google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 हरभरा पेरणी कधी आणि कशी करावी | gahu ani harbhara perani kadhi ani kashi karavi
Type Here to Get Search Results !

हरभरा पेरणी कधी आणि कशी करावी | gahu ani harbhara perani kadhi ani kashi karavi

 हरभरा पेरणी कधी आणि कशी करावी | gahu ani harbhara perani kadhi ani kashi karavi

      
हरभरा पेरणी कधी आणि कशी करावी


गहू आणि हरभरा पेरणी कधी करावी 

   आता गहू आणि हरभरा पेरणी चालू होत आहे तर एक हरभरा कधी पेरायचा आणि दुसर म्हणजे गहू कधी पेरायचा हे आपण बघणार आहोत.एक सोप्प उदाहरण लक्षात ठेवा तुमच्या घरी डोक्याला लावायच खोबऱ्याच तेल असत ते
खोबऱ्याचे तेल घट्ट झाल तर तुम्ही हरभरा आणि गहू पेरायला काही हरकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की खोबऱ्याचे तेल घट्ट झाल तर समजायच tempreture 17°c झाल. म्हणून ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे.

  पुर्वी काही तापमान मोजायचे यंत्र नव्हते म्हणून पुर्वी आपले शेतकरी पुर्वज काय करायचे खोबऱ्याच तेल वाटीत ठेवायचे आणि ते ठेवलेलं तेल घट्ट झाल तर समजायचे की पेरणीची तयारी करायची. म्हणून हे कारण सगळ्यांनी लक्षात घ्यायच आहे.
   

हरभरा पेरणी कशी करावी

आता तुम्ही हरभरा पेरायला सुरुवात कराळ तर सोयाबीनच ॲवरेज उत्पन्न १4 क्विंटल आणि हरभऱ्याच ॲवरेज उत्पन्न एकरी 16 क्विंटल आहे. तर मग हरभरा पेरत असतांना काय करायचं की आपल घरचच बियाण वापरायच आणि बियाण वापरत असतांना झाकी ९२१८ आणि विजय हे दोन बी पेरणीसाठी चांगल आहे. दप्तरीच बी एक चांगल आहे पण दप्तरीच्या बीयामुळे हरभऱ्याचे घाटे खूप गळतात. पण 9218 हे आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी चांगले आहे.

    हरभरा पेरणी करतांना बीयांतील अंतर कोणत निवडायच ते अंतर निवडत असताना तुम्ही १८ इंचावर पेरावे म्हणून मालाला उतार येतो. एकरी बीयान आपण ४० किलो पेरावे ४५ किलो पेरावेत. पुर्वीची एक म्हण आहे की हरभरा हे इतकं दाट असायला पाहिजे की प्लेट फेकली की ते हरभऱ्यामध्ये वरी तरंगाव अस हरभरा इतका दाट पाहिजे. म्हणून आता तुम्ही काय करा माझ्या म्हणण्यानुसार यावेळी 1 किंवा 2 एकर मध्ये 40 किंवा 45 किलो पेरुन बघा तुम्हाला नक्की उतार येईल.

हरभरा येवढा दाट पाहिजे की हरभऱ्यामध्ये तुम्ही जर आले तर त्याच्याऊन तुडवून जावं लागेल आणि कापणी करणाऱ्या लेबर असतात त्यांना ढकलून ढकलून कापानी करावी लागेल  तेव्हा कुठे 16 क्विंटल एकरी उतार येतो.आणि गेल्यावर्षी एका एकरला 21 क्विंटल ॲवरेज आले होते.अशी आपण हरभऱ्याची शेती करवी.

  खत नियोजन मध्ये काय करा DAP ची एक बॅग द्या आणि त्याच्यासोबत 5 किलो गंधक द्या. 5 किलो गंधक दिलं की तुमचं हरभरा चांगला राहतो. पेरणी करताना काय करा आपण हरबरा पेरताना ट्रॅक्टरनेच पेरत असतो पण त्या ट्रॅक्टर वाल्याला काय करा एखाद लीटर डीझेल आणुन द्या पन त्याला म्हणा की काय खोल पेरायच ते पेर मग अशाप्रकारे हरभरा पेरलं की बिलकुल ते उगवनारच.

   यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे ज्या लोकांच्या जमिनी चिभडिच्या आहेत मग त्या जमिनीत वापसा होत नाही  आऊत सुद्धा जात नाही, बैलांची पाळी हाणता‌ येत नाही तर मग हरबऱ्याला उतार कसा काढायचा. तर काय करायच हरबर त्या चिभडया जमिनीत जाऊन फेकायचा आणि त्या हरभऱ्याचया शेतात सगळी आपली जनावरे जाऊन तुडवायची त्यामुळे त्या बैलाच्या खुरीने ते हरबरे त्या जमिनीमध्ये जात आणि मग पाऊस हडकला की ते हरभरे ऊगवुन निघाते मग त्यामुळे आपल्याला उतार येईल.  
   ज्याची जमिन चिभडी आहे त्यांनी हरबर शिपुन द्या आणि त्यामध्ये बैल तुडवा आणि वापसा झाली की तुमचं हरबर नंबर एक येत.म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवा.


हरभरा पेरणी युट्यूब लिंक👉 https://youtu.be/pZ7KaapUOGE


हरभऱ्याला पाणी कधी आणि किती वेळा द्यावे

   पेरणीच्या वेळेस हरबर पेरल्यानंतर तुम्ही काय करायच की  ज्या दिवशी हरबारा पेरला त्याच्या दुसऱ्या दिवशी स्प्रिंक्लरणी पाणी द्यायला काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी पाणी दिले तर काय करा फक्त दोनच तास स्प्रिंक्लर एका जागेवर ठेवा.  पण आपले काहीच शेतकरी काय करतात एकदा स्प्रिंक्लर लावल की घरी येईपर्यंत चालूच ठेवतात . म्हणून इथुन पुढ हराबणाऱ्याला मोकळ पाणी आणि जास्त पाणी जमत नाही ही गोष्ट सगळ्यानी लक्षात ठेवायची आहे.

 पहिल पाणी पेरल्यानंतर 2 तास तुषार शिंचनाने द्या. दुसर पणी 20 दिवसाला द्यायच आणि ते 4 तसाच असाव नंतर तिसर पाणी 40 दिवसाला द्यायच म्हणजे या दिवशी हरबणाऱ्याला नेमकेच फुल लागतात . 40 दिवसाला पाणी दिल आणि ते 6 घंटे एवढं द्यायच. एवढं पाणी दिल की पुढे त्याला पाणी द्यायची गरज नाही. पण हरबणाऱ्याला फुल लागले की कधीच पाणी द्यायचं नाही कारण की पाणी दिल्यामुळे हरभऱ्याची फुले गळू लागतात.


हे सुध्दा वाचा⤵️

 
FAQ
Q.1)हरभऱ्याची कोणती बियाणे पेरणीसाठी चांगली आहे ?
Ans.बियाण वापरत असतांना झाकी ९२१८ आणि विजय हे दोन बीयाने पेरणीसाठी चांगली आहेत. 

Q.2) हरभरा पेरणी करतांना बीयांतील अंतर कोणत निवडाव?
   Ans. हरभरा पेरणी करतांना बीयांतील अंतर हे तुम्ही १८ इंचावर पेरावे म्हणून मालाला उतार येतो. 

Q.3)हरभरा एकरी कीती बीयाण पेरावे ?
Ans.एकरी बीयान आपण ४० किलो पेरावे किंवा ४५ किलो पेरावेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad