Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले भाषण निबंध कविता मराठी माहिती | Savitribai phule bhashan nibandh kavita in marathi

 सावित्रीबाई फुले भाषण निबंध कविता मराठी माहिती | Savitribai phule bhashan nibandh kavita in marathi |सावित्रीबाई फुले जयंती 2021 |Savitribai phule information in marathi





नमस्कार मित्रांनो आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध माहिती बघणार आहोत त्यामध्ये भाषण, निबंध आणि कविता यांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले भाषण निबंध मराठी माहिती | Savitribai phule bhashan nibandh marathi mahiti


सावित्रीबाई फुले मराठी भाषण सुत्रसंचलन माहिती

सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विदयार्थी मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.

आज मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा आपल्यासमोर सांगण्यासाठी उभा आहे.

सावित्रीबाई फुले या भारतीयाच्या प्रथम महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, भारतीय स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या यांना मी सर्वप्रथम वंदन करतो. कारण ज्यांच्यामुळे आज स्त्री ही सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे  "कदाचित त्या नसत्या तर कित्येक मुली आजही चुल आणि मुल धरून बसल्या असत्या. 

मित्रहो, अशा थोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हयातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते.

सन 1840 मध्ये वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह थोर विचारवंत ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई निरक्षर होत्या ज्योतिबांनी त्यांना लिहायला , वाचायला शिकवले.

सर्वांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे आणि स्त्रीयांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य सावित्रीबाई व ज्योतिबांनी केले.

1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाईना मान मिळाला. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. त्या मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकत असत पण तरीही त्यांनी या सगळ्याला खंबीरपणे तोंड दिले.

उपेक्षितांच्या जीवनात त्यांनी चैतन्य निर्माण केले. बालविवाह, सती, केशवपण अशा क्रूर प्रथांना त्यांनी विरोध केला. दीन-दुबळ्यांना, अनाथांना, विधवांना त्यांनी आधार दिला. सावित्रीबाईनी स्त्रीयांना "साक्षर व्हा, निर्भर व्हा" असा संदेश दिला. काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर हे
काव्यसंग्रह लिहून समाजाला जागृत करण्याचे काम किले.

1896-97 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. प्लेगच्या रोग्यांची सेवा करीत असतांना सावित्रीबाईना ही प्लेग झाला त्यामुळे 10 मार्च 1897 साली त्यांचे निधन झाले.




अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये join व्हा👇




सावित्रीबाई फुले भाषण निबंध कविता मराठी माहिती | Savitribai phule bhashan nibandh kavita in marathi


सावित्रीबाई फुले मराठी कविता

जिच्यामुळे शिकले दीन दुबळ्याची मुली अन मुले !
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !! धु !!

होता स्वातंत्र्य पूर्वीचा तो काळ ! 
महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार !! 
त्यांच्यासाठी तिने ज्ञानाचे द्वार केले खुले !! १ !!

ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !!

महिला शिक्षणाची किंमत तिला कळली होती !
म्हणून तर अंगावर झेलली चिखल अन माती !! 
धर्माच्या ठेकेदाराला आव्हान तिने दिले ॥ २ ॥

ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !!

पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळवून दिले स्थान ! 
वाढविला जगती महिला वर्गाचा सन्मान !! 
स्त्री शिक्षणासाठी तिने आपले आयुष्य वाहिले!! ३ !!

ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !!

जिच्यामुळे शिकले दीन दुबळ्याची मुली अन मुले ! 
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !! ध्रु !!




सावित्रीबाई फुले भाषण निबंध कविता मराठी माहिती | Savitribai phule bhashan nibandh kavita in marathi


सावित्रीबाई फुले मराठी चारोळ्या 

स्त्रियांच्या शिक्षणाची खरी, 
सावित्री तूच कैवारी,
तुझ्यामुळेच शिकते आहे,
आज प्रत्येक नारी.

सोसूनी अनंत यातना, 
शिकवलेस तू स्त्रियांना,
धन्य धन्य होतो आम्ही,
थोरवी तुझी गाताना.

अज्ञानाच्या बंदिस्त पिंजऱ्यात, 
कैद होती नारी,
संकटाशी करून सामना साऊ,
तू मुक्त केलीस नारी.

व्यथा समाजाची,
ज्योतीबा-सावित्रीने जाणली, 
स्त्रियांच्या शिक्षणाची दारी, 
अविरत ज्ञानगंगा आणली.

चिखल, माती, शेणगोळे,
फेकले जरी अंगावरी समाजाने,
स्त्री शिक्षणाच्या ध्यासाने,
सहन केले सावित्रीने.

सावित्रीच्या लेकी आज, 
जगात कर्तृत्व गाजवत आहेत,
ज्ञानाच्या विशाल नभात,
मुक्त भरारी घेत आहेत.

स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला, 
सावित्री उजळवलेस तू,
क्रांतिज्योती, ज्ञानज्योती,
दीनांची खरी माय तू.

सावित्री केवळ तुझ्यामुळे, 
मिळाले महिलांना ज्ञान, 
जगती आज होती आहे,
महिलांचा सन्मान.

सावित्रीच्या लेकी आम्ही, 
शिकूनी मोठ्या होऊ,
ज्ञानाच्या विशाल नभी, 
उंच गरुडभरारी घेऊ.

तीन जानेवारीला,
नमन करू सावित्रीला,
सावित्रीच्या जन्मदिनाला,
मान मिळाला बालिकादिनाचा.



हे सुध्दा वाचा⤵️



FAQ
Q.1) सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला ?
Ans. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हयातील नायगाव या गावी झाला. 

Q.2) सावित्रीबाईंनी स्त्रियांना कोणता संदेश दिला ?
Ans. सावित्रीबाईनी स्त्रीयांना "साक्षर व्हा, निर्भर व्हा" असा संदेश दिला. 

Q.3) भारतात पहिली शाळा कधी सुरू झाली ?
Ans.1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad