Type Here to Get Search Results !

खतांच्या अनुदानात भरघोस वाढ | रासायनिक खतांच्या नवीन किमती जाहीर | Huge increase in fertilizer subsidy

खतांच्या अनुदानात भरघोस वाढ | रासायनिक खतांच्या नवीन किमती जाहीर | Huge increase in fertilizer subsidy 

 जागतिक परिस्थितीमुळे जगभरात खतांसाठी लागणाऱ्या अमोनिया, पोटॅश आणि स्फुरद या कच्च्या मालांचा तुटवडा निर्माण झाला - त्यामुळे गेल्या वर्षभरापासून खतांच्या किमतीत वाढ होत आहे 

 त्यामुळे डीएपी, पोटॅश, फॉस्फेटयुक्त खतांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच खतांच्या किमती स्थिर राहाव्यात म्हणून पोषणमूल्य आधारित देण्यात येणाऱ्या खतांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे 


काय म्हणाले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ?

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार , डीएपीच्या ५० किलोच्या पोत्यावरील अनुदान १६५० रुपये होते - त्यात वाढ करून २५०१ रुपये करण्यात आले आहे , त्यामुळे डीएपीचे ५० किलोचे पोते आता १३५० रुपयांना मिळेल.


तसेच एमओपीच्या प्रती ५० किलो पोत्यावर ७५९ अनुदान होते, त्यात ४५५ रुपयांची वाढ केली आहे - एनपीके खताच्या ५०किलो पोत्याला १४२५ रुपये अनुदान होते, त्यात ८६८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे


याव्यतिरिक्त एनपी खताच्या अनुदानात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे , सध्या ५० किलोच्या पोत्यावर २३०६ रुपये अनुदान होते , त्यात १४०८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे

दरम्यान या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर खत दरवाढीचा कोणताही परिणाम होणार नाही , त्यांना मागील वर्षीच्याच दराने खते मिळणार आहेत - असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले 


रासायनिक खताच्या नव्या किंमती जाहीर 

केंद्र सरकारने डीएपी, पोटॅश, फॉस्फेटयुक्त खतांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी - खतांच्या अनुदानात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे  

 सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे यंदा खतावर 60 हजार 939 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे


यंदाच्या खताचे दर असे असतील : 

DAP कंपोस्ट - 1350 रुपये प्रति बॅग (50 किलो) 

एनपीके -  1470 रुपये प्रति बॅग (50 किलो)

एमओपी  - 1700 रुपये प्रति बॅग (50 किलो)


अनुदानाशिवाय खताच्या किंमती :

युरिया - 2450 रुपये प्रति बॅग 

डीएपी - 4073 रुपये प्रति बॅग आहे

NPK -  3291 रुपये प्रति बॅग

एमओपी कंपोस्ट - 2654 रुपये प्रति बॅग


रासायनिक खताच्या किंमती जाहीर झाल्या - शेतकऱ्यांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा


है सुद्धा वाचा⤵️


FAQ

Q.1) खतांच्या अनुदानात कीती वाढ झाली आहे ?

Ans. डीएपीच्या ५० किलोच्या पोत्यावरील अनुदान १६५० रुपये होते - त्यात वाढ करून २५०१ रुपये करण्यात आले आहे , त्यामुळे डीएपीचे ५० किलोचे पोते आता १३५० रुपयांना मिळेल.


Q.2) भारताचे केंद्रीय कृषिमंत्री कोण आहेत ?
Ans. अनुराग ठाकूर हे भारताचे कृषिमंत्री आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad