Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंद भाषण निबंध माहिती pdf मराठी | swami vivekanand speech essay quotes in marathi

स्वामी विवेकानंद भाषण निबंध माहिती pdf मराठी | swami vivekanand speech essay quotes in marathi



स्वामी विवेकानंद भाषण निबंध माहिती pdf मराठी


नमस्कार मित्रांनो स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आपण भाषण निबंध त्याचे विचार मराठी मध्ये बघणार आहोत तरी हा लेख सर्वानी शेवटपर्यंत वाचावा.

स्वामी‌ विवेकानंद भाषण निबंध मराठी | swami vivekanand mahiti marathi |swami vivekanand speech essay in marathi


नमस्कार मित्रांनो आज आपण स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भाषण निबंध बघणार आहोत.

                कुणी लढले न्यायासाठी, 
                सत्यासाठी कोणी लढले !
               धर्मासाठी लढणाऱ्यामध्ये, 
               स्वामी विवेकानंद आदर्श ठरले !!

अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, प्रमुख अतिथी व येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भागीनींनो आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त होते.

स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. लहानपणापासूनच आई वडिलांनी स्वामी विवेकानंदावर उत्तम संस्कार केले.

स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच प्रखर बुद्धिमत्तेचे होते. स्वामी विवेकानंद यांनी इतिहास, विज्ञान, कला, साहित्य, वेद, पुराण, रामायण, महाभारत यांचा पुरेपूर अभ्यास केला. स्वामी विवेकानंद हे फक्त अभ्यासात व वेदांतात च हुशार नव्हते, तर ते खेळ, शारीरिक शिक्षण व व्यायामातही कुशल होते.

रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदाचे गुरू होते. इ.स. 1893 मध्ये अमेरिकेत जागतिक धर्मपरिषेदेत भाषण करताना स्वामी विवेकानंदानी, "माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो" असे उद्गार काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्णाचे संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी विवेकानंदाने रामकृष्ण मिशन सुरु केले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि मातृभूमीचा सेवक बनून झटणे, हा संकल्प स्वामी विवेकानंदानी केला.

           हिंदू धर्माचे वर्चस्व हे अबाधित होते, 
                     अबाधित राहील, 
           हिंदू धर्माला शिव्या आलणाऱ्यांना, 
           स्वामीजी तूमचेच नाव लक्षात राहील..!

  देशभक्त स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारत सरकार कडून युवक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद या महान व्यक्तीचे 4 जुलै 1902 मध्ये पश्चिम बंगाल मधील बेलूर मठ येथे निधन झाले. धन्यवाद !!




स्वामी विवेकानंद निबंध मराठी | swami vivekanand essay speech in marathi


स्वामी विवेकानंद हे तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान तत्वज्ञानी व कुशल वक्ता होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त हे होते. स्वामी विवेकानंदांचे वडील वकील होते; तर आई धार्मिक प्रवृत्तीची होती. स्वामी विवेकानंदाचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त हे होते. लहानपणी स्वामी विवेकानंदावर आई-वडिलांनी उत्तम संस्कार केले.


 स्वामी विवेकानंद लहानपणापासून अलौकिक प्रतिभावान बुध्दीचे त्यांनी तत्वज्ञान, धर्म - इतिहास, सामाजिक विज्ञान, कला व साहित्य इ. विषयाचे सखोल ज्ञान मिळवले. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांनी वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत, अशा हिंदू धर्मग्रंथाचा पुरेपूर अभ्यास केला. स्वामी विवेकानंद हे केवळ वेदोतात तसेच अभ्यासात हुशार नव्हते तर ते खेळ व शारीरिक व्यायामातही कुशल होते.


स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस हे होते. १८८५ मध्ये रामकृष्ण परमहंस खूप आजारी असताना स्वामी विवेकानंदांनी त्यांची मनापासून सेवा केली, पण दुर्देवाने परमहंसाचा मृत्यू झाला आपल्या पूजनीय गुरुच्या मृत्युनंतर स्वामी विवेकानंदानी जनतेच्या उध्दारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले. नंतर पुढे स्वामी विवेकानंदांनी संन्यास घेतला व ते नरेंद्रचे विवेकानंद बनले. त्यांनी संन्यासी वृत्तीने समाजसेवा करीत राष्ट्रउभारणीचे कार्य केले.


स्वामी विवेकानंदांनी जगात ठिकठिकाणी  रामकृष्ण मिशनच्या शाखा स्थापन केल्या. हिंदूधर्माच्या तत्वज्ञानाची ओळख जगाला करून देणे हे या मिशनचे प्रमुख कार्य होते. या मिशनने अनेक ठिकाणी रुग्णालये, अनाथाश्रम व वसतिगृह उभारून समाजसेवेचे अनमोल कार्य हाती घेतले.

इ.स. १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदानी भाषण करताना 'माझ्या प्रिय बंधू भगिनींनो असे उद्गार काढताच परिषदेत दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला. या भाषणात स्वामी विवेकानंद यांनी सर्व धर्म हे समान आहेत ते एकाच उद्दिष्टासाठी आहेत. सर्व धर्मांना अधर्म व अत्याचारांशी लढायचे आहे. हे पटवून दिले.

आयुष्यात फक्त धर्म व समाजसेवा स्विकारून विश्वबंधुत्वाचे नाते निर्माण करणारे स्वामी विवेकानंद हे अलौकिक महापुरूष होते. स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार आजही जगाला प्रेरणा देत आहेत) अशा या महान व्यक्तीचा ४ जुलै १९०२ मध्ये प. बंगालमधील बेलूर मठ येथे निधन झाले.


      स्वामी विवेकानंद आत्मचरित्र pdf

               DOWNLOAD PDF



स्वामी विवेकानंद विचार मराठी pdf | swami vivekanand quotes status in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण स्वामी विवेकानंद जयंती निमित्त त्यांचे विचार (quotes) बघणार आहोत.

Quote - 1

ज्यावेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा करता त्याचवेळी ते काम पूर्ण केले पाहिजे. नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होतो.

Quote-2

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिकत रहा.

Quote - 3

धैर्य ,दृढता आणि पवित्रता
तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.

Quote - 4

दिवसातून कमीत कमी एकदा स्वतःशी बोला.
नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची • बैठक गमवाल.

Quote-5

शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जाणे.


Quote - 6

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही. तोपर्यंत देवालाही तुमच्यावर विश्वास वाटत नाही.


Quote-7

असं कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.


Quote - 8

स्वतःच्या ध्येयावर ठाम राहा. लोकांना जे बोलायचं ते बोलू द्या.एक दिवस हीच लोकं तुमचे गुणगाण करतील.


Quote - 9

जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात, ती लोक भित्री असतात.
जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात, तेच खरे कणखर असतात.


Quote - 10

महान कार्यासाठी नेहमी महान त्याग करावा लागतो.


Quote - 11

सत्यासाठी काहीही सोडून द्यावं. पण कोणासाठीही सत्य सोडू नये.

Quote - 12

उठा, नागे व्हा,ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका.


Quote - 13

संघर्ष करणे जितके कठीण असेल, तितके तुमचे यश शानदार असेल.


Quote - 14

स्वतःला कमजोर समजणे, हे सर्वात मोठे पाप आहे.


Quote - 15

एक रस्ता निवडा. त्यावर विचार करा. त्या विचाराला आपलं जीवन बनवा. यशाचा हाच मार्ग आहे.


Quote - 16

जोखीम उचलायला घाबरू नका. जर तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन कराल.


Quote - 17

जेव्हा तुम्ही व्यस्त असता, Busy असता, तेव्हा सगळं सोपं वाटत पण जेव्हा तुम्ही आळशी असता, तेव्हा काहीच सोपं वाटत नाही.


Quote - 18

मोठ्या योजनांना पूर्ण करण्यासाठी कधीच मोठी उडी घेऊ नका.हळूहळू सुरुवात करा.जमिनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत रहा.


Quote - 19

ज्या दिवशी तुमच्या समोर कोणतीही समस्या नसेल, तेव्हा समजुन जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.


Quote - 20

एकावेळेस एकच काम करा. ते करतांना त्यामध्ये स्वतःची पूर्ण आत्मा टाका आणि बाकी सर्व विसरून जा.



Quote - 21

जसा तुम्ही विचार करता, तुम्ही तसेच बनता.स्वतःला कमजोर मानाल तर कमजोर बनाल आणि स्वतःला सक्षम मानाल तर सक्षम बनाल.


Quote - 22

कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा.
जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.


Quote - 23

जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे.नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगला आहे.


Quote - 24

हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगले चरित्र निर्माण होते.


Quote - 25

जो अनी आपल्याला ऊब देतो, तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा त्या अग्नीचा दोष नाही.


Quote - 26

तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्याचं चांगलं कराल, तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि त्या शुद्ध मनात ईश्वर राहील.


Quote - 27

जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तीसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा असते. तसं असेल तर ती दुरात्मा आहे.


Quote - 28

जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात तुमची निदा करतात, तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या.
असा विचार करा की ते लोक तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमची मदत करत आहेत.


Quote - 29

मन आणि मेंदूच्या युद्धात नेहमी मनाचे एका.


Quote - 30

स्वतंत्र होण्याचे धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत, तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा.आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचे धाडस करा.


Quote - 31

ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. हे आपणच आहोत जे डोळ्यावर हात ठेवून म्हणत आहोत की समोर काळोख आहे.


Quote-32

चिंतन करा, चिंता नाही.
नव्या विचारांना जन्म द्या.


Quote-33

मनुष्य सेवा हीच खरी देवाची सेवा आहे.


Quote - 34

धन्य आहेत ते लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात.


Quote - 35

जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.


Quote - 36

स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल.
ना कोणी तुम्हाला तो शिकवतो, ना कोणतही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतो.कोणीही दुसरे शिक्षक नाही. उलट तुमचा आत्मा आहे.


Quote - 37

जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जिवंत प्राण्यात पाहू शकत नाही, तर आपण त्याला कुठेच शोधू शकत नाही.


Quote - 38

आपलं कर्तव्य आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा.


Quote - 39

वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.


Quote - 40

आपण तेच आहोत जे आपल्या विचारांनी आपल्याला बनवले आहे.त्यामुळे तुम्ही काय विचार करता याची काळजी घ्या.
शब्द राहत नाहीत, विचार राहतात आणि विचार दूरपर्यंत प्रवास करतात.

स्वामी विवेकानंद विचार (quotes) मराठी pdf

                DOWNLOAD PDF




हे सुध्दा वाचा ⤵️














FAQ
Q.1) स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते ?
Ans.स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते.

Q.2) स्वामी विवेकानंद यांचे गुरू कोण होते ?
Ans.रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरू होते.

Q.3) स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला ?
Ans.स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad