Type Here to Get Search Results !

भोगी 2022 मराठी माहिती | bhogi 2022 marathi mahiti

 भोगी 2022 मराठी माहिती |भोगी कशी साजरी करावी | bhogi 2022 marathi mahiti|भोगी मकरसंक्रांती मराठी माहिती


भोगी 2022 मराठी माहिती



नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण भोगी या सनाविषयी माहिती बघणार आहोत, त्यामध्ये भोगी सण कसा साजरा करावा,भागी या दिवसाचा खास मेनू,भोगी या दिवसाचे धार्मिक महत्त्व हे सर्व तुम्हाला बघायला मिळेल. मकरसंक्रांतीच्या आधी येते ती म्हणजे भोगी,या दिवशी सगळीकडे आनंदाचे,उत्साहाचे वातावरण असते.

अशाच प्रकारच्या सणांच्या माहितीसाठी आमच्या what's up group मध्ये शामिल व्हा 👇

                           What's Up Group links


भोगी 2022 मराठी माहिती|भोगी कशी साजरी करावी | bhogi 2022 marathi mahiti

भोगी 2022 : मकरसंक्रांतीच्या आधल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. मकरसंक्रांतीचा दिवस खरंतर तीन दिवस असतो. पहिल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी मकरसंक्रांत असते आणि तीसऱ्या दिवशी केकरांत असते.

भोगी कोणत्या दिवशी आहे ?
2022 या सालामध्ये भोगी हा सण 13 जानेवारी वार गुरुवार या दिवशी आहे. भोगी या सणाच्याच दिवशी पुत्रता एकादशी सुद्धा आलेली आहे.

''न खाई भोगी तो सदा रोगी'' अशी म्हण आहे.

भोगी हा आनंदाचा, खाण्यापिण्याचा आणि उपभोगाचा सण माणला जातो.

भोगी या दिवशी काय केले जाते ?
भोगी या दिवशी सकाळी लवकर उठून आपल घर आणि आंगण स्वच्छ साफ करून सर्व लोक अभ्यंगस्नान करतात.
मित्रांनो अभ्यंगस्नान हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपलं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी,शरिराला बळकटी येण्यासाठी अभ्यंगस्नान नक्की करा.


मित्रांनो भोगी या दिवशी स्त्रिया आपले सर्व अलंकार परिधान करतात,सुंदर नटतात आणि ज्या स्त्रिया सासरी असतात त्या स्त्रिया आपल्या माहेरी येतात. सगळे लोक मिळुन भोगी हा सण अतिशय आनंदाने साजरा करतात.




भोगी या दिवसाचा खास मेनू :

मित्रांनो भोगी या दिवशी एक खास मेनू सुद्धा असतो बर तो म्हणजे बाजरिच्या भाकरी आणि त्या सुद्धा तीळ लावलेल्यल्या आणि या तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर एक अनोखी भाजी सुद्धा असते.

भोगी या दिवसाची भाजी कशी करतात ?
भोगी या दिवशी एक खास भाजी बनवली जाते. ही भाजी तयार करण्यासाठी बोरे,गाजरे, तील,गेवड्याच्या शेंगा,उस,वांगे अशा अनेक गोष्टी त्यात टाकतात आणि ही भाजी बनते.या भाजीला थेंगाट किंवा खेंदाट असे म्हणतात आणि ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते तुम्ही नक्की खाऊन पहा.


भोगी या दिवसाचे धार्मिक महत्त्व :

भोगी या दिवसाचे धार्मिक महत्त्व असे आहे की ज्या सवासणी स्त्रिया असतात त्या बाजारातुन 5 छोटी गाडगे तर 5 मोठी गाडगे खरेदी करतात. भोगी या दिवशी बाजारातुन आणलेल्या सर्व गाडग्यांमध्ये आपण जे खेंदाटाच्या भाजीमध्ये पदार्थ वापरले होते ते सर्व पदार्थ थोडे थोडे या गाडग्यांमध्ये भरले जातात. यालाच शुद्ध भाषेत वाण पुजणे असे म्हणतात.

मित्रांनो ही जी गाडगी असतात याला सुगड असे म्हणतात, तर या सुगडांचा वापर मकरसंक्रांतीला वौंसा देण्यासाठी केला जातो. वौंसा याचा अर्थ ओटी भरणे असा होतो. ज्या सुवासणी स्त्रिया असतात त्यांना घरी बोलावून त्यांची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी ही सुगड वापरली जातात आणि हळदीकुंकवाचा देखील कार्यक्रम उरकला जातो. मित्रांनो ही सर्व कार्य बऱ्याच ठिकाणी भोगीच्या दिवशीच उरकले जातात.


मित्रांनो तुम्ही सुध्दा भोगी हा सण साजरा करा आणि आपल्या मुला बाळांना देखील याबद्दलची माहिती द्या जेणेकरून आपली परंपरा ही कायम टिकून राहील.



हे सुध्दा वाचा ⤵️













FAQ
Q.1) भोगी कोणत्या दिवशी आहे ?
Ans.2022 या सालामध्ये भोगी हा सण 13 जानेवारी वार गुरुवार या दिवशी आहे.

Q.2) भोगी या दिवसाची भाजी कशी करतात ?
Ans.भोगी या दिवसाची भाजी तयार करण्यासाठी बोरे,गाजरे, तील,गेवड्याच्या शेंगा,उस,वांगे अशा अनेक गोष्टी त्यात टाकतात आणि ही भाजी बनते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad