Type Here to Get Search Results !

कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती निबंध 2021 | kojagiri pornima Marathi mahiti nibandh 2021

 कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती निबंध 2021 | kojagiri pornima Marathi mahiti nibandh 2021


         
कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती निबंध 2021

 

कोजागिरी पोर्णिमाचे महत्त्व

अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.कोजागिरी पोर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखिल म्हंटले जाते.या दिवशी आकास सर्व बाजुंनी चांदण्यांनी सजलेल असतं म्हणून हिला वर्षातील सर्वात सुंदर रात्र देखील म्हंटल जात.चंद्र देखील कोजागिरीच्या दिवशी पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो.त्यामुळे या पोर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात अशी मान्यता आहे.

कोजागिरी पोर्णिमेला पूजा झाल्यानंतर रात्री चन्द्राला आटिव  दुधाचा नैव्यद्य दाखवला जातो.दुध आटवुन त्यात केसर , पिस्ता,बदाम, चारोळ्या,बेलदोडे, जायफळ आणि साखर घालून नैवेद्य दाखवला जातो.या दुधात मध्यरात्री चंद्राची किरणे पडल्यास ते प्राषन केले जाते. 

    असं म्हटलं जातं की या दिवशी बुद्ध रात्री साक्षात लक्ष्मी देवी चंद्र मंडळातून पृथ्वीवर उतरत असते.सर्वत्र फिरत संस्कृत मध्ये किम जागंती म्हणजे कोण जागत आहे असं विचारत असते.अनेक ठिकाणी लक्ष्मी च्या स्वागतास रात्री रस्ते, घरे, मंदिरे,घाट, उद्याने इत्यादी ठिकाणी असंख्य दिप लावले जातात.कृषी संस्कृती मध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
शेतकरी वर्गामध्ये हा दिवशी उत्साहाने साजरा केला जातो.या दिवसापर्यंत सेलतातील पीक हे घरी आलेलं असत त्यामुळे घरी आणलेल्या धान्यांची पूजा केला जातें.

 

🌻 कोजागिरी पौर्णिमा कधी आहे 

कोजागिरी पौर्णिमा ही दिनांक 19 ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी रात्री 07.02 मी पासून बुधवार रात्री 08.25 पर्यंत आहे. 
 इंद्र देवता, लक्ष्मि मातेची पूजा,चांद्रदर्शन शुभ मुहूर्त सायंकाळी 07.02 ते रात्री 12.11 पर्यन्त आहे. 
‌ 
 

🌻 कोजागिरी पौर्णिमा पुजा कशी करावी 

पाटावरती आपण एक नवीन कपडा ठेवायचा आहे आणि या कपड्यावर आपल्याला अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहेत.त्या तांदळावर आपण कलष ठेऊन घेणार आहोत.तर हा जो कलष आहे इंद्र देवतेच प्रतीक म्हणून आपण ठेवतो.तर या कलषामध्ये पाणी, हळद, कुंकू यावरती आंब्याची पाने आणि त्यावरती नारळ ठेवून हा कलष आपण बनवला आहे.  

 तर आता कलषाच्या समोर आपल्याला आंब्याची पाने ठेऊन घ्यायची आहेत आणि यावरती आपण अक्षदा ठेवून घ्यायचे आहे. या अक्षता वरती सुपारी ठेवायची आहे तर ही जी सुपारी आहे तीला लक्ष्मी आणि कुबेर अस म्हटल जात.

 तर या पाटावर ठेवलेल्या कपड्यावर आपल्याला चंद्र काढून घ्यायचा आहे.तर आता आपण चंद्र, कुबेर आणि लक्ष्मी यांची पुजा करणार आहोत.तर सर्वप्रथम आपण चन्द्र,कुबेर आणि लक्ष्मी यांना हळदी, कुंकू आणि अक्षदा वाहुन घ्यायची आहे.
तर आता आपण जो कलष आहे त्याला फुल वाहून घेणार आहोत.याचप्रमाणे आपाल्याला लक्ष्मी, कुबेर आणि चंद्र यांना फुल वाहून घ्यायचे आहेत.त्यानंतर आपण देवासमोर दिवा लाऊन घेतलेला आहे.नंतर अगरबत्ती लाऊन देवासमोर ठेवायची आहे.
यांच्यानंतर जे कोजागिरी पौर्णिमेसाठी दुध आटवतो त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. 
 

कोजागिरी पौर्णिमा मसाला दुध कसे बनवावे 


कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती निबंध 2021


तर मित्रांनो आपल्याला मसाला दूध बनवण्यासाठी लागणारी सामग्री खालील प्रमाणे आहे. 
  • 1 लिटर दुध 
  • 10 पिस्ता  
  • 10 बदाम
  • 5 काजू
  • 1/4 चम्मच केसर
  • 1/4 चम्मच हिरवी इलायची पावडर
  • 1/4 चम्मच जायफळ पावडर 
  • 1/4 कप साखार 
 ही सर्व सामग्री मिक्सर च्या भाड्यात टाकायचे आहे आणि त्याच पावडर बनवायचे आहे.या सर्व पावडेरला बाजूला ठेऊन एका पातेल्यात दूध उकळन्यासाठी ठेवावे.दुधाला उकळा आल्या नंतर त्यामध्ये वरिल सामग्री असलेले पावडर मिक्स करावे.हलक्या स्वरूपाच्या गॅसच्या फ्लेम वरती 15 मिनिटे ठेवावे व सतत चमच्याने हलवत राहावे.15 मिनिटांच्या नंतर आपले मसाला दूध तयार होईल. 

👇हे सुध्दा वाचा


 
 
 
 
 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad