Type Here to Get Search Results !

जागतिक ग्राहक दिन निबंध कविता मराठी माहिती | international consumer day 2022

 जागतिक ग्राहक दिन निबंध कविता मराठी माहिती | international consumer day 2022 essay in marathi | jagtik grahak din nibandh marathi mahiti


जागतिक ग्राहक दिन निबंध कविता मराठी माहिती


जागतिक ग्राहक दिन २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण १५ मार्च या दिवशी साजरा केला जाणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय ग्राहक दिन याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. जागतिक ग्राहक दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत निबंध कविता चारोळ्या शायरी ही सर्व माहिती तुम्हाला खालील लेखात पहायला मिळेल.


जागतिक ग्राहक दिन निबंध कविता मराठी माहिती | jagtik grahak din nibandh Kavita marathi mahiti


 आधुनिक काळातील ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा असतो. आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक राजा महत्त्वाचा घटक झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू बनला आहे.

 जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी
ग्राहक दिन साजरा होणे गरजेचे आहे. ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे 1960 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांचा निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले.

आणि त्यासाठीचे जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला यूनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो.

 ग्राहकांना हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा, याकरिता विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत आहेत. या सर्वांसाठी १५ मार्च हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस 'जागतिक ग्राहक हक्क दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.



ग्राहकांचे मुलभूत हक्क व अधिकार

खालील दिलेले ग्राहकांचे मुख्य अधिकार आहेत...
  • सुरक्षिततेचा अधिकार 
  • माहितीचा अधिकार
  • निवड करण्याचा अधिकार
  • आरोग्यदायी पर्यावरणाचा अधिकार
  • समस्या निराकरण करण्याचा अधिकार
  • ग्राहक शिक्षणाचा अधिकार
  • तक्रार निवारणाचा अधिकार

एक नागरिक म्हणून, राज्यघटनेने आपल्याला नागरिकत्वाचे हक्क दिले तसेच, ग्राहक म्हणूनही आपल्याला काही अधिकार देण्यात आले आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात मोठा हक्क म्हणजे ग्राहकांना दिलेल्या किंमतीच्या समान वस्तू त्यांना मिळाली पाहिजे.

योग्य किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो.

यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा बनवला गेला आहे.
तेव्हा कोणत्याही व्यावसायिक व्यक्तीने ग्राहकाची फसवणूक करू नये. आणि कोणत्याही ग्राहकाने आजच्या काळात जागरूक राहिले पाहिजे.जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये.




हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन










FAQ
Q.1) जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.

Q.2) ग्राहकांचे मुलभूत हक्क व अधिकार कोणते आहेत ?
Ans. सुरक्षिततेचा,माहितीचा,निवड करण्याचा, आरोग्यदायी पर्यावरणाचा,समस्या निराकरण करण्याचा, ग्राहक शिक्षणाचा,तक्रार निवारणाचा ही सर्व ग्राहकांचे  अधिकार व हक्क आहेत.

Q.3) जागतिक ग्राहक दिन का साजरा केला जातो ?
Ans. ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा म्हणून जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad