Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 थीम घोषणा शुभेच्छा मराठी | National safety day theme slogans in marathi

 राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 थीम घोषणा शुभेच्छा मराठी | National security day 2022 theme slogans wishes in marathi | rashtriya suraksha diwas theme ghoshana shubhechha marathi


राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 थीम घोषणा शुभेच्छा मराठी

राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 : नमस्कार मित्रांनो आज आपण 4 मार्च या रोजी साजरा केला जाणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 या बद्दलची सर्व माहिती बघणार आहोत. राष्ट्रीय सुरक्षा दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत घोषणा, शुभेच्छा आणि 2022 ची थीम हे सर्व माहिती तुम्हाला खालील लेखात पहायला मिळेल.


राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 थीम | national safety day 2022 theme

भारतात राष्ट्रीय सुरक्षा दिवस एका विशेष थीमसह साजरा केला जातो, या वर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस / सप्ताह 2022 ची थीम आहे "युवकांना सुरक्षा संस्कृती विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करा" (NARTURE YOUNG MIND DEVELOPE SAFETY CULTURE).


गेल्या वर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस/आठवडा 2021 ची थीम होती 'आपत्तीपासून शिका आणि सुरक्षित भविष्यासाठी तयार व्हा' (LEARN FROM DISASTER AND PREPARE FOR A SAFER FUTURE)



राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 मराठी माहिती | rashtriya suraksha diwas 2022 information in marathi

राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 : राष्ट्रीय सुरक्षा, आरोग्य व पर्यावरण विकसित करण्यासाठी आणि जनमानसात सुरक्षेसंबंधी जागरूकता आणण्यासाठी 4 मार्च ते 11 मार्च या काळात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोहीम भारतात संपूर्ण देशभर राबवली जाते.

भारतात 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो.औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी 'राष्ट्रीय सुरक्षा परिषद' च्या वतीने हा सप्ताह साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात या सप्ताहाचे महत्व मोठे असते.

4 मार्च 1966 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सुरक्षा दिन सुरू केला.हा सुरक्षा सप्ताह आरोग्य संघटना आणि औद्योगिक सदस्यांसह सरकारी आणि गैर-सरकारी संघटना एकत्र येऊन साजरा करत असतात. दरवर्षी या सप्ताहामध्ये एक घोष वाक्य निश्चित केलेले असते.या सप्ताहामध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतर्फे सेमिनार, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुरक्षा पुरस्कार, बॅनर प्रदर्शने, नाटके आणि गाण्यांचा खेळ, प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, चित्रपट प्रदर्शनांसह विविध सार्वजनिक कार्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील मोहीमा आयोजित केल्या जातात.

अनेक उद्योगात कारखान्यात जी कामे केली जातात, त्या संबंधात सुरक्षेविषयी प्रात्यक्षिके दाखवली जातात. सुरक्षाविषयक कामकाजावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आखले जातात.विविध क्षेत्रातील औद्योगिक कर्मचाऱ्यांना रसायन आणि विद्युत सुरक्षितता, जोखीम हाताळणी, अग्निशामक नियंत्रण, प्रथमोपचाराचे ज्ञान इत्यादीची माहिती आणि प्रशिक्षण दिले जाते. आपत्तीविषयक सखोल माहिती देऊन त्याचे व्यवस्थापन शिकवले जाते.

तत्कालीन राष्ट्रपति डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या द्वारे या सुरक्षा दिवसाचा प्रारंभ करण्यात आला आणि तेव्हा पासून समाजातल्या सर्व स्तरांवर हे अभियान दरवर्षी राबवण्यात येऊ लागले.या अभियानामुळे औद्योगिक दुर्घटनांच्या दरातही घट झालेली दिसून आली आहे. लोकांना स्वतःच्या सुरक्षे संबंधी चे अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव व्हावी हा या सुरक्षा सप्ताहाचा एकमेव उद्देश्य आहे.

सध्याच्या घडीला गेल्या वर्षभरात जगभराने सोसलेल्या कोरोना च्या जीवघेण्या संकटांमुळे औद्योगिक सुरक्षे सोबतच व्यक्तिगत सर्वांगिण स्वच्छता, आपला परिसर आणि समाजाबद्दलची आपली जागरूकता, स्वतःच्या आरोग्याची तसेच आपल्या समाजाच्या आरोग्याविषयीची काळजी या गोष्टींचाही सुरक्षा सप्ताहामध्ये विचार होणे गरजेचे आहे असे मला वाटते.


       या भारताचे आम्ही नागरिक दक्ष, 

       स्व सुरक्षेकडे देऊ आम्ही नेमाने लक्ष.

                 🙏  धन्यवाद 🙏




जागतिक सुरक्षा दिवस 2022 घोषणा शुभेच्छा मराठी मराठी | national safety day 2022 Safety slogans


🎯 राष्ट्रीय सुरक्षा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

  • सुरक्षित कार्य हे तर कर्तव्य साऱ्यांचे, त्यातच आहे हित आपल्या परिवारांचे !


🔰 राष्ट्रीय सुरक्षा दिवस शुभेच्छा संदेश मराठी

  • तुमची सुरक्षा, हीच तुमच्या कुटुंबाची सुरक्षा !


🔯 National safety day wishes in marathi

  • सुरक्षा नियमांना नका करू दुर्लक्षित, तरच राहील तुमचे आयुष्य सुरक्षित !


💠 Rashtriya suraksha diwas shubhechha in marathi

  • सुरक्षा नियमांचे पालन कराल जर, कायम आनंदी राहील तुमचे घर !


🔵 National safety and security day wishes in marathi

  • भारतीय आम्ही नागरिक दक्ष, सुरक्षेकडे देऊ नेमाने लक्ष !


🌐 National safety day quotes in marathi

  • प्रत्येक दिन असावा सुरक्षा दिन, एक ही क्षण नको सुरक्षे वीण !


♦️ national safety day status in marathi

  • रहा सुरक्षित ठेवा नियंत्रण, नका देऊ दुर्घटनेला आमंत्रण !


🎯 National safety day images in marathi

  • उपकरणांची योग्य काळजी घ्याल, सुरक्षे सोबतच नफा ही होईल कमाल !


🔰 राष्ट्रीय सुरक्षा दिवस स्टेटस मराठी

  • कामाआधी किंवा कामानंतर नका देऊ सुरक्षिततेला अंतर !


🔯 राष्ट्रीय सुरक्षा दिवस शायरी मराठी

  •  सुरक्षिततेने काम कराल जेव्हा, सगळी स्वप्ने साकार कराल तेव्हा !


💠 राष्ट्रीय सुरक्षा दिवस मेसेजेस मराठी

  • सुरक्षा विषयक नियम पाळा, सतर्क रहा अपघात टाळा!


🔵 Rashtriya suraksha diwas shubhechha status in marathi

  • दुर्घटनेला जर ठेवायचे असेल दूर, सुरक्षा नियमांचे पालन करा जरूर !


🌐 Rashtriya suraksha diwas shubhechha sms messages in marathi

  • अग्नी दुर्घटना म्हणजे जबरदस्त नुकसान, अग्नी सावधानतेला बनवू आपले अभियान !


♦️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी

  • विद्युत उपकरणांना सावधानतेने हाताळा, सतर्क रहा दुर्घटना टाळा !


🎯 राष्ट्रीय सुरक्षा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • वाट बघतो यमराज तिथे, नाही पाळत सुरक्षा नियम जिथे !


🔰 National safety day wishes quotes status in marathi

  • उपकरणे हाताळताना योग्य काळजी घ्याल, तरच सदा सुरक्षित राहाल !


🔯 National safety day slogans in marathi

  • सुरक्षितता हाच जीवनाचा खरा अर्थ, सुरक्षिततेविना आहे सर्व व्यर्थ !


💠 राष्ट्रीय सुरक्षा दिवसाच्या घोषणा शुभेच्छा मराठी

  • मेक इन इंडिया च्या मार्गाने देश जात आहे पुढे, सुरक्षित काम करू, देऊ सुरक्षिततेचे धडे !


🔵 Happy National safety day 2022

  •  सुरक्षा दिनी करूया संकल्प, स्व सुरक्षेला नाही कोणताच विकल्प !





हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन












FAQ

Q.1) राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी असतो ?

Ans. राष्ट्रीय सुरक्षा दिवस 4 मार्च ला असतो.


Q.2) राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचा प्रारंभ कोणी कला ?

Ans.राष्ट्रपति डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या द्वारे या सुरक्षा दिवसाचा प्रारंभ करण्यात आला आणि तेव्हा पासून समाजातल्या सर्व स्तरांवर हे अभियान दरवर्षी राबवण्यात येऊ लागले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad