google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 महाशिवरात्री मराठी माहिती कथा | mahashivratri information in marathi
Type Here to Get Search Results !

महाशिवरात्री मराठी माहिती कथा | mahashivratri information in marathi

महाशिवरात्री मराठी माहिती कथा |महाशिवरात्री कशी साजरी करावी | mahashivratri information in marathi 


महाशिवरात्री माहिती मराठी :

आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि आपल्या परंपरा जपल्या जातात त्यामधील एक महत्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री होय. महाशिवरात्री हा सण हिंदू संस्कृतीमध्ये आनंदाने आणि अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो.


 महाशिवरात्री ह्या सणादिवशी भगवान शिव म्हणजेच महादेव यांची अगदी भक्तिभावाने पूजा केली जाते आणि त्या दिवशी उपवास देखील केला जातो. महाशिवरात्री हा सण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये माघ कृष्ण चतुर्दशी च्या दिवशी साजरा करतात.


जर पुढे महाशिवरात्री काही दिवसातच असेल तर घरातील मोठी आणि अनुभवी लोक काशीखंड, शिवलिलामृत, महारुद्र या सारख्या पवित्र ग्रंथांचे पारायण करतात तर काही लोक महाशिवरात्री सणाच्या काही अगोदर गायन, भजन, कीर्तन यासारखे उपक्रम राबवतात. महाशिवरात्रीच्या दिवशी लोक भगवान शिव यांच्या शिवलिंग किंवा मूर्तीला अभिषेक घातला जातो त्याला बेल वाहली जाते.


त्या दिवशी महाशिवरात्रीची एकादस म्हणून उपवास केला जातो. काही लोक या दिवशी दिवस भर महादेवाचा जप (ओम नम शिवा) करतात तर काही भागात लोक शिवरात्रीच्या अगोदर १२ जोतिर्लिंगांना भेट देण्यासाठी जातात.


या दिवशी महादेव मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते आणि काही मंदीरांमध्ये महादेवाची पंचोपर पूजा करून सस्तंग, भजन, कीर्तन आणि गायन या सारखे कार्यक्रम भक्तिभावाने राबवले जातात आणि काही ठिकाणी या दिवशी मंदिराबाहेर यात्रा भरलेल्या असतात आणि महाप्रसाद देखील असतात. महाशिवरात्री मध्ये रात्रीच्या जागरणाला खूप महत्व आहे या दिवशी लोक रात्री जागरण करून आराधना करतात.

🆕 महाशिवरात्री पुजा वीधी मुहूर्त मराठी

🆕 महाशिवरात्रीच्या शुभेच्छा संदेश मराठी



महाशिवरात्रीच्या कथा मराठी|Mahashivratri Story In Marathi


प्रत्येक सण साजरा करण्यापाठीमागे काहीना काही तरी कथा असते तसेच महाशिवरात्री हा सण साजरा करण्यापाठीमागे देखील एक पौराणिक कथा सांगितली जाते.


पहिली कथा :

पौराणिक कथे मध्ये महाशिवरात्री या सणाविषयी असेसां गितले जाते कि ज्यावेळी समुद्र मंथन झाले होते. त्यावेळी सृष्टी संबंधित काही गोष्टींची निर्मिती झाली होती. त्याच वेळी या समुद्र मंथनातून एक विष निर्माण झाले होते जे विष संपूर्ण पृथ्वीचा नाश करू शकत होते आणि ज्यावेळी हे भगवान महादेवांना कळले.त्यावेळी त्यांनी हे विष प्राशन करून सृष्टीचा नाश होण्यापासून वाचवले. ह्या विषाला संपवण्याची क्षमता फक्त महादेवाकडेच होती. परंतु महादेवांना हे विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या शरीराला दह होत होता आणि त्याचे शरीर काळे निळे पडले होते.त्यावेळी इतर देवांनी देवांच्या वैद्याला बोलावले त्यावेळी वैद्यांनी महादेवांना रात्रभर जागण्यासाठी सांगितले.


इतर सर्व देवांनी महादेवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर नृत्य आणि गायन केले आणि याला आपण जागर म्हणतो हा जागर आजही महाशिवरात्रीच्या रात्री केला जातो आणि त्या रात्री भजन, कीर्तन, गायन यासाराखे विविध धार्मिक कार्यक्रम राबवून रात्रभर जागर केला जातो. असे म्हणटले जाते कि या दिवशी महादेवांना खूप दाह होत असल्यामुळे त्यांनी त्या रात्री तांडव नृत्य केले होते.


दुसरी कथा :

अणखी एक पौराणिक कथा असे सांगते की महाशिवरात्रीच्या रात्री भगवान महादेवाच्या प्रतीकांचा नैवेद्य एखाद्याला त्यांच्या पापांवर मात करण्यास आणि धार्मिकतेच्या मार्गावर प्रारंभ करण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे व्यक्तीला कैलास पर्वतावर पोहचता येते आणि 'मोक्ष' प्राप्त होतो.


महाशिवरात्रीची पौराणिक कथा :

शिवरात्रीच्या अनेक आख्यायिका आहेत. असे म्हणतात की देवी पार्वतीने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. पौराणिक कथेनुसार, यामुळे फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला. यामुळेच महाशिवरात्री अतिशय महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते.


दुसरीकडे, गरुड पुराणात या दिवसाच्या महत्त्वाविषयी आणखी एक कथा सांगितली गेली आहे, त्यानुसार या दिवशी एक निषादराज आपल्या कुत्र्यासोबत शिकार करायला गेला होता, परंतु त्याला कोणतीही शिकार मिळाली नाही. भूक आणि तहानने कंटाळून तो तलावाच्या काठी गेला, तिथे बिल्वाच्या झाडाखाली शिवलिंग होते. त्याच्या शरीराला विश्रांती देण्यासाठी त्याने काही बेलाची पाने तोडली, जी शिवलिंगावरही पडली. पाय स्वच्छ करण्यासाठी त्यांनी तलावाचे पाणी त्यांच्यावर शिंपडले, त्यातील काही थेंब शिवलिंगावरही पडले. असे करत असताना त्यांचा एक बाण खाली पडला, तो उचलण्यासाठी त्यांनी शिवलिंगासमोर नतमस्तक झाले. अशाप्रकारे शिवरात्रीच्या दिवशी त्यांनी नकळत शिवपूजनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. मृत्यूनंतर नपुंसक जेव्हा त्याला गोळा करण्यासाठी आले तेव्हा शिवाच्या गणांनी त्याचे रक्षण केले आणि त्याला हाकलून दिले.


अज्ञानामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने एवढे अद्भुत फल मिळत असताना देवाधिदेव महादेवाची पूजा जाणूनबुजून केली तर किती फलदायी ठरेल.






महाशिवरात्री कशी साजरी करतात | how to celebrate mahashivratri

महाशिवरात्री हा एक हिंदूंचा सण असून या दिवशी भगवान शिवा म्हणजेच महादेव यांची पूजा केली जाते. या दिवशी लोक अगदी भक्ती भावाने भगवान शिव यांच्या शिवलिंग किंवा मूर्तीला अभिषेक घातला जातो त्याला बेल वाहली जाते आणि त्या दिवशी महाशिवरात्रीची एकादस म्हणून उपवास केला जातो.


काही लोक या दिवशी दिवस भर महादेवाचा जप (ओम नमं शिवाय) करतात तर काही भागात लोक शिवरात्रीच्या अगोदर १२ जोतिर्लिंगांना भेट देण्यासाठी जातात.


तसेच या दिवशी महादेव मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते आणि काही मंदीरांमध्ये महादेवाची पंचोपर पूजा करून सस्तंग, भजन, कीर्तन आणि गायन या सारखे कार्यक्रम भक्तिभावाने राबवले जातात आणि काही ठिकाणी या दिवशी मंदिराबाहेर यात्रा भरलेल्या असतात आणि महाप्रसाद देखील असतात.


महाराष्ट्र राज्यात महाशिवरात्री कशी साजरी केली जाते ?

महाराष्ट्रामध्ये या सणादिवशी लोक अगदी भक्ती भावाने भगवान शिव यांच्या शिवलिंग किंवा मूर्तीला अभिषेक करतात त्याला बेल वाहतात आणि त्या दिवशी महाशिवरात्रीची एकादस म्हणून उपवास केला जातो आणि त्या रात्री भजन, कीर्तन, गायन यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम राबवून रात्रभर जागर केला जातो.



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन











FAQ

Q.1) महाशिवरात्री हा सण केव्हा साजरा केला जातो ?

Ans. महाशिवरात्री हा सण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये माघ कृष्ण चतुर्दशी च्या दिवशी साजरा करतात.

Q.2) महाशिवरात्रीच्या दिवशी काय करतात ?

Ans.महाशिवरात्री ह्या सणादिवशी भगवान शिव म्हणजेच महादेव यांची अगदी भक्तिभावाने पूजा केली जाते आणि त्या दिवशी उपवास देखील केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad