google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 नवरात्रीचे नऊ रंग [साडी कलर ] 2021 मराठी | Navratri colors 2021 marathi
Type Here to Get Search Results !

नवरात्रीचे नऊ रंग [साडी कलर ] 2021 मराठी | Navratri colors 2021 marathi

नवरात्रीचे नऊ रंग 2021 मराठी | नवरात्री साडी कलर  2021 मराठी | Navratri colors 2021 marathi 

आजचा रंग कोणता ? नवरात्रीचे नऊ रंग 2021 मराठी


नवरात्रीच्या नऊ रंगांचा इतिहास (२०२१)

नवरात्र हा आपणा हिंदु धर्मातील लोकांचा प्रमुख उत्सव आहे.हा सण तसेच उत्सव संपुर्ण महाराष्टात तसेच भारतभर मोठया उत्साहाने साजरा केला जात असतो.

नवरात्र ह्या शब्दाचा अर्थ पाहावयास गेले तर आपणास असे दिसुन येते की नऊ रात्रींचा अर्थ होतो नऊ रात्रींचा कालखंड तसेच कालावधी.

 नवरात्र हा एक शब्द मराठी भाषेत संस्कृत भाषेतुन घेण्यात आलेला आहे.नवरात्र हा एक असा उत्सव तसेच सण असतो जो आपण नऊ रात्रींपर्यत साजरा करत असतो.

नवरात्रीच्या कालखंडामध्ये देवीच्या नऊ विविध रुपांची पुजा आपण करीत असतो.तसेच सलग नऊ दिवस रोज वेगवेगळया प्रकारचे नैवैद्य देवीपुढे अर्पण देखील करीत असतो.ह्याच नवरात्रीत प्रत्येक दिवशी एक वेगवेगळया नऊ रंगाचे वस्त्र आपण परिधान करावयाचे असतात.कारण प्रत्येक रंगाचे त्याच्या तारीख तसेच वारानुसार काही विशिष्ट महत्व असलेले आपणास दिसुन येते.

आजच्या लेखात आपण ह्याच नवरात्रीच्या नऊ रंगाचा इतिहासा विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.


✨ नवरात्र कधी आणि केव्हा आहे?

नवरात्र म्हणजेच नऊ रात्रींचा कालखंड ज्याला शारदीय नवरात्र असे देखील म्हटले जात असते.

नवराव हा एक नऊ रात्रीपर्यत चालणारा सण तसेच उत्सव आहे.ह्या सणाचा प्रारंभ हा आश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी होत असतो.

ह्या कालखंडात सलग नऊ दिवस सर्व स्त्रिया देवीच्या विविध रुपांचे पुजन करतात.

नवरात्रीच्या काळात देवीची पुजा तसेच आराधना  करण्यासाठी सर्व विवाहीत तसेच अविवाहीत मुली तसेच स्त्रिया प्रत्येक दिवशी एक नवीन विशिष्ट रंग असलेले वस्त्र म्हणजेच साडी परिधान करतात.

  देवी मातेला संपुर्ण नऊ रात्र नऊ विशिष्ट प्रकारचे भोजन नैवैद्य म्हणुन अपर्ण करीत असतात.

ह्या नऊ दिवसांच्या कालावधीत सर्व मुली तसेच स्त्रिया रात्री दहा वाजेपासुन रात्री बारा वाजेपर्यत गरबा तसेच दांडिया खेळत असतात.

नवरात्र ही वर्षातुन चैत्र,आषाढ,पौष,अश्विन ह्या चारही त्रतुंच्या वेळेस येत असते.

नवरात्रीची सुरूवात ह्या 2021 सालामध्ये अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दिवशी अर्थात 7 आँक्टोंबर रोजी होणार आहे.नवरात्रीचा हा सण तसेच उत्सव सात तारखेपासुन सलग नऊ 15 आँक्टोबर पर्यत साजरा केला जाईल. 



🎆 2021 मध्ये नवरात्रीचे नऊ महत्वाचे रंग कोणकोणते असतील ?

नवरात्र हा एक असा कालखंड आहे ज्या कालखंडातील सर्व नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवस हा आपण देवीमातेच्या नऊ वेगवेगळया अवतार तसेच रुपांना अर्पित करत असतो.

 हे नऊ दिवस देवीमातेच्या सर्व गुणांपैकी नऊ विशिष्ट तसेच वैशिष्टयपुर्ण गुणांचे प्रतिक म्हणुन ओळखले जाते.

 नवरात्रीत आपण सर्व जण ह्या रंगांना खुपच महत्व देत असतो.कारण असे म्हणतात की ह्या नऊ रात्रींच्या कालखंडात नवरात्रीचा उत्सव साजरा करताना आपण ज्या दिनी जे वस्त्र,कपडे परिधान करत असतो.त्या रंगाच्या गुणवैशिष्टयानुसार आपले आंतरीक तसेच बाह्य व्यक्तीमत्व तसेच आपली मानसिकता देखील निर्माण होत जात असते.

म्हणुन असे म्हणतात की ह्या नवरात्रीच्या काळात आपण प्रत्येक दिवशी जो रंग महत्वाचा त्याच रंगाचे वस्त्र,कपडे परिधान करायला हवे.जेणेकरून आपले व्यक्तीमत्व देखील तसेच खुलत आणि बनत जाते.



🔶नवरात्रीचे नऊ रंग 2021 मराठी | नवरात्री साडी कलर  2021 मराठी | नवरात्रीचा आजचा रंग कोणता ?- 

नवरात्रीचा पहिला दिवसाचा रंग / कलर 2021 :

पिवळा रंग  - 7 आँक्टोंबर रोजी असणार आहे.

नवरात्रीचा दुसऱ्या दिवसाचा रंग / कलर 2021 :

हिरवा रंग -  8 आँक्टोंबर रोजी असणार आहे.

नवरात्रीचा तिसऱ्या दिवसाचा रंग / कलर 2021:

राखाडी हा रंग - 9 आँक्टोंबर रोजी असणार आहे.

नवरात्रीचा चौथ्या दिवसाचा रंग / कलर 2021 :

नारंगी रंग - 10 आँक्टोंबर रोजी असणार आहे.

नवरात्रीचा पाचव्या दिवसाचा रंग / कलर 2021 :

पांढरा रंग - 11 आँक्टोंबर रोजी असणार आहे.

नवरात्रीचा सहाव्या दिवसाचा रंग / कलर 2021 :

लाल रंग - 12 आँक्टोंबर रोजी असणार आहे.

नवरात्रीचा सातव्या दिवसाचा रंग / कलर 2021 :

गडद निळा रंग  - 13 आँक्टोंबर रोजी असणार आहे.

नवरात्रीचा आठव्या दिवसाचा रंग / कलर 2021 :

गुलाबी रंग - 14 आँक्टोंबर रोजी असणार आहे.

नवरात्रीचा नव्हव्या दिवसाचा रंग / कलर 2021 :

जांभळा रंग - 15 आँक्टोंबर रोजी असणार आहे.





🔶नवरात्रीच्या नऊ रंगाचे महत्व तसेच इतिहास काय आहे? आजचा रंग कोणता आहे 2021?


1)पिवळा रंग  - पहिला दिवस : 

 नवरात्रीचा पहिला दिवस हा देवीच्या शैलपुरी ह्या रुपाचा असणार आहे.

2021 मध्ये नवरात्रीला आपण अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या प्रारंभी.पहिल्या रात्री पिवळा रंग असलेले वस्त्र परिधान करणे गरजेचे आहे,

कारण पिवळा रंग आपण आनंदाचे प्रतिक मानत असतो.पिवळया रंगाचे वैशिष्टय जाणुन घ्यावयास गेले तर आपणास असे दिसुन येते की पिवळा रंग आपल्यामध्ये आशा निर्माण करण्याचे काम करतो.नवरात्रीत पिवळा रंग असलेले वस्त्र परिधान केल्याने आपल्या मनात चाललेले नकारार्थी विचार संपुष्टात येतात आणि आपणास एक नवा सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त होतो.ज्यामुळे आपल्या आत्मविश्वासात देखील वाढ होत असते.

2) हिरवा रंग - दुसरा दिवस :

नवरात्रीचा दुसरा दिवस देवीचे दुसरे रूप ब्रम्हचारीणीचा असणार आहे.

असे म्हटले जाते की ह्या रूपात ब्रम्हचारीणी ही अध्यातमाचा शोध घेत असते.तसेच ह्या रूपात देवी दुर्गा हिरवाकंच नावाच्या पर्वतावर तप करण्यासाठी जाते.इथेच देवी दुर्गेचे पती महादेव देखील असतात.हिरवा रंग हा नैसगिर्क रंग आहे.ज्यात समस्त सृष्टीचे दर्शन आपणास घडते.ज्यात झाडी झुडपे,नदी,सरोवर,समुद्र ह्या सर्वाचा देखील समावेश होतो.

3)राखाडी रंग -तिसरा दिवस :

नवरात्रीचा तिसरा दिवस देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा ह्याचा असणार आहे.

ह्या रूपात तिच्या कपाळावर राखाडी रंग असलेली चंद्रकोर आहे.राखाडी रंग ह्या गोष्टीचे प्रतिक आहे की देवी चंद्रघंटा आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांच्या पापी शत्रुंचा नाश करण्यासाठी सदैव तत्पर असते.राखाडी रंगाला गौरव तसेच प्रतिष्ठेचे प्रतिक मानले जात असते.

4) नारंगी रंग -चौथा दिवस :

नवरात्रीचा चौथा दिवस देवीचे चौथे रूप कुष्मांडा ह्या रुपाचा असणार आहे.

ह्या रूपाचे वैशिष्टय असे की ह्या रुपात देवी तिच्या तेजाने सुर्याला प्रकाशित करत असते.तिच्यामध्ये एवढे सामर्थ्य असते की ती सुर्यावर देखील वास्तव्य करू शकते.नारंगी हा रंग हर्ष आणि शक्ती यांचे प्रतिक मानला जातो.

5) पांढरा रंग -पाचवा दिवस :

नवरात्रीचा पाचवा दिवस देवीचे स्कंदमाता ह्या पाचव्या  रूपाचा असणार आहे.

ह्या अवतारात देवीच्या मांडीवर एक लहान मुल बसलेले दाखविण्यात आले आहे.हे रूप आईच्या पावन प्रेमाचे प्रतिक मानले जाते.पांढरा रंग हा पावन आणि पवित्र्यतेची निशाणी आहे.म्हणुन कोणतेही पवित्र कार्य पाडताना सफेद वस्त्रे परिधान केली जातात.

6) लाल रंग- सहावा दिवस :

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीचे सहावे रूप कात्यायनी हे आहे.

देवीच्या ह्या सहाव्या रुपाची निर्मिती देवाच्या क्रोधातुन झालेली आहे.म्हणुन देवी तिच्या ह्या रूपात अतिशय रागात दाखवलेली आहे.देवीमातेला आवडणारा तसेच त्यांचा अत्यंत प्रिय रंग लाल हाच असलेला आपणास दिसुन येतो.

7) गडद निळा रंग - सातवा दिवस :

नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीचे सातवे रूप काळरात्री हे असणार आहे.

देवीच्या ह्या रूपाला आपण काली असे म्हणतो.जी विनाशाची देवी म्हणुन ओळखली जाते.

8) गुलाबी रंग -आठवा दिवस :

नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीचे रूप महागौरी हे आहे.

देवीचे हे रूप आपल्याला मनातील सर्व मनोरथ म्हणजेच इच्छा तसेच अपेक्षा पुर्ण करत असते.

9) जांभळा रंग -नववा दिवस :

नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीचे नववे रूप सिदधीदात्री हे असणार आहे.देवीचे हे रूप ज्ञानाची दाता मानले जाते.

अशा पदधतीने आज आपण नवरात्रीच्या नऊ रंगांच्या इतिहासाविषयी आजच्या लेखातुन माहीती जाणुन घेतली आहे.आपल्याला हा लेख कसा वाटला याबाबद आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.तसेच सदर लेख इतरांसोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना पण ह्या महत्वपुर्ण माहीतीचा लाभ घेता येईल.



🔰 हे सुद्धा वाचा - 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad