google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 10वी आणि 12वी परिक्षेबाबतचा राज्य शासनाचा नवीन निर्णय | 10th and 12th Exam New Update 2022
Type Here to Get Search Results !

10वी आणि 12वी परिक्षेबाबतचा राज्य शासनाचा नवीन निर्णय | 10th and 12th Exam New Update 2022

 10वी आणि 12वी परिक्षेबाबतचा राज्य शासनाचा नवीन निर्णय | 10th and 12th Exam New Update 2022


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज राज्य शिक्षण मंडळाची बैठक झाली असुन त्यामध्ये 10 वी -12 वी परीक्षेसंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने आज स्पष्ट केले आहे.

 12 वी च्या परीक्षा 4 मार्च ते 07 एप्रिल 2022 , तर 10 वी 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहे - अशी माहिती राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी  दिली आहे.

अशाच प्रकारच्या शैक्षणिक माहितीसाठी आमच्या what's up group मध्ये जॉइन व्हा.
                          ⤵️

         What's up group link



 10वी आणि 12वी परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे ?

इ 10वी, 12वीचे जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ शकले नाहीत ते विद्यार्थी लेखी परीक्षेनंतर ही परीक्षा देऊ शकणार आहेत , 5 एप्रिल ते 22 एप्रिल या काळात या परीक्षा होणार आहेत.


इ 10वी, 12वी चा विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत त्यांचे परीक्षा केंद्र असेल. ज्या शाळेचे 15 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी असतील अशा शाळेला उपक्रेंद मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटे अधिक वेळ दिला जाईल तसेच 70-100 गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास जास्त वेळ देण्यात येणार आहे.






सकाळच्या सत्रातील परीक्षा 10.30 वाजता सुरु होणार आहे ,तर विद्यार्थ्यांना 10.20 वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत.

दुपारच्या सत्राची परीक्षा 2.30 वाजता सुरु होईल आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका 2.20 वाजता देण्यात येणार आहेत.

10वी 12वीच्या परिक्षा 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा असणार आहेत आणि याव्यतिरिक्त प्रात्यक्षिक परीक्षा शाळेतील शिक्षकच घेणार आहेत.

10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांपर्यंत हि बातमी नक्की पोहोचवा.



हे सुध्दा वाचा⤵️















FAQ
Q.1) इ 10वी ची लेखी परीक्षा कधी होणार आहे ?
Ans. इ 10वी ची लेखी परीक्षा 15 मार्च ते 04 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे.

Q.2) इ 12वी ची लेखी परीक्षा कधी होणार आहे ?
Ans. इ 12वी ची लेखी परीक्षा 04 मार्च ते 07 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad