच गरिबांना जेऊ घालावे.
  • माणसांसोबतच प्राणी तसेच पक्षींना देखील जेऊ घालावे.
  • आपले पुर्वज हे कोणत्याही रुपाने आपल्यासमोर येत असतात म्हणुन आपण प्रत्येक सजीव प्राणी तसेच पक्ष्याचा आदर तसेच सम्मान करायला हवा.
  • पितृपक्षात आपण पिंडदान देखील करायला हवे.


पितृपक्षात आपण काय करू नये :


  • पितृपक्षात कुठल्याही प्रकारच्या मांसाहारी जेवणाचे अजिबात सेवन आपण अजिबात करू नये.याचसोबत आपण पितृपक्षात लसुण,काळ मीठ,काळया रंगाची उडदाची दाळ,ह्या सारख्या पदार्थाचे देखील सेवन करू नये.
  • पितृपक्षात सुपारी,तंबाखु,गुटखा,दारू अशा  कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन आपण करू नये.
  • पितृपक्षात कोणत्याही प्रकारची नवीन वस्तु जसे की कार,घर यांची खरेदी आपण करू नये.
  • पितृपक्षात आपण केशवपण म्हणजेच दाढी कटिंग करू नये.आणि जर करायची असेल तर पितृपक्षाची सुरूवात होण्याच्या एक दिवस आधीच दाढी,कटिंग करून घ्यावी. 
  • पितृपक्षात आपण कोणते नियम पाळावयाचे असतात?


पितृपक्षात पाळावयाचे नियम :


पितरांचे श्रादध करण्याचा मुख्य अधिकार हा मोठया मुलाचा असतो.पण समजा जर मोठा मुलगा ह्यात नसेल तर त्याच्याजागी घरातील छोटा मुलगा देखील श्रादधाला बसु शकतो.

जर मोठया मुलाचा विवाह झालेला असेल तर त्याच्यासोबत श्रादधासाठी बसण्याचा अधिकार त्याच्या पत्नीला देखील असतो. 

अंतिम निष्कर्ष :अशा पदधतीने आज आपण पितृपक्षाविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेतली आहे.तरी ही माहिती आपल्याला कशी वाटली याबाबद आपली प्रतिक्रिया नक्की आम्हास कळवा.

तसेच ही माहीती इतरांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या माहीतीचा लाभ उठवता येईल.


🔰 हे सुद्धा वाचा - 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad