Type Here to Get Search Results !

इ.१०वी १२वीच्या निकालाची तारीख जाहीर | 10th and 12th result date declared

 इ.१०वी १२वीच्या निकालाची तारीख जाहीर | 10th and 12th result date declared


इ.१०वी १२वीच्या निकालाची तारीख जाहीर


दहावी बारावी रिझल्ट २०२२ : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शिक्षक बांधवांनो कोरोना काळानंतर यावर्षी इ.दहावी व बारावीच्या परीक्षा योग्यरीत्या पार पडल्या असुन सर्व विद्यार्थ्यांना आता निकालाची आतुरता लागली आहे म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दहावी आणि बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख.


 इ.दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर | 10th and 12th result date declared

            उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज बोर्डाच्या नियमानुसार पार पडल्यास बारावीचा निकाल १० जुन तर दहावीचा निकाल २० जुनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे,अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. सध्या विभागीय शिक्षण मंडळाअंतर्गत उत्तरपत्रिकांची तपासणी जोरात सुरू असुन निकाल करण्यासाठी ७० % उत्तरपत्रिकांचे कांऊटर स्कॅनिंगही पूर्ण झाले असल्याची माहिती गोसावी यांनी दिली.

राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीसाठी स्वीकारलेच नाहीत. काहींनी तर हे गड्ढे बोर्डाकडे परत पाठवून दिले. त्यामुळे दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर परिणाम होऊन निकाल वेळेत जाहीर होईल का, असा प्रश्न बोर्डासमोर उभा राहिला होता, मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या अचूक नियोजनामुळे पेपर तपासणीचे काम विनाअडथळा सुरू आहे.

तपासलेल्या उत्तरपत्रिका राज्य शिक्षण मंडळात जमा होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता या उत्तरपत्रिकांच्या पहिल्या पानाचे वारकोडनुसार काऊंटर स्कॅनिंग करून एकूण गुण गोळा करण्यात येत आहे. त्यानंतर निकाल तयार केला जाणार आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.

यावर्षी १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती. १५ मार्चपासून ही परीक्षा सुरू झाली. ५०५० मुख्य केंद्रे तर १६,३३४ उपकेंद्रांवर परीक्षा पार पडली.

४ मार्चपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील २ हजार ९९६ मुख्यकेंद्रे तर ६ हजार ६३९ उपकेंद्रे असे मिळून एकूण ९ हजार ६३५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) इ.१०वीचा निकाल कधी लागणार आहे ?
Ans. इ.१०वीचा निकाल २० जुन २०२२ या दिवशी लागणार आहे.

Q.2) इ.१२वीचा निकाल कधी लागणार आहे ?
Ans. इ.१२वीचा निकाल १० जुन २०२२ या दिवशी लागणार आहे.

Q.3) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ?
 Ans.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad