Type Here to Get Search Results !

मराठी राजभाषा दिन भाषण निबंध सुत्रसंचालन | marathi languages day 2022

 मराठी राजभाषा दिन भाषण निबंध सुत्रसंचालन | marathi languages day 2022 | मराठी भाषा दिन 2022 निबंध कविता मराठी माहिती | marathi bhasha din information in marathi |मराठी भाषा गौरव दिन भाषण मराठी


मराठी राजभाषा दिन भाषण निबंध सुत्रसंचालन


मराठी राजभाषा दिन 2022 : नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा दिन याविषयी माहिती बघणार आहोत. महान असे राष्ट्र अशी ओळख असलेले राज्य म्हणजेच महाराष्ट्र या राज्याची मातृभाषा मराठी आहे.

मराठी राजभाषा दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी राजभाषा दिन भाषण,निबंध, कविता आणि चारोळ्या. या सर्वांचाचा तुम्हाला नक्की फायदा होईल.


     मराठी भाषा दिवस सुत्रसंचालन pdf 
                         ⤵️
             DOWNLOAD PDFमराठी राजभाषा दिन भाषण मराठी माहिती | marathi bhasha din bhashan marathi 

 माय मराठी, साद मराठी भाषांचा भावार्थ मराठी !
बोल मराठी, चाल मराठी जगण्याला या अर्थ मराठी !!

 माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा !
 हिच्या संगाने जागल्या, द-याखोऱ्यांतील शिळा !!

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर "वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित सर्व मराठी भाषा रसिकहो,
आज २७ फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक, नाटककार वि.वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ! 

कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे कुशल लेखन केले. त्यांची विशाखा ही कांदबरी भारतीय साहित्या तील उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमचे भूषण ठरले आहे.नटसम्राट सारखे अजरामर नाटक कुसुमाग्रजांच्या प्रतिभेची ओळख पटवून देते.

"मराठी ही सर्वांगसुंदर भाषा आहे. मराठी ही भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी एक भाषा आहे. भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी मराठी ही तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या २ राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे. मराठीची साहित्यसंपदा विपुल आहे. तिला थोर परंपरा लाभली आहे.

मराठी भाषा अनेक संताच्या कीर्तनांनी, भारुंडानी, ओव्यांनी, भजनांनी सजली आहे. ती अनेक मराठी साहित्यिकांच्या प्रतिभासंपन्न अशा लेखनींनी समृध्द, संपन्न झाली आहे. थोर संत ज्ञानेश्वर माउली मराठीची थोरवी गाताना म्हणतात की,

              माझा मराठीची बोलू कौतुके, 
              परि अमृतातेही पैजासी जिंके, 
              ऐसी अक्षरे रसिके मळवान

 मराठी भाषा अमृतालाही पैजेने जिंकणारी आहे. तिचा गोडवा अमृतापेक्षाही अधिक आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले. त्यांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.

मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा गौरव दिन हा सर्व शाळा, कॉलेजमध्ये तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमाद्वारे साजरा केला जातो. अनेक ठिकाणी मराठी नाटक, कविता, वकृत्व, निबंध, स्नेहसमेलनाचे आयोजन केले जाते. सध्या इंटरनेटच्या युगात गुगलसारख्या नामवंत कंपनीने मराठीचे महत्व ओळखले आहे. आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान सदैव बाळगावा. मराठी भाषा टिकवण्यासाठी, समृध्द करण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत. शेवटी जाता येवढेच बोलू इच्छितो की...

      माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन !
      स्वर्गलोकांहून थोर, मला हिचे महिमान !!

           लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
           जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !
           धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
           एवढ्या जगात माय मानतो मराठी !!


मराठी राजभाषा दिन कविता मराठी |marathi rajbhasha din kavita marathi


मराठी राजभाषा आमची,महाराष्ट्राची शान !
भजन, कीर्तन ऐकताना,हरपते भान !! 


काना, मात्रा, वेलांटीचे मिळाले वाण !
साहित्य अन् इतिहास, मराठीचा महान !!


मराठी मायबोली आमची,बोल रसाळ !
भाषा सहज सुंदर, प्रेमळ लडिवाळ !!


मराठी भाषेचा आम्हां,सदा गर्व !
मराठी भाषा दिन,साजरा करु सर्व !!


जय महाराष्ट्र ! जय मराठी ! जय भारत !!हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ मराठी राजभाषा दिन शुभेच्छा संदेश मराठी

➡️ मराठी भाषा गौरव दिन चारोळ्या

➡️ मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये मराठी

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन

➡️ MHT-CET ऑनलाईन अर्ज कसा करावा

➡️ 10वी सराव प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्र बोर्ड

🆕 इ 1ली ते 9वी पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका संच pdf
➡️ 12वी प्रश्नपत्रिका संच pdf महाराष्ट्र बोर्ड

➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचलन

➡️ नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती भाषण निबंध

➡️ बाळासाहेब ठाकरे भाषण निबंध मराठी

➡️ संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहीती
FAQ
Q.1) मराठी राजभाषा दिन कधी असतो ?
Ans. मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारीला असतो.

Q.2) मराठी राजभाषा दिन कोणाच्या जन्मदिवसा निमित्त साजरा केला जातो ?
Ans.मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक, नाटककार वि.वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो.

Q.3) नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण होते ?
Ans. नटसम्राट सारखे अजरामर नाटक कुसुमाग्रजांनी लिहिले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad