Type Here to Get Search Results !

महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध 2022 | mahaparinirvan day Speech essay 2022

 महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध 2022 | mahaparinirvan day Speech essay 2022 | mahaparinirvan din bhashan marathi pdf|महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी माहिती | 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध मराठी

   
महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध 2022

महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित आणि दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्ली येथे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले होते. त्यामुळे ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौध्द पध्दतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाअगोदर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यांना लोक 'बोधिसत्व' मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरु होते. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ कोठे आहे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतातून लक्षावधी लोक येतात व चैत्यभूमी स्वरूपात ठेवलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात.

6 डिसेंबर या दिवशी जगभरातील सर्व आंबेडकरवादी व्यक्ती बाबासाहेबांची प्रतिमा व मूर्ती समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौध्द विहारे, घरात, सार्वजनिक स्थळी, शाळा महाविद्यालये, शासकीय कार्यालये इ. ठिकाणी महापरिनिर्वाण दिन या दिवशी डॉ. आंबेडकरांना अभिवादन 
करतात.

 डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा भीम अनुयायांसाठी अत्यंत खास असतो. 6 डिसेंबर हा दिवस देशभरातील भीम अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. 


➡️https://youtu.be/ETLf0FKvAXw



 महापरिनिर्वाण दिन का साजरा केला जातो

भारताच्या इतिहासात दलित आणि बौद्ध धर्मीयांसाठी आपलं जीवन वेचणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी मोठा जनसागर उसळतो. 6 डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांचे निधन झाल्यानंतर महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जाण्यास सुरूवात झाली.

बौद्ध धर्म सांगतो की, आपल्या आयुष्यातील कर्म हे मृत्यू झाल्यानंतरही आत्मा किंवा स्पिरीटच्या माध्यमातून पुढे जात राहते. मात्र निर्वाण स्थितीमध्ये पोहचल्यानंतर पुनर्जन्माचा विषय संपतो. अनेकदा पूर्वायुष्यातील कर्माचा आपल्या आयुष्यावर प्रभाव असतो.

शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला.  काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला.

इ.स. २००२ पासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समीती'ची स्थापना करून महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून सर्व संस्थांना घेऊन परिश्रमणाने अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्याचे मोठे कार्य सुरू केले.

२०१७ मध्ये ६१ वा महापरिनिर्वाण दिन झाला, यावेळी १५ मिनिटे मौन पाळून, बुद्धवंदना म्हणून, मानवसमाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करून असा महापरिनिर्वाण दिन या वर्षापासून आयोजित करण्याचे ठरविले.


हे सुध्दा वाचा⤵️


FAQ

Q.1) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन कधी झाले ?

Ans. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले.

Q.2) 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून का साजरा केला जातो ?

Ans.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्ली येथे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले होते. त्यामुळे ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.

Q.3) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कधी केला ?
Ans.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाअगोदर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad