Type Here to Get Search Results !

संत गाडगेबाबा भाषण निबंध माहिती मराठी | sant gadge baba information in marathi

 संत गाडगेबाबा भाषण निबंध माहिती मराठी | sant gadge baba information in marathi | संत गाडगेबाबा माहिती मराठी pdf


संत गाडगेबाबा भाषण निबंध कविता मराठी


संत गाडगेबाबा जयंती २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त भाषण, निबंध, कविता आणि त्यांच्याविषयी माहिती बघणार आहोत.


संत गाडगेबाबा यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठ्या आनंदात साजरी केली जाते. २७ फेब्रुवारी या दिवशी संपूर्ण शासकीय शाळांमध्ये विद्यार्थी भाषण,निबंध, कविता सादर करून संत गाडगेबाबा जयंती साजरी केली जाते. अशाप्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढिल लेखात पहायला मिळेल.संत गाडगेबाबा भाषण निबंध मराठी माहिती | sant gadge baba bhashan nibandh marathi mahiti


             “देव दगडात, देव नाही दगडात !
       देव दाखविला तुम्ही, माणसाच्या हृदयात ॥”

सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रीय मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला संत गाडगेबाबा यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही नम्र विनंती...

स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड, महाराष्ट्रामध्ये अंधश्रध्देचे साम्राज्य पसरलेले होते. साधेभोळे, अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते. अशा वेळी या सामान्य माणसांना मनुष्याच्या हृदयातील देवाची ओळख करून देणाऱ्या महान संताचा जन्म महाराष्ट्रात झाला. असा हा माणसातील देव शोधणारा संत म्हणजे गाडगेबाबा होय. 

संत गाडगे बाबां यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेणगाव या गावी झाला. त्यावेळी समाजावर अन्याय अत्याचारांचे डोंगर रचले जात होते. त्यातुन दुःखाच्या नदया वाहत होत्या. अंधश्रध्देचे "थैमान माजले होते. मुक्या प्राण्यांचे बळी दिले जात होते. रक्ताचे पाट वाहत होते. माणसांचा चिखल होत होता. सावकार गरिबांच्या गळ्यात फास आवळत होते. हे सारे काही संत गाडगेबाबा यांना बघवले नाही आणि अखेर त्यांनी घराचा, संसाराचा त्याग केला आणि परिश्रमाचे व्रत स्विकारले.

     सोडून सर्व घरदार, तोडले पाश मायेचे ।
 अनवाणी फिरून पायी, अश्रू पुसले बहुजनांचे ॥

डोक्यावर झिंज्या, अंगावर चिंध्या, एका हाती खराटा, फुटक्या मडक्याच्या खापराचे भोजनपात्र असा संत गाडगेबाबांचा वेश होता. ज्या गावात संत गाडगेबाबा जात, ते गाव हाताती खराट्याने स्वच्छ करत व संध्याकाळी गावातील लोकांच्या मनातील घाण कीर्तनाच्या माध्यमातुन स्वच्छ करत.

   'हाती घेऊन खराटा अवघ्या झाडल्या रे वाटा।

पुराणातील भाकडकथा संत गाडगे बाबांनी कीर्तनात कधीच सांगितल्या नाहीत. बाबांचे कीर्तन म्हणजे सर्वसामान्य माणसांना जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ होता.

संत गाडगेबाबा म्हणतात अडाणी राहू नका, पोरांना शाळेत पाठवा, सावकाराचे "कर्ज काढू नका, मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका. दगडा "च्या देवाची पूजा करू नका. देव दगडात नाही, अरे देव तर माणसांच्या हृदयात आहे. संत गाडगेबाबा  यांचा हा उपदेश सामान्यांच्या जीवनाला दिशा देणारा होता. माणसाच्या हृदयातील देव शोधून दाखवणाऱ्या या संताने अंधश्रध्देला प्रखर विरोध केला.अनेक प्रसंगी स्वतः पुढाकर घेऊन सामान्य माणसांना अंधश्रध्देपासून परावृत्त करण्याचे काम गाडगेबाबांनी केले.

तहान भुकेची पर्वा न करता बहुजन समाजाची दुःख "स्थिती पहात, त्यांचे दुःख आपल्या हातांनी पुसण्यासाठी "अनवाणी पायांनी संत गाडगेबाबा  वणवण भटकत राहिले. हातातील गाडम्यामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत. एखादया गावात अंगावरील चिंध्यांमुळे चिंधेबाबा म्हणत तर विदर्भ व मराठवाड्यात वट्टीबाबा म्हणत. पण खरया अर्थाने ते रंजल्या गांजलेल्यांचे बाबा होते.

संत गाडगेबाबा म्हणजे मानवतेचे पुजारी. माणसातील देव शोधणारे खरे आणि वीर बुद्धिवंत होते. मानवार्च पूजा करणान्या या थोर संताकडे पाहिले की, संत तुकारामांच्यात अभंगाची आठवण होते.

              “जे का रंजले गांजले ।
              त्यासी म्हणे जो आपुले ॥
              तोचि साधू ओळखावा ।
              देव तेथेचि जाणावा ॥"

येवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत !

हे सुध्दा वाचा ⤵️
FAQ 
Q.1) संत गाडगेबाबा यांचे पुर्ण नाव काय होते ?
Ans. संत गाडगेबाबा यांचे पुर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होते.

Q.2) गाडगे महाराजांचा विवाह कधी झाला ?
Ans. गाडगे महाराजांचा विवाह १८९२ मध्ये कांताबाईशी झाला.

Q.3) संत गाडगेबाबा यांच्या जिवनावर कोणी कादंबरी लिहिली ?
Ans. विठ्ठल वाघ यांनी १९९९ साली 'डेबू' ही संत गाडगेबाबा यांच्या जिवनावरील कादंबरी लिहिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad