google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी भाषण निबंध | swatantra veer Savarkar mahiti marathi
Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी भाषण निबंध | swatantra veer Savarkar mahiti marathi

 स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी भाषण निबंध | swatantra veer Savarkar information in marathi |swatantra veer Savarkar mahiti marathi nibandh


स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी माहिती भाषण निबंध


स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी : नमस्कार मित्रांनो आज आपण महान क्रांतिकारक बुद्धिवादी समाजसेवक, थोर देशभक्त, प्रखर हिंदू राष्ट्रवादाचा जनक, प्रतिभावंत कवी विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृतिदिन यानिमित्ताने आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत.

स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी माहिती | swatantra veer Savarkar nibandh marathi

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेणारे थोर क्रांतिकारक, देशभक्त, समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक मधील भंगूर ह्या गावी झाला. ते मूळचे कोकणातील सावंतवाडीचे. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर पंत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सुरुवातीपासून ते एल.एल.बी पर्यंतचे शिक्षण भंगूर, नाशिक, पुणे व नंतर मुंबई येथे झाले. पुढे लंडनला जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवली. लहानपणा पासूनच सावरकरांना वाचनाची आवड होती. त्यांनी अनेक संस्कृत साहित्याचा अभ्यास केला होता. तसेच अनेक निबंधमाला इतिहास, ग्रंथ, काव्यग्रंथ, विविध बखरी, रामायण, महाभारत इत्यादी साहित्याचे वाचन केले होते ते उत्तम वक्तृत्व करत असे.

स्वातंत्र्यवीर सावरकर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली होती. 'राष्ट्रभक्त समूह गुप्त संघटना' सावरकरानी स्थापन केली.त्यानंतर'मित्रमेळा'  ही संघटना उभारली व याचेच पुढे 'अभिनव भारत' ह्या संघटनेत रूपांतर झाले. लोकांनी विदेशी चा स्वीकार करु नये. म्हणून 1905 साली पुण्यात विदेशी कापडांची होळी केली. लंडनमध्ये असताना मदनलाल धिंग्रा हा त्यांचा पहिला हुतात्मा शिष्य होता.

इ.स. 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या
उठावाचा इतिहास स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला. त्या ग्रंथाचे नाव '1857 चे स्वातंत्र्य समर हे आहे. लंडनला असताना त्यांना अटक झाली. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी बोटीवरून मार्सेलिसच्या समुद्रात उडी मारली. परंतु तेथे ते पकडले गेले. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. आणि त्यांना अंदमानला पाठवले गेले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची नाटके त्यांचे लेख त्यांच्या देशभक्तीचे दर्शन घडवतात. सावरकराना स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उपाधी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली होती. अंदमानच्या शिक्षेतून सुटल्यानंतर त्यांनी उर्वरित आयुष्यात हिंदुमहासभेचे व अस्पृश्यता निवारणाचे काम केले. रत्नागिरीत त्यांनी 500 मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले व सर्व जाती धर्मातील लोकांना ते खुले करून दिले. यातून जातिभेद दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी ते स्वर्गवासी झाले. देशासाठी प्राण पणास लावून ते लोकांच्या मनात अजरामर झाले.





हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ संत गाडगेबाबा जयंती भाषण निबंध मराठी












FAQ
Q.1) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कधी झाला ?
Ans. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक मधील भंगूर ह्या गावी झाला.

Q.2) विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उपाधी कोणी दिली ?
Ans. सावरकराना स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उपाधी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली होती.

Q.3) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मृत्यू कधी झाला ?
Ans. स्वातंत्र्यवीर सावरकर अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी ते स्वर्गवासी झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad