google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 Shivjayanti quotes wishes status marathi | शिवजयंती शुभेच्छा संदेश कोट्स स्टेट्स सुविचार मराठी
Type Here to Get Search Results !

Shivjayanti quotes wishes status marathi | शिवजयंती शुभेच्छा संदेश कोट्स स्टेट्स सुविचार मराठी

 Shivjayanti quotes wishes status in marathi | शिवजयंती शुभेच्छा संदेश कोट्स स्टेट्स सुविचार मराठी




शिवजयंती 2022 : नमस्कार मित्रांनो आज 19 फेब्रुवारी म्हणजेच स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवजयंतीचा दिवस म्हणजे मोठ्या उत्साहात आनंदाचा दिवस यादिवशी सर्वजन एकमेकांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देतात म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत शुभेच्छा संदेश, स्टेटस, सुविचार संग्रह तेही मराठीमध्ये.


छत्रपती शिवाजी महाराजांची थोडक्यात माहिती मराठी |Chatrapati shivaji maharaj information in marathi

  • इ.स. 19 फेब्रुवारी 1630 (तारखेप्रमाणे) रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला.
  • महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे,शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात.
  •  शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू होत्या.
  •  इ.स. 1647 मध्ये 17 वर्षांच्या शिवाजी राजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणा गड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकले. या शिवाय तोरणा गडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला "मावळ' आणि खोऱ्यातील सैनिकांना 'मावळे" म्हणत.
  • राजे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.
  •  रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीराजांनी उभे केले आणि इ.स. 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
  • महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे संघर्षमय जीवन प्रत्येकाला प्रेरणा देते. राजेंच्या जीवनातील प्रत्येक पाऊल प्रेरणेच्या अफाट समुद्राचा उगमस्रोत आहे. महाराजांचे नावच छातीत ज्वाला पेटवण्यासाठी पुरेसे आहे.





शिवजयंती शुभेच्छा संदेश कोट्स स्टेट्स विचार मराठी | shivjayanti wishes quotes status in marathi


🎯 छत्रपती शिवाजी महाराज की जय 

अंगात हवी रग,रक्तात हवी घग,छाती आपोआप फुगते एकदा शिवराय बालुन बघ !

♦️शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती, अरे मरणाची कुणाला किती कारण आमचे आदर्श आहेत राजे शिवछत्रपती.

💥 शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी

जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य !

💠 शिवजयंती स्टेटस मराठी

 विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला, वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्गात देवांनीही जयमाला  झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.

🔯 Chatrapati shivaji maharaj jayanti wishes in marathi

 सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.

🌐 Shivjayanti quotes in marathi

देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे पाहिले खुप जन पाहिले,पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे, छत्रपती शिवराय माझे.

💠 Shivjayanti wishes in marathi

एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला.

🔵 Shivjayanti status in marathi

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे, ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी, ज्यांच्यासोबत मरतांनाही भागीदारी करता येईल.

🔰 Shivjayanti sms messages in marathi

 जातीपेक्षा मातीला अणि मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.

🎯 Shivjayanti photos HD in marathi

ना शिवशंकर, ना कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा तो राजा छत्रपती.

♦️ Shivjayanti images in marathi

 कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल, तर मी तो शोघेन. जर कोणताही मार्ग नसेल, तर तो मी निर्माण करेल.

🔯 Shivjayanti suvichar in marathi

ज्याचे विचार मोठे असतात, त्याला भलामोठा डोंगरही मातीचा गोळा वाटतो.


🌐 Shivjayanti shubhechha in marathi

 श्वाशात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती हिंदू वाघ.


💠 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 

हातात धरली तलवार, छातीत भरले फोलाद, धन्य हा महाराष्ट्र धन्य आपले महाराज!

🔵 छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण

 दिनदुबळ्यांचा वाली तो, गरीबांचा कैवारी तो. ना धरतीचा ना स्वर्गाचा, रयतेचा राजा तो.

🔰 छत्रपती शिवाजी महाराज विचार मराठी

कापल्या जरी आमच्या नसा, तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची.

🎯 Shivjayanti marathi suvichar

आज राजेंमधला एक जरी गुण आपण अंगिकारला, तर राजे मनापासून खुश होतील. त्यांच्या मावळ्यांकडून त्यांना हाच खरा मानाचा मुजरा ठरेल.

♦️ Shivjayanti marathi status

दिला तर दनकाचं, मोडला तर मनकाच, बोललो तर एकदाच आणि झुकलो तर मुजराच. तोही फक्त शिवछत्रपतींनाच.

💥 Shivjayanti marathi quotes

राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिराना कळस आणि दारात तुळस,राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाळ आणि दिसली हिंदवी स्वराज्याची सकाळ.

🔯 Shivjayanti marathi sms messages

पैसा पुढच्या पिढींना देता येतो. पण शहाणपण देता येत नाही. तलवार देता येते पण शौर्य देता येत नाही. म्हणूनच ४०० वर्षात छत्रपती शिवाजी महाराज एकच झाले.

🌐 Chatrapati shivaji maharaj quotes in marathi

सोन्याची खाण तर अख्या जगात सापडेल. परंतु माझ्या शिवरायांसारखा हिरा फक्त महाराष्ट्रातच सापडला.

💠 Chatrapati shivaji maharaj status in marathi

रक्ताची नाती नसताना जे फक्त शिवरायाच्या नावावर एकत्र येतात त्यांनाच कट्टर शिवभक्त म्हणतात.

🔵 Chatrapati shivaji maharaj jayanti 2022

सृष्टीच्या निर्मितीनंतर जगात सर्वात मोठ्या आश्चर्याचे आणि घाडसाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे शिवराय.

🔰 Chatrapati shivaji maharaj images in marathi

घाडस असं करावं की जे जमणार नाही दुसऱ्या कुणाला. अन् इतिहास असा करावा की ३३ कोटी देवांची फौज उभी राहील मुजऱ्याला.


 🎯 Chatrapati shivaji maharaj sms messages in marathi

तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वाट्याला आलेला संघर्षच एवढा मोठा होता.

💠 Shivjayanti quotes wishes status marathi mahiti

पैज लागली होती जगातील सर्वात शक्तीशाली शब्द लिहायची,सगळे पुस्तक चाळत होते आणि मी छत्रपती लिहून मोकळा झालो.

🌐 Shivjayanti rangoli marathi

तुम्हाला पद नाही म्हणून नाराज होऊ नका. छत्रपती शिवरायांनी तुम्हाला जगातील सर्वोत्तम पद दिलंय ते म्हणजे मावळा.

🔯 Shivjayanti banner in marathi

जगणारे ते मावळे होते. जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरुन जनतेकडे मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता.

 

♦️ Shivjayanti photoshoot marathi

 शिवकाळात आनंदात होती प्रजा. म्हणून सर्व म्हणती शिवबा आमचा जाणता राजा.

 

🎯 Shivjayanti shayari in marathi

 सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्य स्थापन करता येते.

🔯 शिवजयंती शायरी मराठी

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते,तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

🌐 शिवजयंती बॅनर मराठी

उभ्या आयुष्यात एकच ध्यास, असुदे हातात भगवा आणि काळजात शिवबा.

💠 शिवजयंती स्टेटस मराठी

शत्रुची फौज कधीच मोजू नका. आपल्यातील फितूर किती आहे हे मोजा.

🔵 शिवजयंती कोट्स मराठी

जर छत्रपती शिवाजी महाराज अधिक काळ असते तर इंग्रजांना भारताचा १०% भाग पण पाहता आला नसता.

🔰 शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहीत नाही. पण माझ्या शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला.

 


 


 हे सुध्दा वाचा ⤵️
















FAQ
Q.1) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी व कोठे झाला ?
Ans. इ.स. 19 फेब्रुवारी 1630 (तारखेप्रमाणे) रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला.

Q.2) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कोण होते ?
Ans. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते.

Q.3) छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड कधी जिंकला ?
Ans.इ.स. 1647 मध्ये 17 वर्षांच्या शिवाजी राजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणा गड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad