google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन निबंध मराठी | international mother language day 2022
Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन निबंध मराठी | international mother language day 2022

 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन निबंध मराठी | international mother language day 2022 |27 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन 2022 | jagtik matrubhasha din 27 Feb 2022


27 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस : नमस्कार मित्रांनो आज आपण आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात आणि प्रत्येकाची भाषा वेग-वेगळी पहायला मिळेल. भारतात एकूण 1300 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. आपल्या भाषेत बोलली जाणारी भाषा त्या भाषेची मायबोली म्हटली जाते.

मातृभाषा म्हणजे अशी भाषा जी लहान मुलं सर्वप्रथम आपल्या घरात बोलतात, ही भाषा त्याला त्याची पहिली गुरु म्हणजे त्याची आई त्याला शिकवते. भाषा विचारांची देवाण-घेवाण करण्याचा एक माध्यम आहे. मग ती भाषा कुठलीही असो. 



आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन निबंध मराठी माहिती | international mother language day essay in marathi  


आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी २१ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

१७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्को ने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला. या दिवशी प्रत्येक माणसाने आपल्या मातृभाषेच्या विकासासाठी काही क्षण खर्च करून दुसऱ्या भाषेतील ज्ञान आपल्या मातृभाषेत आणले पाहिजे.

 मातृभाषा दिवस साजरा करणे हे भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि जगातील बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणे आहे. 2008 मध्ये भाषा आंतरराष्ट्रीय वर्ष जाहीर केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल विधानसभा आंतरराष्ट्रीय आई भाषा दिवस या शब्दाचा उच्चार केला.

 युनेस्कोने जाहीर केलेला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस', बांगलादेशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.

 भाषा हा सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय, आपली भाषा ही आपली व आपल्या संस्कृतीची ओळख असते. फक्त एक संपर्काचे माध्यम' इतकाच भाषेचा उपयोग आणि तिची व्याप्ती नाही. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैयक्तिक असे अनेक महत्व मानवी भाषेला आहेत. आणि म्हणूनच ती मानवी जीवनाचे इतके महत्त्वाचे अंग आहे. मातृभाषा' म्हणजे तर सामाजिक जीवनाची पहिली पायरीच.

एका विशिष्ट समूहाशी मातृभाषा आपले नाते जोडून देते. आजूबाजूच्या परिसरातून मिळणाऱ्या ज्ञानाला, सौंदर्याला, आनंदाला भरभरून प्रतिसाद देण्याचे एकमेव साधन म्हणजे आपली मातृभाषा होय. घरच्या अंगणात खेळावं इतकी सहजता आणि इतके आपलेपण मातृभाषेत बोलताना असते. म्हणूनच कदाचित सगळ्यांसाठी मातृभाषा हा इतका भावनिक पातळीवरचा विषय होऊन बसतो.



हे सुध्दा वाचा ⤵️












FAQ
Q.1) आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो.

Q.2) युनेस्कोने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी जाहीर केला ?
Ans.१७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्को ने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad