Type Here to Get Search Results !

राम जन्माचा पाळणा मराठी | Ram janmacha palana marathi

 राम जन्माचा पाळणा मराठी |राम नवमी २०२२ | Ram janmacha palana marathi | Ram Navami 2022 


राम जन्माचा पाळणा मराठी


राम नवमी २०२२ : राम नवमी हा सण पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीला  भगवान विष्णूंचा सातवा अवतार श्रीराम यांचा जन्म झाला. अशी मान्यता आहे..हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दुपारी सुर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी १२.०० वाजता रामजन्माचा सोहळा संपन्न होतो.

यावर्षीचा रामनवमी हा सण एप्रिल महिन्यात १० तारखेला रविवारी येत आहे. या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म सोहळा संपन्न होत असतो म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत श्रीराम जन्माचा पाळणा हा पाळणा तुम्हाला या दिवशी नक्की उपयोगी पडेल.



 राम जन्माचा पाळणा मराठी | Ram navmi 2022 | janmacha palana marathi


पहिल्या दिवशी बोलली लिला 
दशरथ राजाला पुत्र हो झाला 
कौसल्या मातेने झोका हा दिला 
जो बाळा जो जो रे जो ॥१॥

दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे
जशी खुलली कळी कमळाची 
प्रसूत झाली त्या वेळेशी 
जो बाळा जो जो रे जो ॥२॥

तिसऱ्या दिवशी वदली गंगा
नका बायांनो हो करु दंगा 
दशरथ राजाला जाऊनी सांगा
जो बाळा जो जो रे ॥३॥

चवथ्या दिवशी वदली उमा
बाळाच्या रुपाची लागेना सीमा 
ऐसी बोलली महादेव भीमा 
जो बाळा जो जो रे जो ॥४॥

पाचव्या दिवशी पाची कल्लोळ
बाळ जन्मले रुप सावळ
राम निघाला रावणाचा काळ 
जो बाळा जो जो रे जो॥५॥

सहाव्या दिवशी बोलली तारा
आला सोनार आपुल्या घरा
बाण धनुष्य रामाला करा
जो बाळा जो जो रे ॥६॥

सातव्या दिवशी धनुष्य टाकिले
लक्ष्मण अवतार शोधिले
यातून एक युग लोटले
जो बाळा जो जो रे जो ॥७॥

आठव्या दिवशी सखी वदली
सीता रामाची रावणाने नेली
मारुतीरायाने लंका जाळली
जो बाळा जो जो रे जो॥८॥

नवव्या दिवशी बोलली भागा 
बायांनो तुम्ही चरणांशी लागा 
दान चुड्याचे रामाला मागा 
जो बाळा जो जो रे जो॥९॥

दहाव्या दिवशी बोलला गजा 
संगे घेऊन वानर फौजा
बिभीषणा केला लंकेचा राजा 
जो बाळा जो जो रे जो।।१०।।

अकराव्या दिवशी अकरावा रंग 
ब्रम्हा विष्णूला लागला छंद 
पाचही हत्यारे रामाच्या संग 
जो बाळा जो जो रे जो।।११।

बाराव्या दिवशी जना बोलली
लक्ष्मणाला शक्ती लागली
पहाड आणाया गेला मारुती 
जो बाळा जो जो रे जो ॥१२॥

तेराव्या दिवशी नंदीवर बसले 
रामाने मारुतीला स्वराज्य दिले
देशोदेशी वानर धाडिले
जो बाळा जो जो रे जो ॥१३॥

चौदाव्या दिवशी कहाणी सारी 
बिजली बत्तीचा प्रकाश भारी 
तेहतीस कोटी देव जमले दरबारी
जो बाळा जो जो रे जो ॥१४॥

पंधराव्या दिवशी अवतार बदले 
कृष्ण पांडव पुढे निघाले 
कंस मामाला त्यांनी वधिले 
जो बाळा जो जो रे जो ॥१५॥

सोळाव्या दिवशी सोळावा केला 
गुरु वसिष्ठ विद्या बोलला
धन्य रामाचा पाळणा गाईला
जो बाळा जो जो ॥१६॥




हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ गुढीपाडवा मराठी माहिती निबंध 

➡️ रंगपंचमी निबंध मराठी माहिती 

➡️ होळी निबंध मराठी माहिती

➡️ जागतिक ग्राहक दिन निबंध मराठी

➡️ जागतिक महिला दिन भाषण निबंध मराठी

➡️ राष्ट्रीय सुरक्षा दिवस भाषण निबंध 

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन

➡️ मराठी राजभाषा दिन भाषण निबंध 

➡️ महाशिवरात्री पुजा वीधी कथा मुहूर्त शुभेच्छा

➡️ संत गाडगेबाबा जयंती भाषण निबंध मराठ

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी

➡️ संत सेवालाल महाराज मराठी माहिती



FAQ
Q.1) २०२२ ची रामनवमी  कधी आहे ?
Ans. २०२२ ची रामनवमी १० एप्रिल २०२२ वार रविवार या दिवशी आहे.

Q.2) रामनवमीचा शुभ मुहूर्त कोणता आहे ?
Ans. रामनवमीचा शुभ मुहूर्त ११.०६ ते ०१.३८ हा आहे.

Q.3) भगवान श्रीराम हे कोणाचे अवतार आहेत ?
Ans. भगवान श्रीराम हे विष्णूचे सातवे अवतार आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad