Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचान मराठी | republic day speech essay in marathi

 प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचान मराठी| republic day speech essay pdf in marathi | 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी




नमस्कार मित्रांनो आज आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवसाबद्दल भाषण निबंध कविता सुत्रसंचलन मराठी मध्ये बघणार आहोत. 26 जानेवारी जवळ आली की सर्व लहान मुले, विद्यार्थी, शिक्षक, पालक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी भाषण (26 January prajasattak din bhashan), निबंध, सुत्रसंचालन, कविता आणि घोषणांच्या तयारीला लागतात.

आज 26 जानेवारी या दिवसाच्या निमित्ताने तुमच्यासाठी खास 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी माहिती, निबंध pdf, भाषण pdf अतीशय सोप्या रूपात घेऊन आलो आहोत. या सर्व माहितीचा उपयोग 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी करता येईल.



26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी माहिती | prajasattak din bhashan marathi pdf|26 January republic day speech in marathi 


 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ( republic day ) सुत्रसंचालन सुरुवात चारोळ्या 


                उत्सव तीन रंगाचा, 
             आभाळी आज सजला,
             नमस्तक मी त्या सर्वांचा,
      ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला,

माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरूजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या देशबांधवानो, आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत. 26 जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या मंगलदिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मित्र हो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त, स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती. त्या शिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता. आपल्या देशात सर्वांना सुख समाधानाने, शांततेत जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरु झाले.

                    चला करूया या,
             संविधानाचा आदर आज, 
                ज्याने दिला आपणास, 
         जगण्याचा, शिकण्याचा अधिकार.


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस अथक परिश्रम घेवून देशाचे समृद्ध संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. आपल्या देशांचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयास भेदभावाशिवाय समान हक्क अधिकार मिळालेले आहेत.

आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. आज त्या सर्व शूर वीरांना आपण वंदन करूया कारण त्यांच्यामुळे आज आपण मुक्त श्वास घेत आहोत. आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांचा आपण सदैव सन्मान करूया.
                     विविधतेत एकता,
                     आहे आमची शान, 
                   म्हणूनच आहे आमचा,
                      भारत देश महान.

थोर आमची भारतमाता आम्ही तिचे संतान आमुचा भारत देश महान बोला, भारत माता की जय, वंदे मातरम् !
अशाप्रकारे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल येवढे बोलुन मी माझे दोन शब्द शंपवतो "जय हिंद जय भारत" 
                       धन्यवाद



26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण pdf मराठी

 




 हे सुध्दा वाचा ⤵️











FAQ : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 


Q.1) २०२२ प्रजासत्ताक दिन कितवा आहे ?
Ans.२०२२ प्रजासत्ताक दिन ७३ वा आहे.

Q.2) २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतात ?
Ans. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला.

Q.3) प्रजासत्ताक दिन कधी असतो ?
Ans. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad