Type Here to Get Search Results !

मार्गशीर्ष गुरुवार व्रत पुजा मराठी 2021 | margashirsha guruvar vrat puja marathi 2021

मार्गशीर्ष गुरुवार व्रत पुजा मराठी 2021 | margashirsha guruvar vrat puja marathi 2021


 माझे हे व्रत जो नितीनेमाने करेल तो सदैव सुखी राहील हे माझे वचन आहे असे महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात कथन केले आहे.

मार्गशीर्ष महिना 2021 2022 माहिती (toc)

"मासांना मार्गशिर्षो S हम्''   या वाचनाने गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केला आहे. मराठी संस्कृतीत मार्गशीर्ष महिन्याला धार्मिकद्रूष्ट्या एक खास महत्त्व आहे.

या महिन्यात सवासनी स्त्रिया महालक्ष्मीचे व्रत करतात आणि आपल्यावर श्री महालक्ष्मीची कृपा व्हावी,सौंसारात सुख समाधान सतत रहावे हा त्यामागचा हेतू असतो.

व्रत केल्याने उत्तम फलाचा लाभ होतो. कार्तिक महिना समाप्तीनंतर सुरू होणारा मार्गशीर्ष महिना यंदा 4 डिसेंबरला सुरू होणार असून 2 जानेवारीला समाप्त होणार आहे.

♦️ महालक्ष्मी गुरुवार व्रत तारीख 2021


 9 डिसेंबर           : पहिला गुरूवार
16 डिसेंबर          : दुसरा गुरूवार
23 डिसेंबर          : तीसरा गुरूवार
30 डिसेंबर          : चौथा गूरूवार

  या सर्व गुरूवारी महालक्ष्मीचे व्रत करून शेवटच्या गुरुवारी म्हणजे 30 डिसेंबरला उद्यापन करायचे आहे.



Download


➡️ खंडोबाचे लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा

➡️ खंडोबा नवरात्र पंचषष्ठी पुजा विधी मराठी


महालक्ष्मी व्रत पुजा मांडणी कशी करावी

  • घरातील पुजेची जागा स्वच्छ करावी व पुजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा.
  • चौरंगावर नवे कोरे कापड आंथरावे व त्या कापडावर गहू किंवा तांदळाची रास घालावी. 
  • त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात दुर्वा पैसा आणि सुपरी घालावी.
  • विड्याची पाने किंवा आंब्याची पाने कलशावर ठेवावे व त्यावर नारळ ठेवावा.
  • चौरंगावर महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा घरात असलेली मुर्ती ठेवावी.
  • मुर्तीपुढे वीडा, खारिक, खोबरे,बादाम, इतर फळे,खडीसाखर अथवा गुळ ठेवावा. त्यांच्यावर शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी.
 अशाप्रकारे पुजेची मांडणी करावी व‌ ती पुर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी.पुजा मांडल्यावर महालक्ष्मी व्रत कथा वाचावी त्यानंतर आरती करावी व सर्वाना प्रसाद द्यावा.
पुजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिस्ठांनाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे, पुजा विसर्जित करावी, कलशातील पाणी तुळशीत घालावे, आणि तीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा.

पद्मपुराणामध्ये व्रताचा उल्लेख आढळतो त्यात श्री लक्ष्मीदेवीने असे कथीत केले आहे की माझे हे व्रत जो नितीनेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे.

🔶महालक्ष्मी व्रत नियम

  • गुरुवारी प्रात: काळी उठावे, अंघोळ करावी शुद्ध अंतःकरणाने व सतश्रद्धाभावनेने पुजा वीधी करावी.
  • दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे.
  • कधी कधी अकस्मित अडचण उद्भवते अशावेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पुजा आरती करून घ्यावी.
  • कहाणी स्वत: वाचावी किंवा ऐकावी. व्रताची पुजा व कथा ऐकण्यासाठी शेजारयांना निमंत्रण द्यावे.
  • सायंकाळी गायीची पूजा करावी, तीला नैवेद्य द्यावा, नितिनियमाप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पुजा आरती करावी, कथा वाचावी.
  • सात सुवासिनींना किंवा सात कुमारीकांना हळदी कुंकू द्यावे.
  • एक एक फळ व व्रताच्या कथेची एक प्रत द्यावी.
  • शक्य झाल्यास ब्राम्हणांना सिधा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा.
त्यानंतर आपण भोजन करावे.गुरूवारी संध्याकाळी पुजा आरती करावी त्या नंतर सर्वांना प्रसाद द्यावा. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मीव्रत्तास सुरुवात करावी.

हे व्रत वर्षभर पाळावे. अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे. असे अखंड वर्षभर व्रत पाळावे.शेवटी त्याचे उद्यापन करावे. शेवटी तुम्हाला नक्कीच यश लाभेल.

मार्गशीष गुरुवार शुभेच्छा मराठी Margashirsha Mahina


सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा... येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा हीच देवा चरणी इच्छा... मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा!

हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आहे ?
Ans. मार्गशीर्ष महिना यंदा 4 डिसेंबरला सुरू होणार असून 2 जानेवारीला समाप्त होणार आहे.

Q.2) मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरूवार कोणत्या तारखेला येतात ?
Ans.मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरूवार खालील प्रमाणे येतात..
 9 डिसेंबर           : पहिला गुरूवार
16 डिसेंबर          : दुसरा गुरूवार
23 डिसेंबर          : तीसरा गुरूवार
30 डिसेंबर          : चौथा गूरूवार


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad