google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 बलीप्रतीपदा पुजा महत्व कथा | दिवाळी पाडवा पुजा २०२१ | Balipratipada puja mahatva Diwali padwa २०२१
Type Here to Get Search Results !

बलीप्रतीपदा पुजा महत्व कथा | दिवाळी पाडवा पुजा २०२१ | Balipratipada puja mahatva Diwali padwa २०२१

 बलीप्रतीपदा पुजा महत्व कथा | दिवाळी पाडवा पुजा मराठी माहिती २०२१ | Balipratipada puja mahatva Diwali padwa २०२१

     
बलीप्रतीपदा पुजा महत्व कथा | दिवाळी पाडवा पुजा मराठी माहिती २०२१


बलिप्रतिपदा चे महत्व

मित्रांनो आश्विन अमावास्येला लक्ष्मीपुजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणुन साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पौराणातील बळीराजाच्या स्मरणात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
अक्षयतृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी म्हणजे दसरा हे पुर्ण मुहूर्त असुन दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे.यादिवशी सोने खरेदी करण्यास महत्त्व दिले जाते. सुवासिनींनकडुन पतीला औक्षण केले जाते.व्यापार्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.हा दिवस शुभ मानल्यामुळे विवाह सारखे मंगल कार्य या वर्षी आवर्जून केली जातात.
या वर्षी बलिप्रतिपदा गुरूवार ४ नोव्हेंबर रोजी आहे.पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विद्यावली यांचे चित्र काढून त्याची पुजा केली जाते. ईडा पिडा टळो आणि बलीच राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते. यानंतर बलीप्रीत्यर्थ दिप उत्सवही केला जातो. या दिवशी वस्त्रांचे दान करतात. वस्त्रांचे दान केल्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर बलुची कृपा होते असे म्हटले जाते. 

दिवाळी पाडवा पती-पत्नी साठी का महत्वाचा आहे

नवविवाहित दांपत्य हा दिवस पत्नीच्या माहेरी साजरा करतात. त्याचा उल्लेख दिवासन असा केला जातो.या निमित्ताने जावयाला आहेर दिला जातो.घरोघरी सायंकाळी पाटाच्या भोवती रांगोळी काढून पत्नी पतीच औक्षण करते. पुरूष हे शिवाचे आणि स्त्री हे देवी दुर्गा देवीचे प्रतिक आहे. औक्षण केल्यामुळे पती पत्नी या दोघांनाही अध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. पती आणि पत्नीमधील प्रेम,आदर आणि निष्ठा याची प्रचिती यातुन बघायला मिळते.एकमेकांना भेटवस्तु देऊन संबंध दृढ करण्याचे संस्कार म्हणजे पाडव्याचे ओवाळणे आणि त्या निमित्त आदरभाव वाढवणे. पत्नी पतीचे औक्षण करून त्याच्या निरोगी स्वास्थ्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ओवाळताना काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. साधारणतः ओवाळणी करतांना सोने-चांदी धातूंपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करतो मात्र पाडव्याची ओवाळणी ही केवळ सुपारीने करायची असते. आवाळनीनंतरचा आणि आधीचा 15 ते 20 मिनिटांचा काळ पती-पत्नी दोघांनीही एकत्र राहणे गरजेचे आहे. ओवाळणीनंतर गोडाधोडाचे जेवण पतीला खाऊ घालावे. 
    

दिवाळी पडावा व्यापाऱ्यांसाठी का महत्वाचा आहे

या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापाऱ्यांचे नवे वर्षही याच दिवशी सुरू होते. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपप्तीसाठी नविन वह्यांचे पुजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांचे जमाखर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतात. नविन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध,फुल,अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात.

पाडव्याला काय करावे पूजा कशी करावी ? | गोवर्धन पर्वत पुजेची प्रथा

 या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची देखील प्रथा आहे. त्यासाठी सेनाचा‌ पर्वत करून त्यावर दुर्वा आणि फुले खोसतात.गाई बैलांच्या शिंगांना रंग लावून व त्यांच्या गळ्यात माळा घालून त्यांना सजवतात. मस्त बैल व चपळ कालवडी यांची मिरवणूक काढतात. गोवर्धन पूजनाने एक प्रकारे गोपाळांची प्रतिपाळ करणाऱ्या गोवर्धन रुपी भगवान श्रीकृष्णाचेच पूजन केले जाते. त्यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद्गुणांचे संवर्धन होते. मीत्रानो पूर्वी गावागावांमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा पाळली जात असे. या सोहळ्यामध्ये गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एक एक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येत असत. ते सर्व पदार्थ देवा समोर ठेवून नैवैद्य दाखवला जाई मग गावकरी सहभोजन करत असत या प्रथेच्या पाळण्यातून सामाजिक एकात्मता बंधुभाव वाढीस लागावा असा या सोहळ्या मागील उद्देश होता.

अधिक माहितीसाठी

👉 https://youtu.be/rbLkOlJ_yUg


बलिप्रतिपदा कथा

मित्रांनो बलिप्रतिपदा साजरी करण्यामागे कथा अशी की अत्यंत दानशूर परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीकृष्णाने वामन अवतार घेऊन पाताळात धाढल्याचा हा दिवस. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागे देखील या घटनेचा प्रमुख आधार आहे. बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. आपल्या प्रजेवर त्याचे खूप प्रेम होते. प्रजेच्या सुखासाठी तो सदैव दक्ष असे. दारी येणाऱ्या प्रत्येक माणसाला जे मागेल ते दान तो त्याला देत असे. दान देणे हा गुण आहे पण गुणांचा अतिरेक हा दोषच असतो. कोणाला काय केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे आणि तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ति गेल्याने ते गर्विष्ठ होऊन वाटेल तसे वागू लागतात. बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णुने वामनावतार घेतला.वामनाने बलीराजाकडे जाऊन भीक्षा मागितल्यावर त्याने विचारले काय हवे तेव्हा मनाने त्रिपाद भूमी दान मागितले. वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार त्रिपाद भूमि या वामनाला दान दिली तर  त्याचबरोबर या वामनाने विराटरूप धारण करून एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापले व तिसरा पाय कोठे ठेवू असे बलीराजाला विचारले असता त्यावर बलिराजा म्हणाला तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा तेव्हा तिसरे पाहून त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालवायचे असे ठरवून वामनाने तुला काही वर मागायचा असेल तर भाग असे त्याला सांगितले तेव्हा बळीराजाने वर मागितला आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळत घालवीनार आहात केवळ तीन पावल टाकल्याने हे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे प्रभू यमाप्रीत्यर्थ दीपदान करणाऱ्याला यमयातना होऊ नयेत त्याला अपमृत्यु येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर प्वास करावा. ते तीन दिवस म्हणजे आश्‍विन कृष्ण चतुर्दशी आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा याला बळीराज्य असे म्हणतात. त्याच वेळी बलीची भक्ती आणि दातृत्व यामुळे प्रसन्न होऊन त्याला या कार्तिक शुक्ल प्रतिपदेला लोक तुझी पुजा करतील तसेच ही तिथी तुझ्या नावाने ओळखली जाईल असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. गर्वीष्ठ झाला तरीही सत्वशील दानशूर बळीराजाला पाताळात लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला. कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील यावरून भगवंताची तत्त्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दात्रुत्व हे गुण प्रकर्षाने दिसून येतात.
 मित्रांनो बलिप्रतिपदेला बलीची पुजा करतात. बलीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्यांच्यावर वामणदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरी कार्य समजून लोकांची सेवा केली.तो सात्त्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता.प्रत्येक मानव हा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्याचे हातून वाईट कृत्य घडत असतात. परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा त्यामुळे तो देवत्वाला पोहचू शकतो हे या उदाहरणावरून दिसून येते. अशा निर्भयतेने सत्य कर्माचे पालन केल्यावर त्याला मृत्यूभय राहतच नाही. यम सुद्धा त्याचा मित्र आणि बंधु होतो या दिवशी भगवंताने  वामन अवतारात दाखवून दिले की भगवंत हा सर्वस्व अर्पण करणार्‍याचा दास सुद्धा होण्याची सिद्धता ठेवतो. 
 

तुम्हां सर्वांना बलिप्रतिपदा पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा !



हे सुध्दा वाचा⤵️



FAQ
Q.1) दिवाळी पाडव्याच्या दिवशी कोणतु प्रार्थना केली जाते?
Ans. दिवाळी पाडव्याच्या दिवशी  ईडा पिडा टळो आणि बलीच राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते.

Q.2)दिवाळी पडावा व्यापाऱ्यांसाठी का महत्वाचा असतो ?
Ans.या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापाऱ्यांचे नवे वर्षही याच दिवशी सुरू होते. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. 

Q.3) वामनाने किती भुमी दान मागितली ?
Ans. वामनाने त्रीपाद भुमी दान मागितली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad