google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 जागतिक महिला दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी | women's day speech essay in marathi
Type Here to Get Search Results !

जागतिक महिला दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी | women's day speech essay in marathi

 जागतिक महिला दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी | international women's day speech essay in marathi | jagtik mahila din bhashan nibandh in marathi


जागतिक महिला दिन भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी

जागतिक महिला दिन २०२२ : नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी मध्ये बघणार आहोत.


जागतिक महिला दिन 2022 (international women's day 2022) ची थीम मराठी : या वर्षासाठीच्या 'जागतिक महिला दिन 2022 ची थीम मराठी मध्ये ही आहे, "Gender equality today for a sustainable tomorrow" म्हणजेच "येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता"


🆕 जागतिक महिला दिन कविता चारोळ्या शायरी मराठी

🆕 जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी


जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी | jagtik mahila din bhashan nibandh marathi

                “वार नाही तलवार आहे... 

                ती समशेरीची धार आहे...

                स्त्री म्हणजे अबला नाही...

              ती तर धगधगता अंगार आहे !!"


 सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान अतिथीवर्ग, अध्यक्ष, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र आणि महिला भगिनींनो आज मी तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त थोडक्यात माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही नम्र विनंती !

     सर्वप्रथम एथे जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या, असे राजमाता जिजाऊ, "मैं मेरी झांशी नहीं दूंगी" इंग्रजांना ठणकावून सांगून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, मुलींना, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाच्या सावित्रीबाई फुले अशा सर्व सन्माननीय स्त्रियांच्या कार्याला वंदन....

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभर 'जागतिक महिला दिन' म्हणून उत्साहात साजरा केला जातो.८ मार्च १९०८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्रो द्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी करने व सुरक्षितता इ. मागण्या केल्या व निदर्शने केली. स्त्रियांनी स्वतः च्या हक्कांसाठी दिलेला हा पहिला लढा होता. सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी यांनी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला व ती पासही झाला तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.


जागतिक महिला दिन २०२२ या दिवसाचा मुख्य हेतू महिला सबलीकरण करणे हा आहे. हा दिवस महिलांप्रती आदर, प्रेम व्यक्त करण्याचा आहे. स्त्रीला अनेक नाती जोपासावी लागतात प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ स्त्रीच असते. स्त्री आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावत म्हणून जीवाचे रान करते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.

आज प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर स्त्री आहे. पण तरीही स्त्रियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. आजच्या स्त्रीने आत्मनिर्भर वनले पाहिजे आणि निर्भयपणे संकटांचा सामना केला पाहिजे. कारण पुढची पिढी कशी घडवायची हे महिलांच्याच हातात आहे.

त्री सन्मानाची सुरवात आपण आपल्या घरापासून करायला हवी तरच आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल.तर येवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत !

हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध सुत्रसंचालन मराठी

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालनFAQ

Q.1) जागतिक महिला दिन कधी साजरा केला 

जातो ?

Ans. जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो.


Q.2) जागतिक महिला दिन २०२२ ची थीम काय

आहे ?

Ans. या वर्षासाठीच्या 'जागतिक महिला दिन 2022 ची थीम मराठी मध्ये ही आहे, "Gender equality today for a sustainable tomorrow" म्हणजेच "येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता"


Q.3) जागतिक महिला दिन कधीपासून साजरा केला जातो ?

Ans. सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी यांनी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला व तो पासही झाला तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad