google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 श्री चक्रधर स्वामी जयंती 2021 आरती पाळणा भजन | महानुभाव पंथ | chakradhar swami jayanti 2021 Arti palana bhajan
Type Here to Get Search Results !

श्री चक्रधर स्वामी जयंती 2021 आरती पाळणा भजन | महानुभाव पंथ | chakradhar swami jayanti 2021 Arti palana bhajan

श्री चक्रधर स्वामी जयंती 2021 आरती पाळणा भजन | महानुभाव पंथ| chakradhar swami jayanti 2021 Arti palana bhajan

 
       
चक्रधर स्वामी जयंती 2021 आरती पाळणा भजन


चक्रधर स्वामी जयंती 2021 दिनांक 30 ऑक्टोम्बर 2021 वार शनिवार या दिवशी साजरी केली जाते.
   

 श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती

श्री चक्रधर स्वामींची माहिती लीळाचरित्राच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. सर्वज्ञ श्री चक्रधरांचे जन्म नाव हरपाळदेव असे होते.
 तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला. पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला.

बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले.

महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसरा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला.

हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता. ही अवतारधारणाची घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली.
या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणैकऱ्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली.

शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकऱ्याचे पैसे परत केले. या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला.

परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता.

त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेलें.

सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत अस्तांना हरपाळदेव ऋद्धिपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंदप्रभू दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या. याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले.


श्री चक्रधर स्वामींची शिकवण

ससिक रक्षण
बऱ्याच वर्षापूर्वी श्रीचक्रधर स्वामी नावाचे थोर महात्मा होऊन गेले.प्राणिमात्रांवर दया करावी, कोणत्याही जिवाला त्रास देऊ नये. कोणताही जीव मोठा किंवा छोटा मानू नये,' अशी त्यांची शिकवण होती.एकदा काय झाले. रानात दोन शिकाऱ्यांमध्ये शर्यत लागली.मग त्यांनी झुडपातून एक ससा उठवला. ससा घावरून जोरात पळू लागला.श्रीचक्रधर स्वामी एका मोठ्या झाडाखाली शांत बसले होते.घाबरलेला ससा चक्रधर स्वामींच्या मांडीखाली जाऊन बसला.श्रीचक्रधर स्वामींनी त्याला प्रेमाने कुरवाळले.इतक्यात कुत्री आणि शिकारी श्रीचक्रधर स्वामींजवळ पोचले. शिकाऱ्यांनी चक्रधर स्वामींना ससा देण्याची विनंती केली."जी! जी! ससा सोडावा. शिकारी म्हणाले.शिकारी म्हणाले, "स्वामी, हा आमच्या शर्यतीतला ससा आहे, तो आम्हांला द्यावा ""शरण आलेल्या कोणत्याही जिवाला जीवन द्यायचे असते. हा ससा रानात राहतो, गवत खातो, ओढया नदीचे पाणी पितो. त्याला झुडपातून का उठवले?त्याने तुमचे काय विघडविले? विनाकारण का मारता तुम्ही त्याला?" श्रीचक्रधर स्वामी म्हणाले.श्रीचक्रधर स्वामींच्या बोलण्यावर शिकाऱ्यांनी विचार केला. त्यांना स्वामींचे म्हणणे मनोमन पटले.त्यांना वंदन करत ते म्हणाले, "खरं आहे महाराज तुमचं. आता आम्ही कोणत्याही प्राण्याला मारणार नाही." असे म्हणून शिकारी निघून गेले.श्रीचक्रधर स्वामींना आनंद झाला. त्यांचा चेहरा प्रसन्न दिसू लागला.त्यांनी हलकेच आपली मांडी उचलली आणि ते सशाकडे पाहून म्हणाले, "पळा आता." मग सशाने एकदम धूम ठोकली.


श्री चक्रधर स्वामी आरती 

नमो जय जय देवा चक्रधरा 
नमो जय जय देवा चक्रधरा 

मंगल आरती योगेश्वरा आ..आ

नमो जय जय देवा चक्रधरा 
नमो जय जय देवा चक्रधरा 

चाफे गौरव पु तूझी सुंदर अटी 
अवलोकी आंनद वाटे चित्ती 
आलो तुला शरण चरणी अर्पुनी मन 
तुझे पूजन करितो परमेश्वरा ||१||
 
नमो जय जय देवा चक्रधरा 
नमो जय जय देवा चक्रधरा

गंध टिळा कपाळा वरी लावुणी
मधु पुष्पाच्या माळा गळा घालुणी 
हाती हात सरे बाधूणी साजरे 
श्री लावितो मधुकूल गुछ तुरा ||२||

नमो जय जय देवा चक्रधरा 
नमो जय जय देवा चक्रधरा

भाव पंचाआरती उजलोणी मनी 
भक्ति निरंजन दिप पाझलुणी 
उदबत्ती धुप लावूणी या उप 
तुज ओवाळीतो जगदीश्वरा ळ||३||

नमो जय जय देवा चक्रधरा 
नमो जय जय देवा चक्रधरा

हिन दिण पुजारी तुझा साणुला 
फल पक्वान्न नेवैद्य दावी तुला 
नम्र अभिवंदुणी दामोदर मुणी 
करी आरती देवा कमळकरा ||४||

नमो जय जय देवा चक्रधरा 
नमो जय जय देवा चक्रधरा
 
मंगल आरती योगेश्वरा आ..आ

नमो जय जय देवा चक्रधरा 
नमो जय जय देवा चक्रधरा


श्री चक्रधर स्वामी आरती 👇


 
श्री चक्रधर स्वामी पाळणा 👇



 हे सुध्दा वाचा



FAQ 
Q.1) श्री चक्रधर स्वामींच्या आईचे नाव काय होते ? 
Ans. श्री चक्रधर स्वामींच्या आईचे नाव म्हाळईसा होते.  
Q.2) श्री चक्रधर स्वामींच्या पत्नीचे नाव काय होते ? 
Ans.श्री चक्रधर स्वामींच्या पत्नीचे नाव कमळाईसा हे होते. 
Q.3)श्री चक्रधर स्वामींनी समाजाला कोणती शिकवण दिली?
Ans.प्राणिमात्रांवर दया करावी, कोणत्याही जिवाला त्रास देऊ नये. कोणताही जीव मोठा किंवा छोटा मानू नये,' अशी त्यांनी शिकवण दिली.




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad