Type Here to Get Search Results !

हनुमान जयंती मराठी माहिती निबंध | Hanuman jayanti marathi mahiti nibandh

 हनुमान जयंती मराठी माहिती निबंध कविता | Hanuman jayanti marathi mahiti nibandh | Hanuman jayanti essay in marathi


हनुमान जयंती मराठी माहिती निबंध कविता

हनुमान जयंती २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण १६ एप्रिल २०२२ वार शनिवार या दिवशी साजरा होणारा हनुमान जयंती हा सण याबद्दलची माहिती निबंध कविता मराठीमध्ये बघणार आहोत तरी खालील माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती. 


हनुमान जयंती मराठी माहिती निबंध कविता | Hanuman jayanti marathi mahiti nibandh

  महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते.

   दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणा-या अंजनीलाही खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता.त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा करतात. वाल्मीकि रामायणामध्ये - अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता.

सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो.त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.

हनुमान जयंतीला मारुतीचा नामजप जास्तीत जास्त करतात. हनुमान जयंती या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते.या दिवशी श्री हनुमते नमः हा नामजप जास्तीतजास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतितत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो. जन्मतःच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, तीथून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला जिंकणारा होता, हे लक्षात येते.


पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्तीमान आहे. कठोर आराधनेमुळे अंजनाच्या पोटी शंकराचा जन्म मुनीच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वतःच तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनीला मूल होत नाही. ती तगमगते.

भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वतःच तिचा मुलगा होण्याचे आश्वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते.अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात.

पायसपात्र खाली पडते, ते नेमके अंजनेच्या ओंजळीत ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनीला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो. हनुमंताच्या गळयातील जानवे हे ब्रह्मतेजाचे प्रतीक आहे.

हनुमंत हा शिवाचा अवतार असल्याने त्यांच्यात लय करण्याचे सामर्थ आहे. रामभक्ती करतांना त्यांच्यात विष्णुतत्त्व आले. त्यामुळे त्यांच्यात स्थितीचे सामथ्र्यही आले. हनुमंतामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धाच्या वेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करतो.कौरव-पांडव यांच्यातील युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते.तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.

भूत, राक्षस यांसारख्या वाईट शक्तींपासून रक्षण सगळ्या देवतांमध्ये फक्त मारुतीला वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला भुतांचा स्वामी' म्हटले जाते.भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्र म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्तीवरून नारळ उतरविल्याने व्यक्तीतील वाईट शक्ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते.

त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात. लग्न न होणाऱ्यांपैकी जवळजवळ ३० टक्के व्यक्तींचे लग्न भूत, करणी इत्यादी वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत नाही. मारुतीच्या उपासनेने ते त्रास दूर होतात व लग्न होणे शक्य होते. १० टक्के व्यक्तींचे लग्न भावी वधू किंवा वर यांच्या अवास्तव अपेक्षा असल्याने होत नाही. त्या संदर्भात अपेक्षा कमी केल्या की लग्न होते.


श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधार 
बरनौ रघुवर बिमल जसु, जो दायक फल चारि
बुद्धिहीन तनु जानि के, सुमिरौ पवन कुमार 
बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार 

आप सभी को हनुमान जयंती की मंगलमय शुभकामनाएं ! हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!




हे सुध्दा वाचा ⤵️

🆕 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

➡️ राम नवमी मराठी माहिती निबंध

➡️ गुढीपाडवा मराठी माहिती निबंध 

➡️ रंगपंचमी निबंध मराठी माहिती 

➡️ होळी निबंध मराठी माहिती

➡️ महाशिवरात्री पुजा वीधी कथा मुहूर्त शुभेच्छा



FAQ
Q.1) २०२२ ची हनुमान जयंती कधी आहे ?
Ans. २०२२ ची हनुमान जयंती १६ एप्रिल २०२२ वार शनिवार या दिवशी आहे.

Q.2) महाराष्ट्रात हनुमान जयंती कधी साजरी होते ?
Ans. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते.

Q.3) हनुमानाच्या आईचे नाव काय होते ?
Ans. हनुमानाच्या आईचे नाव अंजनी हे होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad