Type Here to Get Search Results !

२१ जुन जागतिक योग दिन निबंध मराठी माहिती | international yoga day essay in marathi

 २१ जुन जागतिक योग दिन निबंध मराठी माहिती | international yoga day essay in marathi | jagtik yog din nibandh marathi

२१ जुन जागतिक योग दिन २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण २१ जुन साजरा होणारा दिवस म्हणजे जागतिक योग दिन याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. जागतिक योग दिनावर एक उत्तम निबंध आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तरी तुम्ही जागतिक योग दिन निबंध शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.


अशिच माहिती बघण्यासाठी आमच्या what's up group मध्ये join व्हा                                           ⤵️
                                                     Click here 

२१ जुन जागतिक योग दिन निबंध मराठी | jagtik yog din nibandh marathi


भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल.

भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. आताच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.

सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. २१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. २१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते.

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तब्बल दोन महिने भारतासह जागतिक पातळीवरील अनेक देश लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनावर थेट औषध उपलब्ध नसल्याने कोरोनापासून बचाव हेच कोरोनावरील मोठे औषध आताच्या घडीला आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे.

आयुर्वेदिक औषधे, होमियोपॅथी आणि अन्य गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर दररोजचा नियमित व्यायाम आणि योगासने यांनाही महत्त्व दिले जात आहे. लॉकडाऊन काळात घरी बसणे आणि अनेक कारणांमुळे येणारे नैराश्य यांवर योगासने हे अगदी रामबाण औषध आहे. योगासनांमुळे शरीर आणि मन दोन्ही सशक्त आणि सक्षम होऊ शकते. त्यामुळे कोरोना विरोधातील लढाई आपण आपल्याच पद्धतीने आणखीन बळकट करू शकतो.

जागतिक योग दिनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात एकत्रितपणे काही वेळ योगासने करण्यावर भर दिला गेला. मात्र, आताच्या घडीला असलेल्या कोरोना संकटामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे यंदा घरीच राहून जागतिक योग दिनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या जागतिक योग दिनात सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले जागतिक योग दिनातील योगदान सर्वापर्यंत पोहोचवूया.....हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. जागतिक योग दिन 21 जुन रोजी साजरा केला जातो.

Q.2) 2022 ची जागतिक योग दिनाची थीम काय आहे ?
Ans.2022 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम 'मानवतेसाठी योग' ही महामारीमुळे होणारे महत्त्वपूर्ण मानसिक, शारीरिक आणि भावनिक संघर्ष लक्षात घेऊन आहे. 2015 पासून दरवर्षी 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून ओळखला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे.

Q.3) पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात आला ?
Ans. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad