Type Here to Get Search Results !

जागतिक महिला दिन कविता चारोळ्या शायरी मराठी | mahila din kavita Charolya in marathi

 जागतिक महिला दिन कविता चारोळ्या शायरी मराठी | mahila din kavita Charolya in marathi|international women's day poem Charolya shayari in marathi | jagtik mahila din kavita marathi


जागतिक महिला दिन 2022 : नमस्कार मित्रांनो आज आपण जागतिक महिला दिन (international women's day) या बद्दलची माहिती बघणार आहोत त्यामध्ये जागतिक महिला दिन कविता, चारोळ्या, शायरी, घोषवाक्ये ईत्यादीचा समावेश आहे.

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभर 'जागतिक महिला दिन' म्हणून उत्साहात साजरा केला जातो. ८ मार्च १९०८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्रो द्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी करने व सुरक्षितता इ. मागण्या केल्या व निदर्शने केली. स्त्रियांनी स्वतः च्या हक्कांसाठी दिलेला हा पहिला लढा होता. सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी यांनी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला व तो पासही झाला तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.


जागतिक महिला दिन कविता मराठी | jagtik mahila din kavita marathi


महिला दिन कविता 01

कविता शिर्षक : नाही आता मी अबला नारी

घरात होते चूल आणि मूल 
होती हाती पाळण्याची दोरी 
अफाट माझी संघर्षगाथा 
नाही आता मी पाटी कोरी...

पर्वतापरी उंची माझी 
गगनचुंबी उंच भरारी
हर एक क्षेत्र पादाक्रांत मी केले
नाही आता मी अबला नारी...

तंत्रज्ञान माझे सगेसोयरे
तयाशी माझी 'दोस्ती न्यारी' 
नावडती होती माझी मी 
झाली आता 'गुडीया प्यारी'...

नाही आता मी पाटी कोरी 
नाही आता मी अबला नारी...


महिला दिन कविता 02

तू जिजाऊ, तू सावित्री, 
अहिल्याची तू लेक आहे...
तू कल्पना, तू सुनिता, 
आकाशात तुझी झेप आहे...

तू उषा, तू सायना, 
तू मेरी, तूच मल्लेश्वरी आहे... 
घे आसमानी उंच भरारी 
प्रेरणेचे तू महारूप आहे ...

घरा स्वर्ग बनवी तू 
अन्नपूर्णा तूच आहे...
तुटक्या झोपडीस महाल करी 
हरहुन्नरीचे तू प्रतिक आहे...

अब्रू राखण्या ना कृष्ण आता 
दंड देण्यास ना शिवबा आहे...
 उठ, उठ घे तलवार हाती 
सहनशीलता अन् शौर्याचे तू गीत आहे...

जरी दिसशी नाजूक, सुकुमार तू
इथे कमजोर कोण आहे... 
तूच सकळाची दिशादर्शनी 
अन् विश्वाची तू आस आहे...


महिला दिन कविता 03

जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, 
त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी !

 तीच आहे सृजनाची निर्मिती, 
तिच्यामुळे तेवतात दिव्यातील वाती,
चहूकडे प्रकाश देऊनी जगतास ती उध्दारी !
 त्यो विश्वशक्तीचे नाव आहे नारी ! 

ज्योतिबांची ती क्रांतिज्योती सावित्री 
त्यागाची प्रतीक ती शिवबाची जिजाई, 
भीमरावांची सावली, ती रमाई,
 रणांगणांवर लढते जशी राणी लक्ष्मी 
 त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी!

शक्तीपीठ ती नवदुर्गाचे, भक्तीची ऊर्जास्थान,
 तिच्यामुळे मिळे आम्हां जगण्याचे आत्मभान, 
ती विठूची रुक्मिणी, ती आषाढीची वारी,
 नारीमुळे मानवाची आहे जगभर कीर्ती,
 त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी ! 

जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी !


जागतिक महिला दिन घोषवाक्ये चारोळ्या शायरी मराठी माहिती|jagtik mahila din slogans Charolya shayari marathi

महिला दिन घोषवाक्ये :

  • महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान.
  • जबाबदारीसह घेते भरारी,नाव तिचे आहे नारी.
  • दया स्त्रिशिक्षणाला गती, बना फुले सावित्री.
  • नारीत आहे शक्ती भारी, समजू नका तिला बिचारी.
  • नारी तू आहेस महानू, विश्वाची अहिस शान.
  • स्त्री नाही वस्तू भोगाची, देवता आहे त्यागाची.
  • आई नाही तर मुलगी नाही,मुलगी नाही तर मुलगा नाही.
  • देशाला हवेत शिवबा जिजाऊ, स्त्रियांना मानाने वागवू.
  • मुलींचे शिक्षण, हेच खरे प्रगतीचे लक्षण.

महिला दिन चारोळ्या/शायरी :

गंभीर नाही तर खंबीर आहे !
वार नाही तर तलवार आहे !!
बोठलेली नाही तर धार आहे !!!
स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे !!!!


जिव्हाळ्याने पाहिले तर बहिणीची माया देते !
लहानग्या बाळाला आईची छाया देते !!
अन तिच्याशी जे पण कोणी नडते !
त्याला ती वाघिणी सारखे फाडते !!


शांत राहणे हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे !
वरूनी जरी पाणी असले तरी ती आतून आग आहे !! वागणे तिचे एकदम कडक अन सक्त आहे !
कारण तिच्या अंगात मॉ जिजाऊच रक्त आहे !!


इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तुडवला !
लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला !!
जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला !!!
महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला !!!!




हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन











FAQ
Q.1) जागतिक महिला दिन कधी आहे ?
Ans. जागतिक महिला दिन 8 मार्च या दिवशी आहे.

Q.2) जागतिक महिला दिन साजरा करण्यामागे काय मुख्य हेतू आहे ?
Ans. जागतिक महिला दिन २०२२ या दिवसाचा मुख्य हेतू महिला सबलीकरण करणे हा आहे. हा दिवस महिलांप्रती आदर, प्रेम व्यक्त करण्याचा आहे. 

Q.3) जागतिक महिला दिनाची यावर्षीची थीम काय आहे ?
Ans. जागतिक महिला दिनाची यावर्षीची थीम  "येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता" ही आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad