Type Here to Get Search Results !

सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा | How to download 7/12 utara

 सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा | How to download online 7/12 utara


या अगोदर ७/१२ काढायचा असल्यास आपल्याला तलाठी कार्यालयात खेटे घालावी लागत असत.तर आपल्या पिढीला तलाठी कार्यालयात जाण्याची अजिबात गरज नाही.तुम्ही घरबसल्या अवघ्या पाच मिनिटात डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा डाऊनलोड करू शकता.
  
 आज आपण  डिजिटल सातबारा कसा डाऊनलोड करायचा,तो कसा वाचायलचा आणि तो सरकारी योजनांसाठी ग्राहय धरल्या जातो का या बद्दलची माहिती आपण बघणार आहोत.

डिजिटल सातबारा कसा काढायचा

 • ७/१२ काढण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जायचे आहे

सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा

 • त्यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची वेबसाईट उघडेल.या वेबसाईटच्या उजवीकडे तुम्हाला Digitaly Signed 7/12 किंवा डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ पाहण्यासाठी येथे क्लिक करा असे दिसेल.
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा

 •  यावर क्लिक केल्यास आपला ७/१२ असणारे अस एक पेज तुमच्यासमोर उघडेल. जर तुम्ही आधीच या साईटवर नोंदणी केली असेल तर तुम्ही तुमचा login Id आणि Password टाकुण तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता. 

             
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा


 • पण तुम्ही पहिल्यांदाच नविन ७/१२ काढण्यासाठी इथे आला असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला New User Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडते.
            
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा

 • Personal information म्हणजेच वयक्तीक माहिती द्यायची आहे. जसे की तुमचं नाव,मधलं नाव, आडनाव सांगायचे आहे. त्यानंतर Gender  म्हणजेच पुरुष आहे की महीला , Nationality म्हणजे राष्ट्रीयत्व त्यानंतर मोबाईल नंबर सांगायचा आहे. त्या नंतर Occupation मध्ये तुम्ही काय करता ते सांगायच आहे जसे की business करता Service करता की इतर काही करता ही माहिती द्यायची आहे. या नंतर ई मेल आयडी आणि जन्म तारीख द्यायची आहे.
           
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा

 • वयक्तीक माहिती भरून झाल्यावर तुम्हाला           Address Information मध्ये तुम्हाला तुमच्या पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे. त्यामध्ये Flat no म्हणजे तुमचा घर क्रमांक, Floor no म्हणजे तुम्ही गावाकडे राहत असताल तर ग्राऊड फ्लोअर किंवा फर्स्ट फ्लोअर त्यानुसार तुम्ही माहिती लिहू शकता. Building Name म्हणजे घरावर काही नावं असेल तर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे.पिनकोड टाकला की जिल्हा आणि राज्याचे नाव आपोआप त्या फॉर्म वर येत.पुढे street road म्हणजे गललीच नाव, location  गावाचं नाव आणि city Area म्हणजे तालुक्याच नाव टाकायचं आहे.
  
        
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा

      
 • ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला login Id तयार करायचा आहे.Login Id आपल्याला हवा असेल तसा बनवावा किंवा आपल नाव,@ आणि जन्म तारीख असं सर्वसामान्य लोक वापर करतात.login id टाकल्यानंतर check availability या पर्यायावर क्लिक करून तो आयडी ऑलरेडी अस्तीत्वात आहे की नाही हे बघावं लागणार आहे. तो जर अस्तीत्वात नसेल तर पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला एका प्रष्णाच उत्तर द्यायच आहे. त्यानंतर तुम्हाला CAPTCHA टाईप करायचा आहे.हे सर्व झाल्यावर तुम्हाला submit बटण दाबायचा आहे.

        
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा

 •  त्यानंतर तुमच्या स्किन वर Registration complete असा मेसेज येईल. तिथे तुम्हाला click here या पर्यायावर क्लिक करायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा ७/१२ च्या पेजवर वापस जाल तिथे तुम्हाला Registration करताना टाकलेलं User Id आणि Password टाकायचा आहे आणि परत login करायचं आहे.
              
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा

 •   त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ असं शिर्शक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेज मध्ये सगळ्यात शेवटी एक सुचणा दिलेली आहे. ₹ 15 will be charged for download of every 7/12.this amount will be deducted from available balance म्हणजेच सातबाऱ्यासाठी तुम्हाला 15 रूपये चार्ज केले जातील आणि ते तुमच्या उपलब्ध बेलेंस मधन कापले जातील.आता आपण नवीन registration  केल्यामुळे आपल्या खात्यात काहीच बेलेंस नसतं त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला पैसे जमा करणं गरजेचं असतं.ते कसं करायचं तर खाली असलेल्या Recharge account या पर्यायावर क्लिक करायच. त्यानंतर हे पैसे internet banking,bhim app,UPI या द्वारे आपण रिचार्ज करू शकतो.
         
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा

 •   डिजिटल सहीचा ७/१२ मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर दिलेली माहिती भरायची आहे यात तुमच्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव ,गावाचं नाव टाकायचं आहे.त्यानंतर तुमचा सर्वे क्रमांक कींवा गट क्रमांक टाकायचा आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर डाउनलोड या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ७/१२ पाहू शकता.
सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा
 •     हा ७/१२ तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांसाठी वापर करू शकता.

हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) सातबारा उतारा ऑनलाईन काढण्यासाठी कोणत्या वेबसाइट वर जावे ?
‌Ans.सातबारा उतारा ऑनलाईन काढण्यासाठी https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जावे.

Q.2) एक सातबारा काढण्यासाठी किती पैसे द्यावे लागतात ?
Ans.एक सातबारा काढण्यासाठी 15 रूपये द्यावे लागतात.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad