google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 गुढीपाडवा माहिती मराठी निबंध कविता | gudhipadwa mahiti marathi nibandh Kavita
Type Here to Get Search Results !

गुढीपाडवा माहिती मराठी निबंध कविता | gudhipadwa mahiti marathi nibandh Kavita

 गुढीपाडवा माहिती मराठी निबंध कविता | gudhi padwa mahiti marathi nibandh Kavita | gudhi padwa 2022 essay in marathi


gudi padwa 2022 : नमस्कार मित्रांनो आज आपण २ एप्रिल २०२२ वार शनिवार या दिवशी येणारा सण म्हणजे गुढीपाडवा म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गुढीपाडवा निबंध, कविता मराठी माहिती.

     गुढीपाडवा माहिती व निबंध मराठी हे तुम्हाला व तुमच्या लहान मुलांना शैक्षणिक क्षैत्रात व शाळेतील निबंध लेखन स्पर्धांमध्ये नक्की उपयोगी पडणार आहे. गुढीपाडव्याचा हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.


गुढीपाडवा निबंध मराठी माहिती | gudhi padwa essay in marathi


      गुढीपाडव्याचा सण आता उभारारे गुढी
       नव्या वर्षाच देणं आता उभारारे गुढी.

गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो.नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र मानला जातो.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते. गुढी उभारण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला नवीन वस्त्र बांधले जाते... त्यावर साखरेची माळ, कडुलिंबाची पान, आंब्याचे डहाळे व झेंडुच्या फुलांचा हार बांधला जातो. व त्यावर कलश ठेवला जातो व ही गुढी आकाशाच्या दिशेने उभारली जाते.या गुढीला विजयाचे प्रतीक मानले जाते.

              नवचैतन्याची झाली पहाट,
          पूर्वेला असे सूर्यनारायणाचा थाट !
           नववर्षाची सुरुवात व्हावी अशी,
            दारी उभारावी गुढी आनंदाची !!

14 वर्षाचा वनवास संपवून प्रभू श्रीराम जेव्हा आयोध्या येथे आले व त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा हा सण साजरा केला गेला असे मानले जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीच्या समोर सुंदर रांगोळी काढली जाते. गुढीची पूजा केली जाते व गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन करण्याची पध्दत आहे.यामुळे रक्त शुद्ध होते व शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा छान बेत केला जातो.

गुढीपाडवा हा सण आपल्याला आयुष्याची सुरुवात नव्या जोमाने,उत्साहाने व आनंदाने करण्याचा संदेश देतो.


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ रंगपंचमी निबंध मराठी माहिती 

➡️ होळी निबंध मराठी माहिती

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध 

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन








FAQ
Q.1) 2022 चा गुढीपाडवा किती तारखेला आहे ?
Ans. 2022 चा गुढीपाडवा 2 एप्रिल २०२२ या तारखेला आहे.

Q.2) गुढीपाडवा हा सण कधी साजरा केला जातो ?
Ans. गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.

Q.3) गुढीपाडवा कोणत्या महिन्यात आहे ?
Ans. गुढीपाडवा एप्रिल या महिन्यात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad