google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 संभाजी महाराज भाषण निबंध मराठी माहिती | Sambhaji Maharaj bhashan nibandh marathi
Type Here to Get Search Results !

संभाजी महाराज भाषण निबंध मराठी माहिती | Sambhaji Maharaj bhashan nibandh marathi

 संभाजी महाराज भाषण निबंध मराठी माहिती |  Sambhaji Maharaj bhashan nibandh marathi | Chatrapati Sambhaji Maharaj jayanti 2022

संभाजी महाराज जयंती २०२२ : नमस्कार मित्रांनो आज १४ मे २०२२ वार शनिवार हा दिवस छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत संभाजी महाराज भाषण, निबंध मराठी माहिती आणि शुभेच्छा संदेश. ही सर्व माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


छत्रपती संभाजी महाराज भाषण निबंध मराठी | Sambhaji Maharaj bhashan nibandh marathi

              कोंढाण्यासाठी तानाजी गेला, 

             घोडखिंडीसमोर बाजी आला... 

              महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी,

             स्वराज्य रक्षक संभाजी झाला..."


आजकाल असे म्हणतात की, जिथ मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली खुप कमी होत चालल्या आहेत, पण ज्यांच नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या माँ साहेब जिजाऊ! 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदीरे असतील पण यांची पुजा फार कमी लोक करतात,पण माझ्या राजाचं अस एकही मंदीर नाही पण कोटयावधी माणस माझ्या राजाची पुजा करतात ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज! आणि "ये संभा मर सकता है, लेकीन बेईमान नही हो सकता।" असे म्हणणारे छत्रपतीसंभाजी महाराज! या सर्वांनाच मानाचा मुजरा! मानाचा मुजरा !!

मित्रांनो छत्रपती संभाजी राजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरात झाला. आणि तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले, सगळीकडे आनंदी आनंद वातावरण पसरले, भगवा झेंडा अभिमानाने फडकू लागला, सहयाद्री आकाशा च्या उंचीने दिल्लीकडे ताट मानेने पाहू लागली आणि सहयाद्रीच्या कडेकोपऱ्यात एकच आरोळी घुमली, 'माझा राजा जन्मला, माझा शंभु जन्मला, माझा शंभुराजा जन्मला.


          छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकताच अंगातले रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गादीवरती बसले स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांना संपवण्यासाठी आला दिल्लीचा बादशहा औरंगजेब. अरे पळविण्यास शिवबांचे स्वराज्य औरंगजेब आला सांग संभाजी तू कशी देणार टक्कर याला ? "अरे 1 लाख सेवक त्याचे, खजिना 33 कोटींचा विकत घेण्यासाठी आले, कणा मराठी मातीचा 3 हजार हत्ती, पाच हजार उंट अन 400 घेऊन तोफा 40 नातू,22 ते सरदार, अमीर मनाचा मेळावा भरदार अरे पाहून हा भव्य देह, दडपून जाई छाती भल्या भल्यांनी औरंग्याशी, पत्करली शरणागती अरे कुठे हा वणवा, कुठे शिवाचा दिवा एका झुळकेत विझुनी जाई, येता मोगली हवा. सहा महिन्यात जिंकूनी घेईन, बाळ शंभूची गादी अरे बरबाद होतील जे, लागतील मोघलांच्या नादी.

         सहा महिन्यांमध्ये शिवरायांचे राज्य जिंकायचे, संभाजींना मारून टाकायचे, दक्षिण दिग्विजय जिंकायचा, महाराष्ट्र जिंकायचा आणि दिल्लीला परत जायचे असे औरंगजेबने ठरवले, आणि पहिला किल्ला जिंकायचा ठरवला तो रामशेज, रामशेज साध्या टेकडीवरचा किल्ला औरंगजेब साडेसात वर्षे लढत राहिला तरीही तो किल्ला जिंकू शकला नाही. औरंगजेबच काय औरंगजेबाच्या बापालासुध्दा किल्ला जिंकता आला नसता कारण औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी लढत होता आणि आमचे मर्दमावळे किल्ला लढवत होते शिवबांचे राज्य वाचवण्यासाठी.....


          "अरे, मृत्युलाही मात दयायचा, 

               होता त्याचा कावा...

              निधड्या छातीचा असा,

                    एकमेव छावा..."


अशा या महान राजाचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे झाला. शेवटी एवढंच म्हणेन


                  "पाहूनी तुमचे शौर्य, 

                मृत्यु ही नतमस्तक झाला... 

                 स्वराज्याच्या मातीसाठी, 

                 माझा शंभू अमर झाला..."


                        🙏धन्यवाद 🙏



हे सुध्दा वाचा⤵️




FAQ
Q.1) संभाजी महाराज यांचा जन्म कधी झाला ?
Ans. संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरात झाला.

Q.2) संभाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
Ans. संभाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज हे होते.

Q.3) संभाजी महाराज यांचा मृत्यू कधी झाला ?
Ans. संभाजी महाराज यांचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे झाला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad