google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी | National science day speech in marathi
Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी | National science day speech in marathi

 राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी | National science day speech essay in marathi


राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी

नमस्कार मित्रांनो आज आपण 28 फेब्रुवारी या रोजी साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन या दिवसाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.


राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी माहिती | rashtriya vidnyan din bhashan speech essay in marathi


     प्रश्न किती गहन असो उत्तर देते विज्ञान

      तर्काच्या सुगंधाचे अंत्तर देते विज्ञान

   अंधश्रद्धेच्या पलीकडचे पाहू शकते विज्ञान 

  तुमच्या माझ्या श्रद्धे सोबत राहू शकते विज्ञान  


सन्माननीय व्यासपीठ, आम्हाला विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे आदरणीय गुरुजन आणि नव्या विज्ञानयुगाचे पाईक असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो...

२८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा करीत आहोत कारण सर अल्फ्रेड नोबेल या महान शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ जगातला सर्वात मानाचा असा नोबेल पुरस्कार दिला जातो.


डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण म्हणजेच सी व्ही रमण या वैज्ञानिक असलेल्या भारत मातेच्या महान सुपुत्राने २८ फेब्रुवारी १९३० रोजी आपल्या प्रकाशकिरणांच्या संशोधनासाठी हा पुरस्कार पटकावला म्हणूनच या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करीत असतो. तसेच भारत या देशाला महान वैज्ञानिक परंपरा लाभली आहे. वैदिक काळापासून भारतीय लोक कालगणना करू शकत होते.


आर्यभट्ट यांच्यासारखे खगोल तज्ञ, महर्षी चरकांसारखे आयुर्वेद विशारद, नागार्जुन यांच्यासारखे रसायनशास्त्री, आणि महर्षी कणाद यांच्यासारखे भौतिक शास्त्री हे महापुरुष भारतानेच विश्वाला दिले आहेत. भारतीय अनु शक्तीचे जनक डॉक्टर होमी जहांगीर भाभा, भारतीय अवकाश संशोधनाचे पिताश्री डॉक्टर विक्रम साराभाई, हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरीयन, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर जगदीश चंद्र बोस अशा कितीतरी भारतीय शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. या सर्वांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा आजचा दिवस.


आपणा सर्वांना ज्यांचा सार्थ अभिमान वाटतो ते मिसाईल मॅन म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे देखील एक वैज्ञानिक होते.


मित्रहो आज विश्वात त्याच राष्ट्राला मान आहे ,

ज्या राष्ट्राकडे प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे.


देशाला संरक्षण क्षेत्रात मजबूत बनविण्यासाठी, कृषी तसेच औद्योगिक उत्पादने वाढविण्यासाठी, देशाच्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी आणि महान स्वयंपूर्ण राष्ट्राच्या निर्मितीसाठी विज्ञानाची कास धरण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. आज संपूर्ण विश्वात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा आणि भारतीय तरुणांचा बोलबाला आहे. यातून प्रचंड रोजगारनिर्मिती होत आहे आणि भारताला परकीय चलन मिळत आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल.


परंतु आजही आपल्या देशातील काही भागात अंधश्रद्धा आणि रुढी-परंपरांचा पगडा तसाच पाहायला मिळतो. अज्ञानी लोकांची फसवणूक आणि शोषण पहायला मिळते. हे चित्र बदलणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे.


तेव्हा आपण सारे नव्या शतकातील भारतीय नागरिक आजच्या विज्ञान दिनी हा संकल्प करूयात नव्या युगासाठी विज्ञानाची साथ घेऊयात आणि प्रगतीचे पाईक होऊयात.

 तेव्हाच जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान हा नारा खरा ठरू शकेल.

       जय हिंद, जय भारत...

हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी

➡️ मराठी भाषा गौरव दिन चारोळ्या

➡️ मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये मराठी


FAQ

Q.1) राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो ?

Ans. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या रोजी साजरा केला जातो.


Q.2) राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो ?

Ans.डॉक्टर सी व्ही रमण या वैज्ञानिक असलेल्या भारत मातेच्या महान सुपुत्राने २८ फेब्रुवारी १९३० रोजी आपल्या प्रकाशकिरणांच्या संशोधनासाठी सर अल्फ्रेड नोबेल हा पुरस्कार पटकावला म्हणूनच या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करीत असतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad