Type Here to Get Search Results !

साने गुरुजी जयंती मराठी भाषण निबंध माहिती | sane guruji jayanti marathi bhashan nibandh mahiti

 साने गुरुजी जयंती मराठी भाषण निबंध माहिती | sane guruji jayanti 2021 marathi bhashan nibandh mahiti


नमस्कार मित्रांनो आज आपण साने गुरुजी जयंती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. श्यामची आई या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक साने गुरुजी यांची आज जयंती आहे.
24 डिसेंबर 1899 या दिवशी साने गुरुजीचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू 11 जुनं 1950 रोजी झाला होता. अशा प्रकारची संपुर्ण माहिती तुम्हाला पुढे पहायला मिळेल.

साने गुरुजी मराठी माहिती | साने गुरुजी निबंध मराठी 

24 डिसेंबर साने गुरुजी जयंती


साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई सदाशिव साने असे होते. त्याच्या आईने लहानपणीच त्यांना चांगले संस्कार दिले होते. त्यांनी श्यामची आई या पुस्तकात आपल्या आईच्या आठवणी सागितल्या आहेत.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साने गुरुजींनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी केली.तेथे विद्यार्थ्यांचे वसतिगृह देखील सांभाळत असत. साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि शिस्तप्रिय शिक्षणाचे धडे दिले. काही काळातच ते सर्वांचे आवडते शिक्षक झाले.

 साने गुरुजींनी 1928 साली "विद्यार्थी" नावाचे मासिक सुरू केले. त्या काळात आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता. साने गुरुजींवर महात्मा गांधीचा खूप मोठा प्रभाव पडला होता.

आतापर्यंत असा एकही शिक्षक आपण पहिला नाही की त्यांनी स्वतः च्या नोकरीचा त्याग करून स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतला असेल पण साने गुरुजींनी ते करून दाखविले होते. अनेकदा त्यांना तुरुंगात जावे लागते. तुरुंगात असताना त्यांनी पुढील कविता लिहली. 

बलसागर भारत होवो
 विश्वात शोभूनीराहो !!

ही कविता आपण मरेपर्यंत विसरणार नाही. ही कविता राष्ट्रीय एकता, राष्ट्रसेवेची प्रेरणा देते. साने गुरुजींनी अनेक अडचणींवर मात केली. त्यांनी अनेक अत्याचार सहन केले. ते उत्कृष्ठ साहित्यिक झाले. श्यामची आई ही नाशिक येथे तुरुंगात असताना सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी लिहली. या महान क्रांतिकारी शिक्षकाने स्वतः चे जीवन 11 जून 1950 रोजी संपविले. अशा महान आत्म्याला व क्रांतिकारी गुरुजींना मी कोटीकोटी प्रणाम करतो.





अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये join व्हा👇

साने गुरुजींनी लिहिलेली पुस्तके

साने गुरुजींनी खाली दिलेली सर्व पुस्तके लिहिलेली आहेत.
  •  गोड गोष्टी भाग 1-10
  •  दिनबंदू
  •  श्यामची आई
  •  नवा प्रयोग
  •  गुरुजींच्या गोष्टी व इतर कथा
  •  सोन्या मारुती
  •  श्यामचा जीवनविकास
  •  इस्लामी संस्कृती
  •  कुरल
  •  स्वदेशी समाज आणि साधना
  •  चित्रकार रंगा
  •  कर्तव्याची हाक
  •  पूनर्जन्म
  •  चिंतनिका
  •  सती
  •  धडपडणारा श्याम
  •  तीन मुले
  •  सोनसाखळी व इतर कथा
  •  ना खंत ना खेद
  •  विश्राम आणि श्रामाणारी लक्ष्मी
  •  अस्तिक
  •  रामाचा शेला
  •  स्वप्न आणि सत्य
  •  गोप्या आणि मिरी
  •  श्याम
  •  स्वर्गीय ठेवा आई
  •  धडपडणारी मुल
  •  श्यामची पत्रे
  •  भगवान श्रीकृष्ण व इतर चरित्रे
  •  हिमालयाची शिखरे व
  •  कालीमातेची मुले
  •  नवजीवन आणि दुंर्दैव
  •  मंदिर प्रवेशाची भाषणे
  •  मेंग चीयाग व इतर कथा
  •  गोड शेवट
  •  क्रांती
  •  दिल्ली डायरी
  •  ना. गोपाळकृष्ण गोखले
  •  मंगल प्रभात आणि इतर नाटके
  •  जीवनाचे शिल्पकार आणि
  •  भारतीय संस्कृती
  •  कला व इतर निबंध
  •  कला म्हणजे काय?
  •  सुंदर पत्रे
  •  पत्री
  •  संध्या
  •  स्त्री जीवन
  •  गोष्टीरूप गांधीजी
  •  मानवजातीची कथा
  •  गोड निबंध
  •  पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी

हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) साने गुरुजींचे संपूर्ण नाव काय होते ?
Ans. साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते.

Q.2) साने गुरुजीचा जन्म कधी व कोठे झाला ?
Ans. साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या ठिकाणी झाला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad