google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी | Dr.Babasaheb Ambedkar Bhashan Marathi
Type Here to Get Search Results !

डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी | Dr.Babasaheb Ambedkar Bhashan Marathi

  डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी | Dr.Babasaheb Ambedkar Bhashan Marathi | Bhim Jayanti Speech in marathi pdf

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भाषण निबंध विचार बघणार आहोत. 



           14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयामध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना तसेच नवीन पिढीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.



डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी | dr. babasaheb ambedkar scpeech in marathi


        शिक्षणाची अखंड पेटती मशाल हाती, 
     शिका, संघटित व्हा, संघर्ष करा मुखी नारा,             राज्यघटनेचा खरा शिल्पकार, महामानव 
       भारतरत्न बाबासाहेबांना माझा मानाचा 
                            मुजरा !

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व रसिक श्रीते हो !
 स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोध्दा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते. भिमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना 'अस्पृश्य' म्हणून मानहानी स्विकारावी लागली. पण ते मुळीच खचले नाहीत, त्यांनी अस्पृश्य दीन दलितांचा उध्दार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले.

भिमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सर कारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व अम लंडनमधील विद्यापीठातून घेतले. नंतर ते मायदेशी परतले. त्यांनी आपल्या बांधवांना 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब, दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले.

डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती" या ग्रंथाचे जाहीररीत्या दहन केले. नाशिकमधील "काळाराम मंदिरामधे दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला. महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला.                              

    समाजाने धिक्कारलेल्या समाजासाठी ते आशेचा किरण ठरले. मूकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी समाजप्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले. स्त्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला.

असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या महामानव ज्ञानसवादी तपस्वी, अमोध वकृत्वाचा व कुशल' नेतृत्वाचा घनी, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ रोजी काळाच्या पडदयाआड गेले. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती, चैतन्य देत अहित.




हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी माहिती

➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण निबंध मराठी

➡️ सावित्रीबाई फुले भाषण निबंध मराठी

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन

➡️ मराठी राजभाषा दिन भाषण निबंध 

➡️ महाशिवरात्री पुजा वीधी कथा मुहूर्त शुभेच्छा

➡️ संत गाडगेबाबा जयंती भाषण निबंध मराठ

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी

➡️ संत सेवालाल महाराज मराठी माहिती



FAQ
Q.1) डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी आहे ?
Ans. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2022 वार गुरुवार या दिवशी आहे.

Q.2) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते ?
Ans.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भिमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते.

Q.3) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी  झाला ?
Ans. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad