google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 धनत्रयोदशी २०२१ शुभ मुहूर्त पुजा मांडणी यमदिपदान | dhantrayodashi 2021 muhurt Puja mandani yamdipadan
Type Here to Get Search Results !

धनत्रयोदशी २०२१ शुभ मुहूर्त पुजा मांडणी यमदिपदान | dhantrayodashi 2021 muhurt Puja mandani yamdipadan

धनत्रयोदशी २०२१ शुभ मुहूर्त पुजा मांडणी यमदिपदान | dhantrayodashi २०२१ muhurt Puja mandani yamdipadan


धनत्रयोदशी २०२१ शुभ मुहूर्त पुजा मांडणी यमदिपदान


धनत्रयोदशी शुभ मुहूर्त

 दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशी पासुन होते . यावर्षी २ नोव्हेंबर मंगळवारी धनत्रयोदशी आलेली आहे.या धनत्रयोदशीला आपण धन्वंतरी, कुबेर आणि माता लक्ष्मी यांची पुजन करतो. धनत्रयोदशीची पुजा नक्की कोणत्या शुभमुहूर्तावर करावी हे आपण माहिती करून घेणार आहोत. मित्रांनो शुभमुहूर्तावर केलेलं कोणतही कार्य हे शुभ फळेच प्रदान करत.

२ नोव्हेंबर मंगळवारी धनत्रयोदशी आहे खरतर धनत्रयोदशी तिथीचा प्रारंभ २ नोव्हेंबर मंगळवारी सकाळी ११.३१ मीनिटाने होऊन या तिथीची समाप्ती ही दुसऱ्या दिवशी ३ नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सकाळी ९.०२ मिनिटांनी होत आहे. मात्र मित्रांनो धनत्रयोदशी ही आपण २ तारीखीलाच साजरी करणार आहोत. या ठिकाणी ज्या लोकांना यमदिपदान करायच आहे यमाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानी २ तारखेला प्रदोषकाळी म्हणजेच उत्पात सायंकाळी ५.३५ मीनिटांपासुन ते रात्री ८.११ मीनिटे या कालावधीत यमदिपदान करावं. यमाच्या नावाने दिवा प्रज्वलित करावा त्यामुळे अकाल मृत्यूच भय राहत नाही.

आज आपण धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशीला केली जात असणारी जी पुजा आहे त्या दिवशीची विधीपथ मांडणी, त्या पुजेसाठी लागणारे साहित्य आणि यमदिपदान कसं करायचं ते आपण बघणार आहोत.

धनत्रयोदशी शुभ मुहूर्त⤵️

   https://youtu.be/RddAdv3f-NQ


धनत्रयोदशी पुजेची मांडनी कशी करावी

सर्वात प्रथम आपल्याला ज्या ठिकाणी पुजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ झाडुन पुसुन आपण त्यावरती पाट मांडून घ्यायचा आहे आणि त्या पाटावर लाल वस्त्र मांडून घ्यायच वस्त्र हे स्वच्छ असाव नविन असाव नविन लाल वस्त्र त्यावरती मांडून घ्यायच आहे.आता आपण त्यावरती थोडेसे तांदूळ लाऊन आपण तिथे गणेश स्थापना करायची आहे.जर तुमच्या जवळ गणेश मुर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचा देखील गणेश स्थापना म्हणून वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला गणेश मुर्तीला हळद कुंकू वहायच आहे. हे करत असताना ॐ गण गणपतये नमः ॐ गण गणपतये नमः हा मंत्र वापरायचा आता आपण जल अर्पण करून आपण कापसाची वस्त्रमाळ घालून घेणार आहोत.आता आपल्याला ॐ गण गणपतये नमः मंत्राचा उच्चार करता करता फुल आणि अक्षता वाहून घ्यायची आहे.शेजारीच आपण तांदळाचा स्वस्तिक काढून त्यावरती कलष स्थापण करणार आहोत.

  कलष स्वच्छ करून त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचा आहे आणि कलषाला आपण लाल धागा हळदीकुंकवाचा धागा असतो तो बांधून कलषावरती आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. आता पण त्यामध्ये एक सुपारी थोडीशी अक्षदा, तुळशीपत्र आणि एक रुपयाचा कॉईन त्यामध्ये घातलेला आहे. आता कलषाला आपण हळदी-कुंकू वाहून घेऊया आता आपण या कलषामध्ये खाऊची पाने घालून घेणार आहोत तर पाच खाऊची पाने घालून घ्यायची आणि या पानांना देखील आपण हळदी-कुंकू लावून घेणार आहोत. हळदी-कुंकू लावून कलषामध्ये पाने ठेवून द्यायची त्या वरती म्हणजे थोडेसे तांदूळ अर्धी वाटी तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळा वरती आपण दिवा लावून घेणार आहोत. पानं लावून घ्यायची पाच खाऊचे पान हळदी-कुंकु लावल्यानंतर त्यावरती तांदळाची प्लेट ठेवून दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यावर तांदूळ घेतलेले त्यावरतीही आपण हळदीकुंकू वाहून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हळद-कुंकू वाहून आपण त्यावर ती दिवा लावणार आहोत. तर दिवा लावत असताना दिव्याचे तोंड हे आपण दक्षिण दिशेस करायचे आहे. तर दक्षिण दिशेस हा दिवा मी लावून घेतलेला आहे. धनत्रयोदशीच असं एक वेगळेच महत्व आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा त्यातून अमृत कलष घेऊन धन्वंतरी बाहेर पडला तर या दिवशी धन्वंतरीच आपण पूजा केली जाते.

  तर अशा पद्धतीने आपण पानावर ची स्थापना करू शकतो तरी या दिवशी धन्वंतरीचे एक विशेष महत्व आहे आणि आयुर्वेदामध्ये ही धन्वंतरीचे जास्त महत्व आहे त्यामुळे आज आपण धन्वंतरीची पूजा करून आपल्याला चांगल आरोग्य लाभण्यासाठी चांगली प्रार्थना करू शकतो. खाऊच पान ठेवून त्यावरती आपण थोडसं तांदूळ ठेवून द्यायचे त्यावरती सुपारी ही आपण धन्वंतरी म्हणून स्थापित करणार आहोत आणि त्यावरती हळदी-कुंकू वाहून घेणार आहोत आता आपण धन्वंतरीसाठी जल अर्पित करणार व त्यासोबतच थोडीशी तुलसीपत्रे आणि एक फूल अर्पण करायचे तर तुळशीपत्र कशासाठी तर त्यांचा आयुर्वेदात एक जास्त महत्त्व आहे म्हणून आपण तुळशीपत्र व्हायचे आहे त्यासोबतच एक फुल वहायचा आहे. भगवान धन्वंतरी पूजा करत असताना आपण आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला चांगल आरोग्य लाभण्यासाठी एक मंत्र म्हणायचा आहे. आता आपण कुबेर स्वरूप सुपारीची स्थापना करणार आहोत. तुमच्याकडे कुबेर मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची मी स्थापना करू शकाल नसेल तर अशा पद्धतीने आपण सुपारी स्थापना करणार आहोत. तर एक खाऊच पाण घ्यायचं त्यावर ती थोडंसं तांदूळ अर्पण करायचं त्यावरती आपण कुबेर स्वरूप सुपारीची स्थापना करून घेणार आहोत हळदीकुंकू आहेच हळदीकुंकू वहायच, जल अर्पित करायचं एक फुल वहावयच आहे. कुबेर स्वरूप सर्व पूजा करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणत आपण भगवान कुबेर यांची पूजा केलेले आहे आता आपण नैवेद्य दाखवनार आहोत तर त्या दिवशी धण्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो.


धनत्रयोदशी पुजेची मांडणी साहित्य⤵️ 

https://youtu.be/gRF8tf4jw1o


धनत्रयोदशी यमदिपदान कसे करावे

 तर आता आपण यमदीपदान कसे करायचे ते बघूया तर आता आपण या कपड्यावर स्वस्तिक काढून घेऊयात. तांदळाचा स्वस्तिक काढून आपण त्यावरती दिवा लावून घेणार आहोत. तर दिवा हा आपण कणकेचा दिवा बनवलेला आहे.तर हा दिवा तुम्ही मातीचा, तांदळाच्या पिठाचा किंवा कणकेचा ही वापरू शकता तर स्वस्तिकच्या मध्यभागी थोडं तांदळाचं पीठ टाकायचे आहे. आता आपण त्यावरती दिवा लावून घेणार आहोत. दिव्याचे तोंड हे दक्षिण दिशेस करायचा आहे. आता या दिव्याला हळदीकुंकू वहायच आहे. फुल अर्पण करायचे या दिव्यामध्ये तुमच्याकडे जर माता लक्ष्मी चे स्वरूप कवडी तर कवडी ठेवा किंवा माता लक्ष्मी स्वरूप coin असेल तर हा coin आपण दिव्यामध्ये ठेवणार आहोत. त्यामध्ये हळदी कुंकू लावून त्याचीही पूजा करून घ्यायची तर हा दिवा आपण संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने दक्षिण दिशेला तोंड करून बाहेर जर दिवा लावला तर अपमृत्यु टळतो असा समज आहे.

   तर आज आपण धनत्रयोदशी दिवशी केली जाणारी पूजा ही थोडक्यात बघितलेली आहे तुमच्या घरात सुख शांती समाधान आणि वैभव लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना माझ्याकडून तुम्हा सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.


 ⤵️हे सुध्दा वाचा


FAQ
Q.1) धनत्रयोदशी कधी आहे ?
Ans.२ नोव्हेंबर मंगळवारी धनत्रयोदशी आहे खरतर धनत्रयोदशी तिथीचा प्रारंभ २ नोव्हेंबर मंगळवारी सकाळी ११.३१ मीनिटाने होऊन या तिथीची समाप्ती ही दुसऱ्या दिवशी ३ नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सकाळी ९.०२ मिनिटांनी होत आहे. 
Q.2) यमदिपदान करण्याचा शुभ मुहूर्त ?
Ans. ज्या लोकांना यमदिपदान करायच आहे यमाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानी २ तारखेला प्रदोषकाळी म्हणजेच उत्पात सायंकाळी ५.३५ मीनिटांपासुन ते रात्री ८.११ मीनिटे या कालावधीत यमदिपदान करावं. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad