google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी | How to see the government price of land
Type Here to Get Search Results !

जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी | How to see the government price of land

 जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी | How to see the government price of land |igrmaharashtra.gov.in


जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी


                नोंदणी व मुद्रांक विभाग

                     महाराष्ट्र शासन


नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या शेत जमिनीची सरकारी किंमत काय आहे हे तुम्हाला माहिती नाही आणि ती तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरन अगदी 2 मिनिटात शेतजमीनीची सरकारी किंमत माहिती करून घेऊ शकता.

 तुमच्या आसपासच्या येरियातल्या ज्या काही जमिनी आहेत तर त्या जमिनीची सुद्धा सरकारी किंमत काय लागते ते तुम्ही माहिती करून घेऊ शकता. फक्त तुमच्या मोबाईलवरती दोन चार क्लिक मध्ये तर ते कसं करायचं हे आपण जाणून घेणार आहोत.


जमिनीची शासकीय किंमत मोबाईलवर कशी पहावी


जमिनीची शासकीय किंमत मोबाईलवर कशी पहावी याबद्दलची माहिती आपण step by step बघणार आहोत.

Step-1) सर्वात अगोदर तुम्हाला Google Chrome या ॲपवर जायचं आहे. या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल त्यावर जाऊन तुम्हाला igrmaharashtra.gov.in असे टाकायच आहे. किवा या दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि थेट या वेबसाईटवर जा.

Step-2) वेबसाईट मध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला 3 डॉट दिसतील त्यावर क्लिक करा आणि खाली गेल्यावर desktop site असा पर्याय दिसेल त्याला चालू करा  जेणेकरून आपल्याला व्यवस्तित वेबसाइटवरील माहिती पाहता येईल.
               
जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी


Step-3) मित्रांनो वेबसाईटमध्ये गेल्यावर तुम्हाला नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन असं बघायला मिळेल. तर ही महाराष्ट्राची ऑफिशियल वेबसाईट असुन यावरच तुम्हाला तुमच्या शेतजमिनीची सरकारी किंमत बघायला मिळणार आहे.

जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी

➡️शेतमालाचा बाजारभाव घरबसल्या कसा पहावा


Step-4) वेबसाईट open झाल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळे पर्याय बघायला मिळतात पण आपल्याला आपल्या शेतजमिनीची सरकारी किंमत बघायची आहे. तर त्यासाठी डाव्या बाजूस तुम्हाला महत्त्वाचे दुवे नावाचा पर्याय तिथे बघायला मिळेल तिथे गेल्याच्यानंतर मिळकत मुल्यांकन नावाचा चार नंतरचा पर्याय पहायला मिळतो त्यावर क्लिक करा.
      
जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी


Step-5) मिळकत मुल्यांकन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नकाशा open होईल. तर तो नकाशा आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा या नकाशात आपल्याला वेगवेगळे जिल्हे पहायला मिळतात आणि प्रत्येक जिल्ह्याच नाव, प्रत्येक जिल्ह्याचा नकाशावाईज माहिती इथे पहायला मिळते.तर इथे काय करायचं सरळ साध्या पद्धतीने इथे टच केल्यानतर इथे जिल्हा सेलेक्ट होणार आहे. इथं तुमच्या जिल्ह्याच नाव जिथे दिसेल अगदी त्याच नावावरती क्लिक करायचं आहे.
           
जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी


Step-6) तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नविन पेज open होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा दिसेल त्याखाली तुम्हाला तुमचा तालुका आणि गाव निवडायच आहे.
‌‌               
जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी


Step-7) गाव निवडल्यानंतर खाली‌ तुम्हाला तुमच्या Area मधे असणाऱ्या जमिनीचे सरकारी भाव पहायला मिळतील. जमिनीच्या किंमतीचे शासकीय भाव हे हेक्टरी दिलेले आहेत.

         
जमिनीची शासकीय किंमत कशी पहावी




हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) शेतजमिनीची सरकारी किंमत कोणत्या वेबसाइटवर पहावी ?
Ans. शेतजमिनीची सरकारी किंमत 
 igrmaharashtra.gov.in या वेबसाईटवर पहावी.

Q.2) शेतजमिनीची शासकीय किंमत मोबाईलवर कशी पहावी ?
Ans. शेतजमिनीची शासकीय किंमत मोबाईलवर पाहण्यासाठी https://www.marathimahila.com/ या वेबसाईटवर जावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad