Type Here to Get Search Results !

शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी | shivaji maharaj bhashan nibandh marathi

 शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी | shivaji maharaj bhashan nibandh marathi | छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी माहिती pdf | Chatrapati shivaji maharaj speech essay in marathi


शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी


शिवाजी महाराज जयंती 2022 : नमस्कार मित्रांनो आज १९ फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत शिवाजी महाराजांवर मराठी भाषण, निबंध, चारोळ्या आणि कविता. या भाषणाचा शाळेत लहान मुलांना भाषन देण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

१९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शाळेत भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. म्हणूनच खालील लेखात दिलेल्या भाषणाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

शिवाजी महाराज भाषण निबंध मराठी | shivaji maharaj bhashan marathi pdf nibandh              


            नाही कुणापुढे झुकला
              नाही कुणापुढे वाकला
नाही भीत कोणाला वाघ म्हणतात या मर्दाला
असा मर्द मराठा राजा शिवराय एकला !!

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित तरुण व तडपदार शिवभक्तांना.
सर्वांना माझा नमस्कार....

आज मी येथे अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !!!

१९ फेब्रुवारी १६३० हा सोन्याचा दिवस या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्हयातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. ती सिंह म्हणजे जनतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले हीय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते.

शिवराय लहानपणापासूनच अत्यंत दुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना जिजाऊ मातेकडून चांगले संस्कार व शिकवण आणि वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला.तर दादोजी कोंडदेव यांनी शुध्दकला शिकवली. बालवयातच त्यांनी अनेक युध्द कलांचे प्रशिक्षण घेतले.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले आणि रायरेश्वराच्या मंदिरात जावून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली.

त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू. स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक शूर वीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती.


 शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले आणि राजमाता जिजाऊंने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. शिवरायांनी अनेक गड जिंकले गुलामगिरी नष्ट केली रयतेला अंधारातून प्रकाशात आणले. स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला

६ जून १६७४ रीजी छत्रपती शिवाजी राजांचा "राज्याभिषेक करण्यात आला. रयतेला लोककल्याण कारी व न्यायप्रिय राजा मिळाला.३ एप्रिल १६८० मध्ये शिवरायांचे निधन झाले. जाता जाता येवढेच बोलू इच्छितो की..

                   एक होते शिवाजी, 
                 भीती नव्हती जगाची,
              चिंता नव्हती परिणामांची,
  साथ होती आई भवानी व माता जिजाऊची, 
             मुहूर्त मेढ रोवली स्वराज्याची,
 म्हणूनच म्हणतात "जय भवानी जय शिवाजी !!


प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान आहे..शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर एक स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे शिल्पकार होते.

      जय भवानी !! जय शिवाजी !!!

छत्रपती शिवाजी महाराजांवर चारोळ्या मराठी | Chatrapati shivaji maharaj charolya | शिवाजी महाराज शेरो शायरी


“लखलख चमचम तळपत होती शिवबांची तलवार ! महाराष्ट्राला घडविणरे तेच खरे शिल्पकार!"


“नाही कुणापुढे झुकला,नाही कुणापुढे वाकला
असा मर्द - मराठा राजा शिवराय एकला "


 “इतिहासाच्या पानावर, मातीच्या कणावर,रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती राजा."


 “निधड्या छातीचा,दनगड कणाचा,मराठी मनाचा भारत भूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी राजा !! 


“सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
छत्रपती शिवाजी राजे नसते
तर.... हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता."


 “कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायचे म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायचे जय शिवराय !"


“मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा आजही गौरव गीते गाती तो ओवाळूनी पंचारती तो फक्त शिवछत्रपती !"


'ओम' बोलल्याने मनाला शांती मिळते! 'साई' बोलल्याने मनाला शक्ती मिळते! 'राम' बोलल्याने पाप मुक्ती मिळते,'जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकत मिळते !!"


छत्रपती शिवाजी महाराज कविता मराठी | shivaji maharaj poem in marathi | shivaji maharaj kavita marathi


               धगधगत्या ज्वालातून
                 पेटल्या मशाली
             स्वराज्याच्या संकल्पनेची
                नवी पहाट झाली
            दरीदरीतून नाद गुंजला
        महाराष्ट्रात भगवा सूर्य उगवला !!

               सहयाद्रीच्या कुशीतून
               एक हिरा चमकला
              भगवा टिळा चंदनाचा
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला
हातात घेऊनी तलवार शत्रूवर गरजला !!

              नाही कुणापुढे झुकला
              नाही कुणापुढे वाकला
नाही भीत कोणाला वाघ म्हणतात या मर्दाला
असा मर्द मराठा राजा शिवराय एकला !!

   !!  जय भवानी जय शिवराय !!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad