google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना 2021 | Dr babasaheb ambedkar swadhar yojana 2021
Type Here to Get Search Results !

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना 2021 | Dr babasaheb ambedkar swadhar yojana 2021

 डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना 2021 |bharatratna docter babasaheb ambedkar swadhar yojana 2021


डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना 2021


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२०- २१ व २०२१-२२ करिता अर्ज करण्यासाठी जाहीर प्रसिद्धी निवेदन

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यासाठी दि. १३ जून २०१८ रोजीच्या शासन निर्णयाअन्वरी (शासन निर्णय क्रं. बीसीएच २०१६/प्र.क्र.२९३/ शिक्षण २ दिनांक १३.०६.२०१८) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.

लाभाचे स्वरूपः सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्याथ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यामध्ये खालील प्रमाणे रक्कम थेट वितरित करण्यात येणार आहे.


परभणी महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच परभणी महानगरपालिकेच्या हद्दिपासुन ०५ कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये शैक्षिणक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

  • भोजन भत्ता - २५,०००/
  • निवास भत्ता - १२,०००/
  • निर्वाह भत्ता - ६,०००/

प्रति विद्यार्थी एकूण सभाव्य वार्षिक खर्च - ४३,०००/

टीप: वरील रक्कमे व्यतीरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिक शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५०००/-व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रुपये २०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना 2021
समाज कल्याण परभणी



डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना 2021 | docter babasaheb ambedkar swadhar yojana 2021


डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे निकष असतील. 

१) विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील असावा.

२) विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

३) विद्यार्थी कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला असावा.

४) शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा,

५) विद्यार्थ्यास इयत्ता १० वी / १२ वी / पदवी/ पदविकामध्ये किमान ५०% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.

६) या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यासाठी ३% आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा ४०% असेल.


७) विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रु २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

८) विद्यार्थी स्थानिक नसावा. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा)

९) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी परभणी महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच परभणी महानगरपालिका हदीपासून ०५ कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्याथ्यांनी अर्ज सादर करावा.

१०) १२वी नंतर, पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमांचा कालावधीही दोन वर्षापेक्षा अकमी नसावा.

११) विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% असणे आवश्यक राहील.

अर्जाचा नमुना आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, परभणी येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

योजनेच्या अटी व शर्ती तसेच अर्जासोबत सादर करावयाची यादी उपलब्ध करून दिलेल्या अर्जासोबत जोडली आहे. अर्ज सादर करण्याचे ठिकाण व अंतिम दिनांक: पात्र विद्यार्थी आपला अर्ज दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत (कार्यालयीन वेळेपर्यंत) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय परभणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत परभणी येथे समक्ष सादर करावा. 

अधिक माहितीसाठी ०२४५२-२२०४१७ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयाशी संपर्क साधावा

 टीप: अपूर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्रे सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही.



हे सुध्दा वाचा⤵️



FAQ
Q.1) डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे ?
Ans.डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना ही
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आहे.

Q.2) डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेची अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे ?
Ans. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेची अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१ ही आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad