google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 संविधान दिन मराठी भाषण निबंध कविता 2021 | sanvidhan divas marathi bhashan nibandh kavita 2021
Type Here to Get Search Results !

संविधान दिन मराठी भाषण निबंध कविता 2021 | sanvidhan divas marathi bhashan nibandh kavita 2021

 संविधान दिन मराठी भाषण निबंध कविता 2021 | sanvidhan divas marathi bhashan nibandh kavita 2021


संविधान दिन मराठी भाषण निबंध 2021


          26 नोव्हेंबर संविधान दिन 2021


नमस्कार मित्रांनो आज आपण 26 नोव्हेंबर रोजी असणारा दिवस म्हणजेच संविधान दिन याबद्दलची माहिती आपण  बघणार आहोत.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना प्रदान केली. म्हणुन या शुभ कार्याच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर हा दिवस भारतभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधानाचे जनक आणि घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ भारतात संविधान दिन साजरा केला जातो. भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून ओळखले जाते.

भारताचे संविधान हे हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. भारताचे संविधान लिहीण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस येवढा कालावधी लागला.

2015 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या स्मरणार्थ संविधान दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले. भारताची राज्यघटना म्हणजेच आपले संविधान हे भारत देशाचा पायाभूत कायदा आहे.

आपल्या देशाला संघटीत आणि एकत्रित करण्यासाठी हे संविधान लिहिले. भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती व्हावी यासाठी संविधान दिनाचे आयोजन करण्यात येते.

समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची बिज राज्यघटनेत रोऊन भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.

भारताचे संविधान हे हस्तलिखित असावे अशी पंडित जवाहरलाल नेहरूंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा यांनी संविधान स्व अक्षरात लिहिले.

देशावर जर काही संकट आले तर सारे भारतीय भेद विसरून एकत्र येतात . ही ताकद आपल्याला संविधानाने दिली आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे.


भारताचे संविधान    ➡️    Download PDF


संविधान दिनाची मराठी भाषण निबंध ⤵️



संविधान दिन what's up status 👇

          


संविधान दिन कविता 


 जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते..! 
रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते...!

आयुष्यमान करते कमजोर भारताला,
सुटलाच तोल अमुचा तर सावधान करते..!

दवडीत भाकरीची चतकोर ही नसे पण, 
मज पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते...!

संसार मुक्त करण्या धर्मातूनी विषारी, 
सिद्धांत बा भिमाचे जालिम निदान करते...!

सूर्यासमान आहे ही कायदा व्यवस्था, 
अंधारल्या जगाला दैदिप्यमान करते...!

चुकले कधी मधी तर होणार योग्य शिक्षा, 
हे सत्यमेव जयते जगणे महान करते...!

जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते..! 
रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते...!


हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) संविधान दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. 26 नोव्हेंबर हा दिवस भारतभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

Q.2) संविधान दिन का साजरा केला जातो ?
Ans.26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना प्रदान केली. म्हणुन या शुभ कार्याच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर हा दिवस भारतभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

Q.3) भारताचे संविधान लिहीण्यासाठी किती कालावधी लागला ?
Ans.भारताचे संविधान लिहीण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस येवढा कालावधी लागला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad