Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र दिन भाषण निबंध माहिती मराठी | maharashtra din speech essay in marathi

 महाराष्ट्र दिन भाषण निबंध माहिती मराठी | maharashtra din speech essay in marathi | १ मे महाराष्ट्र दिन माहिती निबंध मराठी | Maharashtra din bhashan nibandh marathi


महाराष्ट्र दिन भाषण निबंध माहिती मराठी


महाराष्ट्र दिन २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण १ मे रोजी साजरा होणारा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन याबद्दलची माहिती बघणार आहोत. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने उत्साहाचे वातावरण असते व महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्र दिन भाषण, निबंध, कविता मराठी माहिती. ही सर्व माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


महाराष्ट्र दिन भाषण निबंध माहिती मराठी | १ मे महाराष्ट्र दिन भाषण मराठी | Maharashtra din bhashan nibandh marathi

      सह्याद्रीची छाती ज्याची खानदेश हा माथा 
    विदर्भ कोकण बाहू आहे चरणी सागर चाहता                नरवीरांच्या भेटी घडती मराठवाडी जाता 
 जय हिंद भूमी, जय शिव भुमी, जय महाराष्ट्र गाथा !!

महाराष्ट्रातील तमाम मावळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व रसिक श्रीते हो ! आज मी तुम्हाला महाराष्ट्र दिनानिमित्त थोडक्यात माहिती सांगणार आहे तरी तुम्ही ही माहिती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही नम्र विनंती.

महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय ?

बोलक्या कविता पारावरचा वड, देवीचा गड आणि तमाशाचा फड म्हणजे महाराष्ट्र, आंबा, फणस, साग आणि माणसातले वाघ म्हणजे महाराष्ट्र, रानातला पळस, अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस म्हणजे महाराष्ट्र, कपाशी, तूर, ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्र, इरसाल हस्ती, मातीतली कुस्ती आणि राजकारणातली मस्ती म्हणजे महाराष्ट्र,शिमगा, पोळा, होळी आणि पुरणाची पोळी म्हणजे महाराष्ट्र
आणि म्हणूनच महाराष्ट्र हा जमिनीचा तुकडा नव्हे तर महाराष्ट्र एक संस्कृती आहे, एक धर्म आहे. 

     महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र आणि इतिहासाच्या पानोपानी ही महानता महाराष्ट्राने वेळोवेळी सिद्ध केलेली आहे. छत्रपती शिवरायांनी याच महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती केली आणि पेशव्यांनी महाराष्ट्राचा हा ध्वज अटकेच्या ही पार रोवला. तर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी याच महाराष्ट्रात पारतंत्र्या विरुद्ध सशस्त्र उठाव केला.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच महाराष्ट्रात सामाजिक क्रांतीचे बीज रोवले तर लोकमान्य टिळकांनी याच महाराष्ट्रातून इंग्रजी सत्तेला आवाहन दिले आणि मित्रहो याच महाराष्ट्राचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या देशाच्या संविधानाला आकार दिला.

महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोबा-तुकोबां सारख्या संतांची भूमी आहे. याच मातीत कुसुमाग्रज, बहिणाबाई आणि पुलं सारखे सारस्वत जन्मले. विज्ञानाच्या क्षेत्रातील नारळीकर, माशेलकर, काकोडकर यांसारखे शास्त्रज्ञ. कलेच्या क्षेत्रातील लता मंगेशकर, बालगंधर्व, दादासाहेब फाळके यांसारखे कलावंत आणि क्रिडा क्षेत्रातील सुनील गावस्कर असो वा सचिन तेंडुलकर सारखे खेळाडू ही याच मराठी मातीची देशाला देण आहे.

सामाजिक सुधारणा असोत की सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राने नेहमीच देशाला वाट दाखविलेली आहे. आपल्या या महाराष्ट्राला त्यागाची, पराक्रमाची आणि देशप्रेमाची फार मोठी परंपरा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींना देशकार्यासाठी जेवढे कार्यकर्ते महाराष्ट्रात मिळाले तेवढे इतर कुठेही मिळाले नाहीत म्हणूनच गांधीजींनी महाराष्ट्राची प्रशांसा कार्यकर्त्यांचे मोहोळ या शब्दात केलेली आहे.

आजही देशाच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राच नेतृत्व महाराष्ट्राकडेच आहे. सबंध देशाचं आर्थिक आणि औद्योगिक इंजिन म्हणजे महाराष्ट्रच आहे. परंतु मित्रहो तुमच्या-माझ्या या महाराष्ट्र राज्याची निर्मिती मोठ्या संघर्षाने झालेली आहे.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे अशा नेत्यांनी तीव्र संघर्ष केलेला आहे. तर या राज्याच्या निर्मितीसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे. तेव्हा आजचा दिवस हा या संघर्षाला आठविण्याचा दिवस आहे.

सागरी किनारा, हिरवी शन, सुंदर शेतं, दगड, धोंडे आणि डोंगरांनी बनलेल्या या महान भूमीला आपल्या जन्मभूमीला नमन करताना महान नाटककार राम गणेश गडकरी म्हणतात....

       राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
      जामुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
          मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा 
        प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा !!

           🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र🙏🙏
हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ जागतिक कामगार दिन मराठी माहिती


FAQ
Q.1) महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. महाराष्ट्र दिन 1 मे रोजी साजरा केला जातो.

Q.2) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कोणकोणत्या नेत्यांनी तीव्र संघर्ष केला होता ?
Ans. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे अशा नेत्यांनी तीव्र संघर्ष केलेला होता.

Q.3) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?
Ans.१ मे रोजी गुजरात आणि महाराष्ट्राची स्थापना ५९ वर्षांपूर्वी झाली. दोन्ही राज्यातील लोक या दिवशी स्थापना दिन मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दोन्ही राज्यांची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad