Type Here to Get Search Results !

होळी निबंध मराठी माहिती | Holi festival essay in marathi

 होळी निबंध मराठी माहिती | Holi festival essay in marathi | Holi nibandh marathi

होळी निबंध मराठी माहिती

होळी सण २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण १७ मार्च २०२२ रोजी येणारा सण म्हणजे होळी या दिवसाबद्दलची माहिती व निबंध बघणार आहोत. होळी या सणाचा निबंध हा तुम्हाला व तुमच्या परिवारातील लहान मुलांना शाळेत भाषण स्पर्धांमध्ये उपयोगी पडणार आहे तरी तुम्ही खालील लेख शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.



होळी निबंध मराठी माहिती | Holi nibandh marathi mahiti | Holi festival essay in marathi


होळी हा भारतातील लोकप्रिय सण आहे. हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला साजरा केला जातो. होळीला हुताशनी पोर्णिमा किंवा शिमगा असेही म्हणतात. होळी हा हर्षाचा, उत्साहाचा व रंगांचा सण आहे.

    होळी या सणाची सुरुवात होलिका दहनाने होते. याची एक प्राचीन कथा आहे. हिरण्यकश्यप नावाचा राक्षस भगवान विष्णूचा द्वेष करीत असे पण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद विष्णूचा परम भक्त होता म्हणून हिरण्यकश्यपने बहीण होलिकाच्या मदतीने प्रल्हादला मारण्याचा कट रचला. होलिकाला आगीत न जळण्याचे वरदान मिळाले होते म्हणून ती भक्त प्रल्हादला घेऊन आगीत बसली.

          भक्त प्रल्हादला भगवान विष्णूंनी वाचवले मात्र होलिका जळून भस्म झाली आणि वाईटाचा नाश झाला म्हणून होलिका दहन केले जाते. या दिवशी वाळलेले गवत, काटक्या, गोवऱ्या इत्यादी गोळा करून होळी रचतात. होळीला नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो. होळी पेटवल्यावर लोक त्याभोवती “होळी रे होळी पुरणाची पोळी" असे म्हणत प्रदक्षिणा घालतात.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलीवंदन किंवा धुलवड साजरी करतात.या दिवशी लोक आपापसातील मतभेद विसरून एकत्र येतात. धुलीवंदनाच्या दिवशी सर्व लोक एकमेकांना रंग, गुलाल लावतात होळीच्या शुभेच्छा देतात घराघरात गोड पदार्थ बनवले जातात. सगळीकडे "आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. लहान मुले पिचकारी व रंगांनी मित्रांबरोबर खेळतात.

होळी या सणाला प्रेमाचा व बंधुत्वाचा सण असेही म्हणतात. वाईटाचा नाश करणे व चांगल्याचा स्वीकार करणे हाच होळीचा खरा संदेश आहे.



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन










FAQ
Q.1) होळी हा सण कधी साजरा केला जातो ?
Ans. होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला साजरा केला जातो.

Q.2) होळीच्या दिवशी काय केले जाते ?
Ans. होळी या दिवशी वाळलेले गवत, काटक्या, गोवऱ्या इत्यादी गोळा करून होळी रचतात. होळीला नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो. 

Q.3) होळीच्या दुसऱ्या दिवशी काय असते ?
Ans. होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलीवंदन किंवा धुलवड साजरी करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad